आज 9 जुलै 2021 शुक्रवार ज्येष्ठ अमावास्या. आज चंद्र दिवसभर मिथुन राशीत भ्रमण करेल. आज जाणून घेऊ या अमावस्येच्या दिवशी करण्याचे उपाय. अमावास्या ही मुख्यतः ज्यांना पितृ दोषाचा त्रास आहे अश्या व्यक्तींना त्रासाची ठरू शकते. अनेक अनाकलनीय अणि अचानक घटना यादिवशी घडू शकतात. आजारी व्यक्तीला जास्त त्रास होऊ शकतो. चंद्र सूर्य एका राशीत असल्यामुळे चंद्र बळ कमी असते.
यादिवशी आपल्या नैमित्तिक कामाशिवाय ईश्वरी उपासना करावी. प्रत्येकाने दानाचे महत्त्व समजून घेऊन या दिवशी शिधा दान करावे. (डाळ, तांदुळ, कणीक,साखर, तेल,तूप ,भाजी) संध्याकाळी मारुतीची उपासना करावी. दिवसभर कोणाशी वाद करू नये. नामजप करावा.
आजचे बारा राशींचे भविष्य
मेष
तृतीय स्थानात होणारी चंद्र सूर्य बुध युती ही भावंडाना फारशी शुभ नाही. आज शक्यतोवर प्रवास टाळा. कोणाशी शाब्दिक वाद नको. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस बरा आहे.
वृषभ
धनस्थानातील ग्रह आज अचानक लाभ मिळवून देतील. पण अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात आहात. व्यवहार जपून करा. मोठे निर्णय लांबणीवर टाका. डोळ्यांची काळजी घ्या. कुटुंबात कोणाला नाराज करू नका. दिवस चांगला जाईल.
मिथुन
आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तुमच्या राशीतून होणारी अमावस्या मन अशांत करेल. व्यवसाय धंद्यात नवीन निर्णय आज नको. अष्टमात शनि आणि धनस्थानातील मंगळ जपून व्यवहार करा असे सुचवत आहे .दिवस मध्यम .
कर्क
आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण आणि अमावस्येच्या प्रभावातून दिवस कठीण जाईल. नुकसान, काही प्रकृतीची तक्रार, कार्य क्षेत्रात अडचणी असा दिवस आहे. राशीतील मंगळ ही उग्र फळ देईल . जपून रहा. दिवस अनुकूल नाही.
सिंह
आजची अमावास्या ही लाभ स्थानात होत आहे. तुम्हाला मित्र मैत्रिणींसोबत दिवस घालवावा असे वाटेल. त्यासाठी खर्च कराल. मुलांना मात्र आज जपा. प्रवास टाळा. दिवस बरा आहे.
कन्या
आज वरिष्ठांशी वाद विवाद नको. त्या पेक्षा आपले नेमलेले काम करून बाजूला व्हावे .घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. वडिलांचे आरोग्य सांभाळा. आर्थिक स्थिती ठीक आहे. दिवस बरा.
तुला
आज भाग्याला जरा ग्रहण लागल्यासारखे होईल. साध्या गोष्टी वेळ खातील. धार्मिक वचन,पुजा करावी. अष्टमात असलेला राहू काही तक्रारी निर्माण करेल. भावंडांची भेट,प्रवास संभवतो. दिवस मध्यम .
वृश्चिक
अष्टम स्थानातील ग्रहांची दाटी प्रकृतीकडे अगदी नीट लक्ष द्या असे सुचवत आहे. कोणाशीही नको ती चर्चा, वाद करू नका. जोडीदाराकडून मदत घ्या. सध्या घरांमधे होणारा खर्च कमी करा. दिवस मध्यम आहे.
धनु
आज पती पत्नी एकमेकांना वेळ द्या. आर्थिक बाजू जरा सांभाळून घ्या. उगीच खर्च नको. कर्ज देणे किंवा घेणे दोन्ही नकोच. अपघात, लागणे पडणे यापासून अगदी जपून रहा. दिवस शांत घरात घालवा.
मकर
षष्ठ स्थानातील अमावस्येच्या प्रभाव आरोग्याचा प्रश्न निर्माण करेल. मातृ चिंता संभवते. एकूण कोणाशीही शत्रुत्व करण्याचा आजचा दिवस नाही. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस मध्यम जाईल .
कुंभ
आज पंचमात होणार्या अमावस्येच्या प्रभावातून मुलांचे प्रश्न पुढे येतील. त्याची काळजी घ्या मन थोडे अस्वस्थ राहील .
गुरुकृपेने फारसा त्रास होणार नाही. पण जपून, शांततेत दिवस घालवा. मध्यम दिवस .
मीन
आज गृहकलह टाळण्यासाठी कोणाशीही वाद करू नका. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती साथ देईल. मुलांची काळजी घ्या. दिवस चांगला जाईल..
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.