मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily Horoscope: आ रा रा खतरनाक; या राशींसाठी धमाकेदार असेल वर्षाचा पहिला दिवस; वाचा भविष्य

Daily Horoscope: आ रा रा खतरनाक; या राशींसाठी धमाकेदार असेल वर्षाचा पहिला दिवस; वाचा भविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    तुमच्या एकूण उर्जेमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचं दिसत आहे. आज आळशीपणा कमी करून कृतीवर अधिक भर द्याल. एखादं मोठं काम आज तुमच्याकडून होईल. फक्त इतरांच्या मतांकडे फारसं लक्ष देऊ नका. घरामध्ये एखाद्या गोष्टीची भर घालण्याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल आता नियोजन करू शकता.

    LUCKY SIGN – A Selenite Crystal

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही आधीच तुमच्या मनाची तयारी केली असेल, तर आतापासून पुढे जाऊन नक्कीच ते साध्य कराल. तुम्हाला जेवढी अपेक्षा होती तेवढा पाठिंबा तुम्हाला मिळणार नाही; मात्र तुम्हाला इतरांच्या पाठिंब्याची गरजही नाही. आज मुलांना अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्यांनी न सांगताही काही गोष्टी तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत केल्यास उत्तम.

    LUCKY SIGN – A Solitaire

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    सध्या पैशांची काही प्रमाणात चणचण भासू शकते. तुम्ही अपकमिंग बिझनेसमन असलात, तर एखादं नवं काम मिळण्याची वा नवी ओळख होण्याची शक्यता आहे. एखादी कायदेशीर चर्चा सध्या तुम्हाला संभ्रमात टाकू शकते. आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. याबाबतीत एखादा जवळचा मित्र तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. तुमचं स्टेटस उंचावण्यासाठी एखादी प्रीमियम मेंबरशिप मिळू शकते.

    LUCKY SIGN – Yellow Sapphire

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    कुटुंबीयांकडून मिळालेलं एखादं सरप्राइज तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. पुढचे काही दिवस भरपूर काम असणार आहे. तुम्हाला शक्य आहे त्यापेक्षा अधिक जबाबदारी तुम्ही खांद्यावर घ्याल; मात्र चिकाटीने काम केल्यास त्या पारही पाडाल. वेळेवर मिळालेला एखादा सल्ला तुम्हाला फायद्याचा ठरेल. मैत्रीपूर्ण युतीसाठी एखादा प्रस्ताव येईल. तुम्हाला सध्या सुट्टीची गरज आहे, मात्र त्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल.

    LUCKY SIGN – A Neon light

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    आजचा दिवस हा भरपूर आशा घेऊन उगवेल. काही दिवसांपूर्वीच तुमच्या मनात गोंधळाची परिस्थिती होती; मात्र आज बऱ्याच गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल. आर्थिक गोष्टींबद्दल मोठा दिलासा मिळेल. नवी गुंतवणूक करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल; मात्र, कोणतीही नवीन कमिटमेंट करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.

    LUCKY SIGN – A Canopy

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    तुम्हाला भरपूर सरप्राइजेस मिळणार आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट होऊ शकते, जी दीर्घ काळ तुमच्या सोबत राहील. आराम करण्याची संधी मिळेल. तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींबाबत स्पष्टता येईल. मुलांसोबत बाँडिंग वाढवण्यासाठी आज चांगली संधी आहे. एखादी छोटीशी आनंददायी सहल कराल. अति न खाण्याबाबत आणि आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

    LUCKY SIGN – A Clear quartz

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    एखादा लांबचा प्रवास तुमच्या नशिबात आहे. तुमच्या मनात काय आहे, हे सांगण्यासाठी केवळ दूरचा प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या मनात सध्या बरीच चलबिचल सुरू आहे; मात्र कोणत्या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्यावं हे ठरवता येत नाहीये. कुटुंबीयांवर विश्वास ठेवणंही तुम्हाला सध्या अवघड जात आहे. सध्या कामाच्या ठिकाणीच तुम्हाला मानसिक आराम मिळू शकतो. एखाद्या सेलेब्रिटीशी झालेली भेट प्रेरणादायी ठरू शकते.

