आज शुक्रवार दिनांक 16 जुलै आषाढ शुद्ध सप्तमी .आज चंद्र दिवसभर कन्या राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य .
मेष
आजही दिवस थोडा दगदगीचा आहे. नवीन काम,निर्णय टाळलेले बरे. आर्थिक स्थिती ठीक राहील. पण कोणाला उधार देणे टाळा. शत्रू पासून सावध रहा. नातेवाईकांना भेट किंवा फोन होईल. दिवस मध्यम जाईल.
वृषभ
नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या कामाचा ताण वाढेल. मुलांना समजून घेणे आवश्यक राहील नवीन कला,विद्या शिकण्यास अनुकूल दिवस. मानसिक ताणतणाव कमी होतील. दिवस चांगला जाईल.
मिथुन
आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी फार काम राहणार आहे. नवीन अडचणी येतील. काही बदल झाले तर स्विकार करा. आर्थिक स्थिती ठीक राहील. घराकडे लक्ष देणे गरजेचे राहील दिवस शुभ आहे.
कर्क
जोडीदाराचे संतापी वागणे त्रासदायक ठरू शकते. बहिण भावाशी संवाद किंवा भेट होईल. आर्थिक बाजु चांगली राहील. प्रवास योग येतील. दिवस सर्व सामान्य पणे जाईल.
सिंह
आज आर्थिक भरभराट होईल आणि काही कुटुंबाकडून प्राप्तीचे योग आहेत. जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नकोत. वाद होतील. नवीन काही सुरू करणे टाळा. डोळ्याचे त्रास संभवतात. दिवस चांगला.
कन्या
आज राशीतील हस्त नक्षत्रातील चंद्र शुभ आहे. दिवस शांततेत पार पडेल. लोकांना मदत केल्याने तुम्ही सर्वांचे आवडते होणार आहात.
एखाद्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य ठरतील. दिवस उत्तम.
तुला
प्रकृतीची काळजी, मानसिक ताण, आणि थकवा असा आजचा दिवस आहे. नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी येऊ शकते. संतती संबंधी काळजी कमी होईल. ईश्वरी उपासना करावी.
दिवस मध्यम जाईल.
वृश्चिक
घरात होणार्या अवाजवी खर्चाला आता कात्री लावणे गरजेचे आहे. लाभ स्थानातील चंद्र भ्रमण आज काही मित्रांची भेट घडवून आणेल.
संतती सुख उत्तम. नोकरीमध्ये संभाळून निर्णय घ्या. दिवस चांगला आहे.
धनु
आजचा दिवस ऑफिस मध्ये जास्तीची जबाबदारी, ताण आणि काही आवश्यक कागदपत्रे शोधण्याचा आहे. अजूनही अष्टमात असलेले ग्रह प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतात. घराकडे लक्ष द्या. मात्र जोडीदाराची प्रगती संभवते. एकुण मिश्र दिवस आहे.
मकर
उत्तम भाग्याची साथ ,छोटे प्रवास किंवा त्याची आखणी, असा हा दिवस आहे. भावंडाची साथ मिळेल. राशीतील शनि मुळे कधीतरी निराशा येते उपासना करावी. नोकरीमध्ये उत्तम संधी येतील. धार्मिक कार्य घडेल. शुभ दिवस.
कुंभ
आज दिवस संथ, कंटाळवाणा जाईल. जास्तीची कामे त्रास देतील. शरीर साथ देणार नाही. गृह चिंता सतावू शकते. पत्नीच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी खर्च होईल. जपुन रहा असा संकेत आहे.
मीन.
तुमचे आपल्या जोडीदाराशी फारच सूत जुळणार आहे. जोडीने प्रवास, खरेदी कराल मुलांची उत्तम प्रगती होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक गोष्टींवर खर्च कराल दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.