Home /News /astrology /

Daily Horoscope: 'या' राशीसाठी आजच दिवस परफेक्ट; वेळ वाया न घालवता सुरु करा कामं; जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope: 'या' राशीसाठी आजच दिवस परफेक्ट; वेळ वाया न घालवता सुरु करा कामं; जाणून घ्या भविष्य

प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 31 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 31 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून चांगला सल्ला मिळेल. तुमच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांबाबत तुम्ही नशीबवान आहात. रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी थोडा कठीण काळ आहे. परदेशवारी करण्याचा बेत आखत असाल तर तातडीने बुकिंग करणं गरजेचं आहे.

LUCKY SIGN – A Kite

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयांचा फायदा आता होताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल लोक चुकीचा समज करतील. रागावर नियंत्रण ठेवणं आणि वाद टाळणं गरजेचं आहे. एखादं गिफ्ट तुम्हाला भावनिक करेल. तब्येतीच्या समस्या जाणवतील, काळजी घ्या.

LUCKY SIGN – A Red Flag

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

सुरुवातीला ज्या उत्साहाने तुम्ही काम करत होतात, त्याचप्रकारे आताही करण्याची गरज आहे. स्वतःबद्दल थोडा विचार केल्याने फायदा होईल. काही दुर्दैवी घटना घडल्या असतील; मात्र त्यांचा पुढे काही परिणाम होणार नाही. तुम्हाला सर्व स्तरांतून मदत आणि पाठिंबा मिळेल. तुमच्यासाठी तुमचे पालक एक सरप्राइज प्लॅन करत आहेत. तुम्हाला लवकरच ते मिळेल. बाहेर फिरायला जाणं फायद्याचं ठरेल.

LUCKY SIGN – Favourite snack

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

गेल्या वर्षी जी गोष्ट स्वप्नवत होती, ती आता सत्यात उतरू लागेल. तुम्हाला विश्वासू सहकारी मिळतील. संशयी वृत्तीमुळे तुमच्या कामावर परिणाम होईल. मित्र आणि कुटुंबीयांसोबत आध्यात्मिक प्रवास होऊ शकतो. भूतकाळात काही गोष्टींना विलंब झाल्यामुळे तुम्ही दुखावले जाऊ शकता; मात्र आता सर्व गोष्टी आरामात पार पडतील. एखाद्या नवीन प्रोजेक्टची संकल्पना आवडेल.

LUCKY SIGN – A Blue truck

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुमच्या हुशारीला व्यवहारज्ञान आणि कृतीची जोड देणं गरजेचं आहे. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर त्यावर आताच काम सुरू करणं गरजेचं आहे. तुम्हाला इतर लोकांसोबत ओळख वाढवण्याची गरज भासू शकते. कुटुंबाची साथ कायम राहील. तुमच्या योजना अंमलात आणायच्या असतील, तर बाहेरच्या व्यक्तींसोबत त्याबाबत जास्त चर्चा करणं टाळा. गोड खाण्याची इच्छा होईल; मात्र मनावर आवर घाला.

LUCKY SIGN – An Emerald

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

कामाच्या वा गुंतवणुकीच्या बदल्यात भरपूर परतावा मिळवण्यासाठी सातत्य राखणं गरजेचं आहे. एखादी योजना अंमलात आणण्यापूर्वी त्याची ब्लूप्रिंट तयार करणं फायद्याचे ठरेल. तुमच्या सल्ल्यामुळे भूतकाळात काही जणांचा फायदा झाला असेल, ते लोक पुन्हा तुमचा सल्ला मागू शकतात. विविध मार्गांनी फायदा होईल. कुटुंबात एखादी व्यक्ती काही बाबतींत विरोध दर्शवेल. त्याव्यतिरिक्त घरगुती आयुष्यात शांतता असेल. एखादी अडचण समोर आल्यास त्यावर आरामात मात कराल.

