मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: वृषभ राशीसाठी दिवस असेल भन्नाट; तर तूळ राशीसाठी काळजी घेण्याचा सल्ला

Daily Horoscope: वृषभ राशीसाठी दिवस असेल भन्नाट; तर तूळ राशीसाठी काळजी घेण्याचा सल्ला

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) राहिलेली कामं पटकन पूर्ण करण्यासाठी आणि मागची देणी भागवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही सौम्य संसर्ग होण्याची किंवा डोकेदुखीची शक्यता आहे. वादविवादाच्या प्रसंगी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संतुलित दृष्टिकोन भविष्यात उपयुक्त ठरेल. LUCKY SIGN - A garden वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आजच्या दिवसाची ऊर्जा अनुकूल आहे. त्यामुळे नव्या कामांची सुरुवात तुमच्याकडून होऊ शकेल. तुमच्याकडे कोणी कर्जाची मागणी केली, तर नम्रपणे नकार देऊ शकता. स्वतःची काळजी घेणारं म्हणजेच सेल्फ केअर रूटीन अंगीकारा. LUCKY SIGN - Two feathers मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही आतून खूप मजबूत, कणखर असलात, तरी अन्य व्यक्ती आज तुमची अधिक भावनिक बाजू कदाचित अनुभवू शकतील. काम करून घेण्यासाठी वाटाघाटीच्या काही डावपेचांची गरज भासेल. एखादा सहकारी मदत मागण्याची शक्यता आहे. तो खरा गरजू असू शकेल. LUCKY SIGN - Riverside कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी पुनर्भेट होण्याची शक्यता आहे. वातावरणाची साथ न मिळाल्याने बाहेरची कामं न होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या कारणासाठी/कामासाठी मदत करणार असलात, तर तुम्हाला आता संधी दिसू शकेल. प्रवासाची शक्यता आहे. LUCKY SIGN - A handmade paper सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) अचानक, न सांगता पाहुणे येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस गोड खाण्याचा आहे. काही प्रलंबित देणी असल्यास ती पूर्ण होऊ शकतील. तुमच्या सपोर्ट स्टाफमधली व्यक्ती एखादी तक्रार मांडण्याची शक्यता आहे. ती प्राधान्याने सोडवावी. LUCKY SIGN - Pearls कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कामाच्या ठिकाणचं वातावरण आज अनुकूल असेल. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल. घरी आणि ऑफिसमध्येही कागदपत्रं शिस्तबद्ध ठेवा. तुम्हाला पुरेशी झोप न झाल्याचं जाणवेल. रात्री उत्तम झोप मिळेल, याची काळजी घ्या. LUCKY SIGN - Doorstep तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) भावनिक होणं तुम्हाला दुबळं बनवत नाही. तुमचे सबळ मुद्दे पुढे मांडा. एखादी नवी रेसिपी ट्राय करण्यासाठी आणि काही नव्या भागीदारी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी घ्या. LUCKY SIGN - A red stole वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) दुःस्वप्नं म्हणजे वाईट स्वप्नं हा केवळ सबकॉन्शस माइंड अर्थात मनाच्या भीतीचा खेळ असतो. ती गांभीर्याने घेऊ नका. एखादी विरुद्धलिंगी व्यक्ती रूटीनपासून तुमचं लक्ष विचलित करू शकेल. आज एखाद्या जुन्या मित्राला भेटून दिवस स्पेशल करा. LUCKY SIGN - A brick wall धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिस केलं जात असण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी वेळ काढा. महिनाअखेरीला एखाद्या ट्रिपचा योग आहे. रूटीन मेडिकल चेकअप केल्यास उपयुक्त ठरेल. ध्यानधारणा करा. LUCKY SIGN - A neon sign मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आजच्या दिवसावर जुन्या आठवणींचं राज्य असेल. रिअ‍ॅलिटी चेक उपयुक्त ठरेल. भावंडांकडे लक्ष द्या. तुमच्या अधिकारांचं कुठे तरी प्रदर्शन करावं, अशी त्यांची इच्छा असेल. जुन्या दृष्टिकोनासाठी नवं एखादं नियोजन करावं. LUCKY SIGN - A glass bottle कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमची भीती आता नियंत्रणात आहे. आता आणखी वाईट स्वप्नं नाहीत. कारण काळ बदलत आहे. अलीकडच्या काही महिन्यांत तुम्ही जे काही मिळवलं आहे, त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटत आहे. तुमच्याकडे एखादी अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A banyan tree मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही तुमच्या कुटुंबाला भावनिक पाठिंबा देणारी यंत्रणा आहात. त्यांना तुमच्याकडून अधिक वेळ दिला जाण्याची अपेक्षा आहे. एखादी नवी पार्टनरशिप होण्याची, त्यासाठीच्या करारावर सह्या होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आजचा दिवस व्यग्र असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अडथळ्यांचा अनुभव येऊ शकतो. LUCKY SIGN - Birds
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या