मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: भविष्याबद्दलचे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका; असा असेल 27 जुलैचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: भविष्याबद्दलचे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका; असा असेल 27 जुलैचा दिवस? जाणून घ्या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

अचानक एखादी मानसिक वेदनादायी स्थिती किंवा ताण निर्माण झाला, तर तुमच्याकडे ती परिस्थिती हाताळण्याची शक्ती असेल याची तुम्हाला जाणीव होईल. नव्या प्रोजेक्टची संथ गतीने झालेली सुरुवात लवकरच आश्वासक रूप धारण करील. आज घरगुती मुद्द्यांना प्राधान्य द्या.

LUCKY SIGN - Cinnamon bark

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तात्पुरत्या रिलेशनशिप्स शेवटी अंधूक होतील. पाठीमागच्या घटना सोडून द्या आणि त्याचा पुढच्या जीवनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासाचे बेत आखले जाण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A tent

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

कामाच्या ठिकाणी अचानक झालेल्या संवादातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. तुमच्या प्रोफेशनल लाइफमध्ये तुमच्याबद्दल होणाऱ्या गॉसिपकडे तुम्ही दुर्लक्ष कराल. निष्काळजीपणामुळे दैनंदिन रूटीन विस्कळीत होईल.

LUCKY SIGN - A rainbow

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत तुमच्या कल्पनांवरचा आत्मविश्वास कायम राखल्यास तुम्हाला उत्पन्नाचा नवा स्रोत तयार करण्यास मदत होईल. एखादं रोमँटिक प्रपोझल तुमच्याकडे चालून येईल. भविष्याविषयीचे कोणतेही निर्णय अचानक घेताना सावधगिरी बाळगा.

LUCKY SIGN - A lake

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा देऊ इच्छित असाल, तर रिझल्ट्स तुम्हाला अनुकूल असू शकतील. आतापर्यंत थोडा अस्वस्थपणा असला, तर तो आता दूर होईल. बाहेरच्या खाण्यावर जास्त अवलंबून राहणं चांगलं नाही.

LUCKY SIGN - A ferry

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

येत्या आठवड्याबद्दलचे तुमचे प्लॅन्स नेमकेपणाने निश्चित आहेत. लवकरच एखादा मोठा इव्हेंट होणार आहे. हे सगळं काही एकदम मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे संकेत आहेत. तुमची तज्ज्ञता असलेल्या क्षेत्रात नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A turban

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

काही वेळा काही जणांकडून वचनं पाळली जात नाहीत; मात्र त्यावरून लगेच त्यांना जोखलं जाऊ नये. गोष्टी हव्या तशा घडत नसतील, तर वेगळी पद्धत अवलंबली जाऊ शकते. पैशांचा प्रवाह अपेक्षित आहे. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

LUCKY SIGN - Blue tourmaline

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

तुम्ही स्टार्ट-अपमध्ये असलात, तर आवश्यक त्या खर्चाचं तोंडमिळवणी तुम्ही करू शकाल. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही घडामोड घडणं अपेक्षित आहे. जुन्या मित्राची भेट होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

LUCKY SIGN - A sea shell

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्हाला कुटुंबीय किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीकडून सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. लग्नाचं स्थळ येण्याची आणि जुळण्याची शक्यता आहे. आकर्षक राहण्याला तुमचं केव्हाही प्राधान्य असतं.

LUCKY SIGN - Passion fruit

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

काही जुने मित्र तुम्हाला पार्टनरशिपसाठी किंवा नव्या बिझनेस आयडियासाठी तयार करतील. एखादी रोड ट्रिप होईल आणि काही आठवणींचे क्षण तयार होतील. सरकारी अधिकाऱ्यांना काही आव्हानात्मक काळाला सामोरं जावं लागेल.

LUCKY SIGN - A clear quartz

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्हाला एखाद्या आरोपाविरुद्ध लढा द्यावा लागण्याची शक्यता आहे. तुमची लोकांमधली प्रतिमा सुधारेल. कुटुंबाकडून मोठा पाठिंबा मिळेल. अति खर्च करण्याच्या तुमच्या सवयीवर तुम्हाला नियंत्रण मिळवायला हवं.

LUCKY SIGN - Jasmine

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

सध्या तुमच्यावर एखाद्या परिस्थितीचा दुष्परिणाम होत असेल, तर त्यात सुधारणा होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायाकडे पुन्हा एकदा वळून पाहावं लागेल. कामाच्या ठिकाणचा पूर्वीचा सहकारी तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकेल. प्रत्येक गोष्टीची चर्चा प्रत्येकासोबत करू नका.

LUCKY SIGN - A pebble

First published:

Tags: Astrology and horoscope