    LUCKY SIGN – A blue stone

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    आज तुमचं मन कशातच लागणार नाही. तुम्ही कदाचित आज भरपूर काही करण्याचं ठरवलं असेल; मात्र त्या गोष्टींपैकी एकही गोष्ट करू वाटणार नाही. अर्थात, नेहमीच प्रवाहाविरुद्ध काही करण्याची गरज नसते. कामं पूर्ण करण्याऐवजी भविष्यातलं नियोजन ठरवण्यासाठी आजच्या दिवसाचा वापर करा. छोटीशी विश्रांती घेऊन, मग कामांकडे लक्ष द्या. भूतकाळात केलेल्या एखाद्या गुंतवणुकीमध्ये छोटंसं नुकसान होईल; मात्र कामाच्या ठिकाणाहून बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेली चांगली बातमी मिळेल. त्यामुळे मूड चांगला होईल.

    LUCKY SIGN – A copper bowl

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    इतरांच्या बेजबाबदार वागण्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल. अर्थात, ही तुमच्यासाठी काही नवी गोष्ट नाही. आज मात्र तुम्हाला असं वाटेल, की कदाचित तुम्हीच इतरांना समजण्यात कमी पडत आहात. एखादं गेट टुगेदर आयोजित होऊ शकतं. तुमच्यापासून दूर राहणारी एखादी व्यक्ती तुमची आठवण काढेल आणि तुम्हालाही तिला भेटावं, तिच्याशी बोलावं असं वाटेल. आज उत्स्फूर्तपणे शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN – A Showpiece

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. आज काय करायचं आहे याचं प्लॅनिंग तुम्ही आधीपासून केलेली असेल. तुमच्या नियोजनाप्रमाणेच सगळी कामं पार पाडू शकाल. तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवण्यासाठी योग्य व्यक्ती वा संधी मिळत नाहीये. भावनिकरित्या दबलं गेल्याची जाणीव होईल. कामाच्या ठिकाणी एखादं सकारात्मक सरप्राइज मिळेल. आयुष्यात काही नव्या व्यक्ती येण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN – A glue stick

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    भूतकाळातला तुमचा उत्साह आता परत आला आहे आणि तो आता तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तुम्ही अधिक ग्रेसफुली स्वतःला पुढे नेत आहात. भूतकाळातल्या बऱ्याच बदलांमुळे तुम्ही आता हळूहळू पुढे जात आहात. एखादी व्यक्ती तुमच्यातले चांगले गुण दाखवून देईल, ज्यांचा फायदा तुमच्या कामाच्या ठिकाणी होईल. तुम्हाला कॅमेऱ्याची भीती वाटत नसेल, तर व्हिजुअल माध्यमातून स्वतःला सर्वांसमोर सादर करण्याची ही चांगली संधी आहे. आरोग्य उत्तम राहील.

    LUCKY SIGN – A glow sign

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    कामाशी संबंधित बराच प्रवास घडू शकतो. कामाचा ताण वाढतो आहे आणि नेमून दिलेलं काम करण्यासाठी कोणाची तरी मदत घेण्याची आवश्यकता भासेल. पुढे जात असताना पैशांशी संबंधित बाबींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुमच्या नकळत एखादी योजना शिजू शकते, जी तुमच्यासाठी चांगली नसेल. तुम्ही ज्या व्यक्तीला मित्र समजत होतात, ती व्यक्ती तिच्या खऱ्या भावना व्यक्त करेल. मेडिटेशन करणं जमिनीवर राहण्यासाठी उपयुक्त ठरेल.

    LUCKY SIGN – A Magnet

    First published:

    Tags: Astrology and horoscope