LUCKY SIGN – A Brass article

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर अंतिम निर्णय घेण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा. सध्या परिस्थिती अनुकूल नाही. एखाद्या गोष्टीची बोलणी करणार असाल, तर तेदेखील पुढे ढकलणं गरजेचं आहे. दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं टाळल्यास उत्तम. आत्ता घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे कदाचित भविष्यात पश्चाताप होऊ शकतो. तुम्ही ज्या गोष्टीवर बऱ्याच काळापासून काम करत आहात, ती आता आकार घेत आहे. तुम्हाला हवी असणारी उत्तरं मिळवण्यासाठी नियमित ध्यान करणं फायद्याचं ठरेल.

LUCKY SIGN – A Basketball

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

आजचा दिवस हा अगदी ‘परफेक्ट’ आहे. वातावरणातली ऊर्जा तुमच्या योजनांना मदत करणारी आहे. जराही वेळ वाया न घालवता, तुम्ही काम सुरू करायला हवं. शॉपिंग, पेपर सबमिशन अशा सर्व गोष्टी आज तुम्ही यशस्वीपणे करू शकाल. तुमच्या आवडत्या खेळात वेळ व्यतीत कराल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात, ती होण्यास आणखी थोडा वेळ लागेल.

LUCKY SIGN – Violet flowers

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमचा प्रामाणिक हेतू आणि काळजी पाहून आजूबाजूच्यांना आश्चर्य वाटेल. काही वेळा कोणतंही कारण नसताना लोकांना स्वतःहून फोन करणं चांगलं असते. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव पुढे फायद्याचा ठरेल. तुम्हाला शक्य होणार नाही अशा गोष्टींची कमिटमेंट टाळा, अन्यथा तुम्हालाच वेळ उरणार नाही. कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती तुमच्या फोनची वाट पाहत असेल. आज तुमची इच्छा नसली, तरी किचनमध्ये स्वयंपाक करण्यात वेळ व्यतीत करावा लागेल.

LUCKY SIGN – A Butterfly

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

आतापर्यंत ज्या गोष्टी विखुरलेल्या होत्या, त्या आता एकत्रित येत आहेत. आजचा दिवस हा अगदी परिपूर्ण आणि जादुई असेल. विवाहाचे प्रस्ताव येतील, तुटलेले नातेसंबंध पुन्हा जुळण्याबाबत हालचाल होईल. तुटलेले महत्त्वाचे संपर्क पुन्हा प्रस्थापित होतील. काही प्रभावी व्यक्तींची गाठभेट होईल, ज्यांचा भविष्यात तुम्हाला बराच फायदा होईल. तुमचं मत मांडण्यास कचरू नका. एखाद्या हायप्रोफाइल गेट-टुगेदरचं आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN – A Candle stand

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवलं असेल; मात्र तुम्हाला नम्र वृत्ती शिकण्याची अजूनही गरज आहे. तुम्ही बऱ्याच वेळा नम्रपणा विसरून लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागता. तुम्ही आज जे आहात, ते बनण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले असतील; मात्र तुम्हाला प्रत्यक्षात जाणीव आणि आंतरिक चिंतन करण्याची गरज आहे. केवळ भौतिक गोष्टी गोळा करून, आणि भरपूर पैसे कमावून तुम्ही काही सिद्ध केलं आहे असं समजण्याची गरज नाही. रचनात्मक टीकेला सामोरं जाण्याची तयारी ठेवा.

LUCKY SIGN – Calming Music

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

सध्या वारंवार बाहेर फिरायला जाणं टाळण्याची गरज आहे. या गोष्टीमुळे तुमच्या कामावर परिणाम होत आहे. नवीन गोष्ट शिकण्यासाठी, ज्ञान वाढवण्याची आणि तुमचा सीव्ही अपडेट करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. एखाद्या ज्युनियर व्यक्तीला तुमच्यापासून प्रेरणा मिळेल. तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर आता तुमचं लेखन एकत्रित करून ते पब्लिश करण्याचा विचार करा. क्रिएटिव्ह व्यक्तींनाही काही नवीन संधी मिळतील. मानसिक ब्रेक-डाउन टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या.

LUCKY SIGN – A thrilling novel

First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या