• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: वृषभ आणि वृश्चिक राशीसाठी दिवस उत्तम, या 2 राशींनी मात्र आरोग्याची काळजी घ्यावी

राशीभविष्य: वृषभ आणि वृश्चिक राशीसाठी दिवस उत्तम, या 2 राशींनी मात्र आरोग्याची काळजी घ्यावी

Daily Horoscope: आज शुक्रवार दिनांक 2 जुलै 2021 ज्येष्ठ कृष्ण अष्टमी. बघू या आजचे राशी भविष्य. सोबत वाचा नवग्रहातल्या सर्वांत शुभ मानल्या गेलेल्या गुरू अर्थात बृहस्पतीबद्दल

  • Share this:
आज शुक्रवार दिनांक 2 जुलै  2021 ज्येष्ठ कृष्ण अष्टमी.आज चंद्र  मीन राशीत भ्रमण करेल. आज जाणून घेऊया बृहस्पती  किंवा  गुरू  या ग्रहा बद्दल. नवग्रहांमध्ये  सर्वात  शुभ, देव गुरू बृहस्पती आहे. गुरु ग्रह साधारण 13 महिने एका राशीत राहतो. पुनर्वसू, विशाखा अणि पूर्वा भाद्रपदा या तीन नक्षत्रांचे स्वामित्व गुरू कडे आहे. गुरु कर्क राशीत उच्च  व मकर राशीत  नीच असतो. धनु व मीन राशीत स्वगृही  शुभ फळ देतो. गुरु कुंडलीत शिक्षण, धर्म, उच्च विचार, शुचिता, आणि सफलता या गोष्टींचा कारक असतो. उच्च गुरू असलेल्या व्यक्ती मानसन्मान प्राप्त करतात. त्यांच्या सल्ल्याने अनेक व्यक्तींचे भले होते. मार्गदर्शक असतात. नीच गुरू जाड्य,मेद, मोठे पोट, लिव्हर  ,सूज, मुढ व्यक्ती चा निदर्शक असतो. गुरूचा रंग पिवळा, रत्न  पुष्कराज  असते. उच्च गुरू हा कुठल्याही क्षेत्रात  सफलता देतो. विशेष करून शैक्षणिक, सांस्कृतिक  अणि धर्म क्षेत्र. गुरूचा जप:  ॐ बृ.बृहस्पतये नम: हा आहे. आजचे राशी भविष्य मेष आज चंद्र मीन राशीत असुन मेष राशीच्या व्यक्तींना फारसा शुभ नाही. मन थोडे अस्थिर होईल. कार्यक्षेत्रातील अडचणी वाढतील. आरोग्याच्या तक्रारी  येतील. पण फारशी काळजी  करू नका. गुरु कृपा राहील. वृषभ लाभ स्थानातील चंद्र  मित्र मैत्रिणीं कडुन लाभ दर्शवतो. उत्तम मित्र तुमची साथ देतील .आर्थिक स्थिती  चांगली राहील. आरोग्य  ठीक. बहिण भावाशी प्रेमाने रहा. दिवस उत्तम. मिथुन आजही  तुमच्या वाढलेल्या  मीटिंग्स, जास्तीचे  काम तुम्हाला  बिझी ठेवेल. पण त्यातून यश मिळणार आहे. नौकरी  साठी  प्रयत्‍न करायचा असाल तर चांगली संधी येईल. कुटुंबातील स्त्रीवर्ग  मदत करेल. छान दिवस. कर्क आज दिवस भाग्य कारक असून तुमच्या कडुन काही तरी  शुभ काम होईल. आर्थिक स्थिती  मजबूत राहील. पण काही  आवश्यक दुरूस्ती, नवीन खरेदी  संभवते. दिवस शुभ. सिंह कालच्या प्रमाणेच आजही  फारशी  दगदग करू नका. नवीन कामाला सुरवात  नकोच. महत्त्वाचा निर्णय टाळा. काम फार वाढेल. तसेच अनाहूत खर्च ही होईल. दिवस मध्यम आहे. कन्या व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील .भागीदारी मध्ये चांगली घटना घडेल. पती पत्नी जोडीने  घर सजावट ,खरेदी करतील.तुम्ही जिद्द  व चिकाटीने काम पार पाडाल. दिवस चांगला आहे. तुला आज दिवस शत्रू पासून सावध रहा असे सुचवतो आहे. बोलणे सौम्य ठेवा. कोणाशी कामाच्या ठिकाणी वाद करू नका. पोटाचा त्रास असेल तर  काळजी घ्यावी लागेल. आराम करा.पैशाचे व्यवहार टाळा. दिवस मध्यम आहे. वृश्चिक दिवस शुभ असुन हातून चांगले कर्म होईल. मुलांची फार चिंता  करू नका. त्यांना  वेळ द्या. समाजासाठी काहीतरी  हातून घडेल. त्यातून नाव होईल. शुक्र शुभ योगात आहे .दिवस उत्तम. धनु घरून काम करणार्‍या  व्यक्तींना  आज फार जास्त काम येणार आहे. उशिरा पर्यन्त  मीटिंग्स, निर्णय  होतील. पण काम यश देईल. गृहिणीची आज परीक्षा  आहे. काम तुमची वाट पाहत असेल. फार कष्ट करू नका. दिवस चांगला. मकर तृतीय चंद्र प्रवास योग दर्शवतो आहे. महत्त्वाचा फोन, नवीन व्यक्तीशी ओळख  ,बहीण भावंड भेट असा  हा दिवस आनंदात, मौजमजेत घालवा. पंचमातील राहू  संतती चिंता दाखवतो. आर्थिक स्थिती उत्तम.  दिवस शुभ आहे. कुंभ धन प्राप्ती, कुटुंब सुख  ,आणि एखाद्या विशिष्ट गोष्टी बद्दल चर्चा  किंवा  निर्णय  असा हा दिवस  असून शांततेत पार पडेल. षष्ठ मंगळ  आणि शुक्र उष्णतेचे विकार  असतील तर दुर्लक्ष करू नका असे सांगतात. दिवस  शुभ . मीन राशीतील चंद्र सर्व बाजूनी शुभ असून घरात आनंदाच्या घटनांची सुरवात करेल. आपण गुरू  उपासना करावी.  मुलांकडे  लक्ष द्यावे. धार्मिक गोष्टीकडे कल वाढेल. दिवस छान आहे. शुभम भवतु !!
Published by:Prem Indorkar
First published: