Home /News /astrology /

Makar Sankranti: मकर संक्रमण 12 राशींवर काय परिणाम करेल? वाचा तुमचं आजचं भविष्य

Makar Sankranti: मकर संक्रमण 12 राशींवर काय परिणाम करेल? वाचा तुमचं आजचं भविष्य

संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्य आज सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. बुध मकर राशीत वक्री होत आहे. कसा जाईल संक्रमणाचा दिवस 12 राशींचं भविष्य वाचा..

मुंबई, 14 जानेवारी -  आज दिनांक 14 जानेवारी 2022. आज मकरसंक्रांत.  हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण. आज सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. संक्रांतीचा पर्व काळ हा दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिट ते सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे. या काळात  सुवासिनींनी सौभाग्य वाण, तीळगूळ, खिचडी, कापूस, वस्त्र, आदी दान करणे योग्य राहील. सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज चंद्र वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. बुध मकर राशीत वक्री होत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या धनस्थानातील चंद्र, शुक्र शुभ योग करीत आहे. मंगळ अष्टम स्थानात असून प्रकृती नाजूक राहील. आर्थिक स्थिती उत्तम व्यवसायातून मोठे लाभ. दिवस शुभ. वृषभ राशी स्थानातील चंद्र सुखात वाढ करेल. संततीकडे लक्ष असू द्या. शुक्र, बुध व्यवसायात वाढ करतील. शनी, गुरू कार्यक्षेत्रात अनेक संधी मिळवून देतील. छोटे मोठे प्रवास योग आहेत. दिवस शुभ. मिथुन आनंद देणारा प्रवास, मौजमजेसाठी खर्च. मित्रांचा सहवास असा हा दिवस शुभ असून, यश मिळवून देईल. गृहसौख्य मिळेल. घरात काही वाद होऊ देऊ नका. दिवस शुभ. कर्क लाभ स्थानात चंद्र  मंगळाच्या दृष्टीत असून, नोकरी पेशा व्यक्तींना अतिशय शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस शुभ. सिंह भाग्यकारक घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल, धन प्राप्तीचे योग येतील. पण खर्चदेखील वाढेल. भावंडाची प्रगती होईल. कार्यक्षेत्रातून शुभ समाचार येतील. आरोग्य उत्तम राहील. दिवस शुभ. कन्या भाग्यशाली चंद्रभ्रमण मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तरार्ध जरा गडबडीत जाईल. आर्थिक बाजू उत्तम असली तरी खर्च जपून करा. दिवस  शुभ आहे. तुला जोडीदाराला वेळ द्या.  घरांमधे काही चांगली घटना घडेल. आर्थिक लाभ होतील. खर्च बेताने करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मात्र प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल. वृश्चिक सप्तम चंद्र आज जोडीदाराला शुभ फळ देणारा ठरेल, मन आनंदी राहील. आर्थिक स्थिती सांभाळा. आवाका पाहून खर्च करणे योग्य राहील. दिवस मध्यम. धनू आज संततीसाठी थोडी चिंता वाटेल. शैक्षणिक बाजू चांगली राहील. त्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. तृतीय गुरू पराक्रमाची वाढ करतील. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला. मकर राशीच्या पंचम स्थानात होणारे चंद्रभ्रमण अनुकूल असून नैमित्तिक कामे व्यवस्थित पार पडतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर राहणार आहे. दिवस शांततेत घालवा. कुंभ आज चतुर्थ स्थानात येणारा चंद्र घरांमधे मेजवानीचा योग आणेल. बहीण-भावाच्या भेटीचा योग. किंवा महत्त्वाचे फोन येतील. प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल. मीन आर्थिक लाभ, कौटुंबिक कारणांसाठी खरेदी, प्रवास, असा हा दिवस अतिशय आनंदात जाईल. दोघांनी मिळून काम पार पाडावे. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. दिवस शुभ.
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Astrology and horoscope, Makar Sankranti, Rashibhavishya

पुढील बातम्या