मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: मकर राशीसाठी आज धोक्याचा दिवस; तर 'या' राशी आज होणार मालामाल; जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope: मकर राशीसाठी आज धोक्याचा दिवस; तर 'या' राशी आज होणार मालामाल; जाणून घ्या भविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्हाला तत्त्वतः एखादी गोष्ट मान्य नसेल, तर ती करण्याचा प्रयत्न करू नका. योग्य नियोजन केलेली असाइनमेंट चांगल्या पद्धतीने अमलात आणली, तर तुम्ही तुमच्या मिशनच्या अधिक जवळ जाल. कामाच्या निमित्ताने एखादी छोटी ट्रिप होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A Canopy वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आता एखादी छोटी असाइनमेंट तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे; मात्र त्यातून मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. चांगली कामगिरी करण्याबद्दलच्या ताणामुळे तुम्हाला काहीसं नर्व्हस वाटेल. आठवड्याच्या शेवटी पैशांचा प्रवाह दिलासादायक असेल. LUCKY SIGN - A jade plant मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आंतरराष्ट्रीय संधी किंवा क्लायंटच्या माध्यमातून एखादी चांगली बातमी मिळेल. दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या असाइनमेंटला मंजुरी मिळेल. फिटनेससंदर्भातला एखादा संकेत मिळेल आणि तुम्हाला त्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवं. LUCKY SIGN - An iron tower कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमची अशा एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे, की त्या व्यक्तीचा तुमच्यावर प्रभाव पडेल. दक्षता आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर असेल. तुम्ही सावध नसलात, तर एखादी मौल्यवान वस्तू गमावू शकाल. LUCKY SIGN - A cushion सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) अनेक अडथळे आल्यामुळे तुमच्या कामाच्या गतीवर विपरीत परिणाम झाला आहे. नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात तुम्हाला गोष्टींचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. अडकून पडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्या बातमीने तुमचा दिवस चांगला जाईल. LUCKY SIGN - Stripes कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही ज्यात दिरंगाई करत आहात, ते काम आधीच करा. घरातल्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज भासू शकेल. एखाद्या जवळच्या मित्राकडून तुम्हाला सकारात्मक, चांगली बातमी मिळू शकेल. LUCKY SIGN - A coffee outing तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) गुंतवणूक हे काळजीचं कारण बनू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमची टीम अपेक्षेपेक्षा जास्त काम करील. घरच्यापैकी कोणी तुमच्याकडे सल्ला मागायला आलं, तर तुम्ही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. LUCKY SIGN - A rabbit वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) कामामुळे तुम्हाला प्रवासाची संधी मिळू शकेल. आज तुम्हाला घरच्या पातळीवर काही आव्हानांना तोंड द्यावं लागेल. रूटीनमधून तुम्हाला थोडंसं वेगळेपण आणि दिलासा हवा आहे. तो आउटिंगमधून मिळू शकेल. LUCKY SIGN - A football match धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) नव्याने ओळख झालेली एखादी व्यक्ती तुमच्यावरचा लाइमलाइट तिच्याकडे खेचून घेईल; मात्र हे तात्पुरतं असेल. एखादा ऑनलाइन कोर्स किंवा ट्युटोरियल आकर्षक वाटेल आणि करावीशी वाटेल. आत्मविश्वासामुळे तुमची काम करण्याची प्रेरणा कायम राहील. LUCKY SIGN - A solar panel मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) काही त्रासदायक व्यक्तींपासून दूर राहायचं असा तुमचा उद्देश असेल, तर त्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्या. पाठीमागून कोणी तरी वार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमच्या आतल्या आवाजाचं ऐका. LUCKY SIGN - A flower vase कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमची तयारी पूर्ण झाली नसेल. त्यामुळे तुम्हाला काहीसा त्रास होईल, अस्वस्थता वाटेल. तुमच्या उद्दिष्टापेक्षाही जास्त गोष्टींना तुम्ही लक्ष्य करण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षेत्रातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला अगदी आवर्जून लक्षात घेण्यासारखा सल्ला देईल. LUCKY SIGN - A honeybee मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) कोणी तरी दूरवरून रोमँटिक पद्धतीने तुमचं कौतुक करत असेल. नव्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला तुमच्या कामाची व्याप्ती वाढवायला मदत मिळेल. तुम्हाला लवकरच कोलॅबोरेशनची संधी मिळेल. LUCKY SIGN - A turquoise pottery
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या