Home /News /astrology /

Daily Horoscope: वृश्चिक राशीला आज मिळेल आनंदाची बातमी; मीन राशीसाठी अडचणी; असा जाईल दिवस

Daily Horoscope: वृश्चिक राशीला आज मिळेल आनंदाची बातमी; मीन राशीसाठी अडचणी; असा जाईल दिवस

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 2 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 2 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    खास आणि जवळच्या नातेसंबंधांसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न लागतात. तुमच्या जोडीदाराला ते प्रयत्न वारंवार दिसावेत, जाणवावेत अशी त्याची गरज असू शकेल. प्रवाह काही वेळा तुमच्या विरुद्ध असेल, तर बाजूला थांबणं चांगलं. तुमच्या कामाच्या तासांचा पुरेपूर वापर करा.

    LUCKY SIGN - A prism

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    तुम्हाला पुन्हा एकदा आळसावल्यासारखं व्हायला लागलं आहे. त्यामुळे तुम्ही हातातलं काम उगाचच रेंगाळवता. तसंच, उगाच आणि अचानक शॉपिंगमध्येही तुम्ही गुंतता. एकंदरीत पाहता ऊर्जा विखुरलेल्या स्वरूपात आहे.

    LUCKY SIGN - A glass jar

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    कितीही बिझी असलात तर कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात राहिल्यास आवश्यक ते संतुलन साधलं जातं. तुमच्या वेलनेस रूटीनमध्ये आध्यात्मिक कृतीचा समावेश करा. प्रभावी पार्टनरशिपसाठी संधी लवकरच चालून येऊ शकेल.

    LUCKY SIGN - A fountain

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    एखादी नवी व्यक्ती जॉइन होईल आणि तुमचा कामाचा ताण कमी होईल. ही गुड न्यूज आहे. कारण त्यामुळे तुम्हाला प्लॅनिंगसाठी वेळ मिळेल. योग्य वेळी आठवण केल्यास जादा काम वाचू शकतं. खेळल्यास अधिक ऊर्जा मिळेल.

    LUCKY SIGN - An antique clock

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    कोणी तरी प्रभावी व्यक्ती तुमच्या कामाकडे लक्ष देऊल आणि तुमच्याशी संपर्क साधील. तो चांगला रेफरन्स असेल. तुमच्या कामाबद्दल तुम्हालाच शंका वाटू लागली असल्याच्या पार्श्वभूमीवर हे घडेल. तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा.

    LUCKY SIGN - A clear sky

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    तुम्ही पूर्वी कोणाला दुखावलं असेल, तर त्यांनी अद्याप तुम्हाला माफ केलेलं नसावं. तातडीने बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला कदाचित जास्त परिश्रम करावे लागतील. समेट घडवून आणण्यासाठी चांगला दिवस आहे. जवळचे मित्र छोटीशी ट्रिप प्लॅन करू शकतात.

    LUCKY SIGN - Numbers in sequence

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    कामाच्या ठिकाणी घडत असलेल्या घडामोडींवर लक्ष असू द्या. असाइनमेंटमध्ये तुमचा सहभाग भविष्यात फायद्याचा ठरेल. शेजारच्यांकडे आलेल्या काही अडथळ्यामुळे काम विस्कळीत होईल. रोमँटिक बाबतींत आशेचा किरण दिसू शकेल.

    LUCKY SIGN - A silk scarf

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. संथ आणि एकसुरी दिवस नंतर चांगला वाटेल. खूप दमल्यामुळे लवकर झोपाल. लाँग डिस्टन्स कन्व्हर्सेशन्समध्ये गुंताल असे संकेत आहेत.

    LUCKY SIGN - A net

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    एरव्ही अत्यंत शांततामय असलेलं ऑफिसमधलं वातावरण एखाद्या किरकोळ गोष्टीवरून आणि ती नीट हाताळली न गेल्यामुळे बिघडेल. तुम्हाला अतिरिक्त काम मिळू शकेल. एखादा जुना मित्र अचानक, न कळवता येऊ शकतो.

    LUCKY SIGN - Floral pattern

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायची इच्छा असेल तर आजचा दिवस सोपा आहे. दमल्यासारखं वाटणं साहजिक आहे. स्वतःसाठी थोडा ब्रेक घ्या. कोणत्याही कामाचं मूल्यमापन करताना स्वतःच्या फॅक्ट्स योग्य आहेत याची खात्री करून घ्या. तुम्हाला जुना पॅटर्न मोडीत काढल्यासारखं वाटेल.

    LUCKY SIGN - A canvas shoe

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    पार्टनरशिप किंवा कोलॅबोरेशनच्या नव्या संधीसाठी तुम्ही सज्ज राहाल. मार्ग स्पष्ट आणि सरळ दिसेल; मात्र बारकाईने तपशील पाहण्याची गरज आहे. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती कदाचित मार्गदर्शक सूचनांनुसार काम न करण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN - An eagle

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    एखाद्या चांगल्या मित्राला कौटुंबिक विषयात काही मदत लागू शकेल. ज्या व्यक्तीला तुम्ही फार ओळखत नाही, अशा व्यक्तीवर फार टीका करू नका. बचत केलेले पैसे आता उपयोगी पडतील. पैशांचा प्रवाह लवकरच सुरळीत होईल.

    LUCKY SIGN - A new vase

    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या