Home /News /astrology /

Daily Horoscope: 'या' राशींवर आज होणार आनंदाचा वर्षाव; पण या गोष्टींपासून सावधान; असा जाईल दिवस

Daily Horoscope: 'या' राशींवर आज होणार आनंदाचा वर्षाव; पण या गोष्टींपासून सावधान; असा जाईल दिवस

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमचं मॅनिप्युलेशन केलं जात आहे असं तुम्हाला वाटेल; मात्र तसं प्रत्येक वेळीच असतं असं नाही. तुमच्या जवळच्या काही व्यक्ती अशा असतील, की ज्या तुमचं चांगलं चिंतत नाहीत. तुम्ही ध्येय म्हणून ज्या गोष्टींमागे पळत आहात, त्यांचा आढावा घेण्याची गरज आहे. LUCKY SIGN - A narrow road वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एरव्ही ज्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले असते, अशा एखाद्या गोष्टीत काही हालचाली घडत असल्याचं तुम्हाला दिसेल. पहिल्यांदा खेळी खेळणं हे काही दुर्बलपणाचं लक्षण नव्हे. बाह्य परिस्थितीपेक्षा आतून होणाऱ्या साक्षात्काराला प्राधान्य द्याल. LUCKY SIGN - A storm मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्हाला काय वाटतं, हे आत्ता किंवा नंतर तुम्हाला सर्वांना सांगावंच लागणार आहे. खोट्या प्रॉमिसेसमध्ये राहणं तुम्ही नाकारलं पाहिजे. सहकार्याची, पाठिंब्याची अपेक्षा धरू नका. कारण तुम्हाला कदाचित सहकार्य लगेच मिळणार नाही. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतल्या सध्याच्या हालचाली दुर्बळ आहेत. LUCKY SIGN - A glass jar कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही तयारी चांगली केली नसेल, तर तुम्हाला तुमच्या क्षमतेबाहेर ताणलं गेल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे. तुमचे आई-वडील तुम्हाला साह्य करणारे आहेत आणि नातेवाईक तुमच्यासाठी काही तरी सरप्राइज प्लॅन करत आहेत. तुम्हाला एखाद्या गोष्टीत रस नसला, तर तुम्ही ती गोष्ट नाकारू शकता. LUCKY SIGN - Marigold सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) कामासाठी प्रवास करावा अशी तीव्र इच्छा तुम्हाला आता होत आहे. तुमचे प्लॅन्स प्रत्यक्षात यायला येत्या काही दिवसांत सुरुवात होईल. सध्याचं शेड्यूल अत्यंत व्यग्र असल्यामुळे पुढच्या कमिटमेंट्स देणं तुम्हाला अवघड वाटू शकतं. काही आर्थिक घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. LUCKY SIGN - A bridge कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) मूक राहणं कायमच सोन्यासारखं नसतं, हे आज सिद्ध करायला हवं. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत हस्तक्षेप करण्याची तुमची इच्छा बरोबर आणि योग्य वेळेत होती, असं तुम्हाला वाटेल. तुमच्या जुन्या कामगिरीसाठी कौतुक होईल. खरोखरच अत्यंत गरज असलेल्या व्यक्तीला साह्य करा. LUCKY SIGN - A copper jug तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) क्लायंटकडून कौतुक केलं गेल्यामुळे तुमचा कामाचा उत्साह वाढेल; मात्र आव्हानं कायम राहतील. चांगलं आणि धोरणात्मक टीमवर्क तुम्हाला तुमच्या वैयक्तिक मर्यादांच्या पलीकडे जायला मदत करील. तुमची कौशल्यं सुधारण्याची संधी उपलब्ध होईल. LUCKY SIGN - Bright wall वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) समृद्धी आणि विपुलता या गोष्टी हळूहळू तुमच्या जीवनाचा भाग बनत आहेत. तुमची कामं पूर्ण होत आहेत आणि तुमची उद्दिष्टं साध्य होत आहेत, असं तुमच्या लक्षात येईल. भावनिक पोकळी लवकरच भरून येईल. तुमच्या नव्या सवयीत सातत्य राखा. LUCKY SIGN - A tamarind candy धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखाद्याने जाणूनबुजून तुमच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण केल्या असतील आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल, तर आता त्याला सामोरं जाण्याचा आणि समस्या सोडवण्याचा काळ आहे. भूतकाळात ज्या व्यक्तीने तुम्हाला भावनिकदृष्ट्या त्रास दिला असेल, त्या व्यक्तीला क्षमा करणं कठीण वाटेल. LUCKY SIGN - Silver jewelry मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एरव्ही तुम्ही तुमच्या क्षमतेकडे फारसं लक्ष देत नाही; आता मात्र तुम्हाला ती आजमावून पाहण्याची इच्छा होईल. तुमचे आई-वडील तुम्हाला कशासाठी तरी प्रोत्साहन देत आहेत. तुम्ही अखेर त्याचा विचार करायलाच हवा. आजचा दिवस तुलनेने निवांत आहे. LUCKY SIGN - A pebble कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला थोडं त्रासदायक आणि हतबल झाल्यासारखं वाटत असेल, तरीही आजचा दिवस रिक्रिएशनल आहे. तुमचा जोडीदार तुलनेने समजूतदारपणा दाखवील. संध्याकाळी तुमच्याकडे काही पाहुणे येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Cinnamon मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) मोठे मुद्दे सध्या तरी मागे ठेवले जाऊ शकतात. सुरुवातीला छोटे मुद्दे हाताळा. तुम्हाला विनाकारण ताण आल्यासारखं वाटेल. आजचा दिवस वाद टाळण्याचा आहे. कोणतेही नवे वाद सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी कोणत्याही राजकारणात अडकणं टाळा. LUCKY SIGN - An abstract art
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या