मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: नवीन प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ; मात्र या राशींनी घ्या काळजी

Daily Horoscope: नवीन प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ; मात्र या राशींनी घ्या काळजी

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखादं चांगलं काम करण्याचा विचार करत असाल, तर आज त्यासाठी उत्तम दिवस आहे. एखादा नवीन प्रोजेक्ट, नवीन काम किंवा नवीन व्हेंचर सुरू करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या स्वयंमूल्यमापनापेक्षा जास्त क्षमता तुमच्यात आहे हे लक्षात घ्या. LUCKY SIGN – A Mirror Image वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही ठरवलेल्या नियमांशी बांधील राहणं आयुष्यात अगदी फायद्याचं ठरेल. तुमच्या तत्त्वांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घेणं सध्या टाळा. LUCKY SIGN – A Silver Candle मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या व्यक्तीसोबत राहण्याचा किंवा पार्टनरशिप करण्याचा विचार करत असाल तर आत्ता चांगली संधी आहे. तुमच्या सर्व योजना सोशल मीडियावर शेअर करू नका. विनाकारण जास्त ताण घेणं टाळा. LUCKY SIGN – A Gemstone कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही लपवत असलेल्या भावना दिसतील. तुम्ही सध्या भावनिकदृष्या दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहात, ज्याची आता खरं तर गरज नाही. तुम्ही स्वतःला वेगळं करून स्वतंत्र होणं गरजेचं आहे. LUCKY SIGN – A Yellow Stone सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या व्यक्तीला भेटलेला नाहीत; मात्र तिच्याकडून तुमचं अगदी जंगी स्वागत होईल. महागड्या वस्तू घेण्याचे विचार येतील. परदेशात फिरायला जाण्याचा विचारही काही व्यक्ती करतील. LUCKY SIGN – A Candle कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) पूर्वीच्या तुलनेत जास्त विचलित असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही असाल, तर भावनांपासून लवकर मुक्त होऊ शकणार नाही. तुम्ही जनतेशी संपर्क असणाऱ्या क्षेत्रात कार्यरत असाल तर तुम्ही निरीक्षणाखाली असू शकता, त्यामुळे सावध राहा. LUCKY SIGN – A Buddha Statue तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमचं घासाघीस करण्याचं कौशल्य आता उपयोगी पडेल. तुम्हाला एखादं काम अगदी परफेक्ट झालेलं आवडतं. त्या बाबतीत तुमचं ज्ञानही चांगलं आहे. या ज्ञानाचा तुम्हाला फायदा होईल. एखादी व्यक्ती तुमच्यापासून अंतर राखून तुमची काळजी घेत आहे. LUCKY SIGN – An Indoor Plan वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या कामाच्या पद्धतीवर किंवा स्वभावावर ज्यांनी आक्षेप घेतला होता, त्या व्यक्तींचं मत बदलेल. रोख रक्कम मिळण्याचं प्रमाण वाढेल. एखाद्या नवीन प्रोजेक्टची लवकरच सुरुवात कराल. LUCKY SIGN – A Chamber धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही जो परिणाम साधला आहात, त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. एखाद्या नवीन संकल्पनेवर विचार करत असाल, तर लवकरच त्याचा फायदा होणार आहे. एखाद्या बाबतीत माघार घेण्यासाठी योजना तयार ठेवा. LUCKY SIGN – A Climber मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आजचा दिवस काहीसा संमिश्र असणार आहे. तुमच्या विश्वासातली एखादी व्यक्ती तुमच्या गुप्त दोष्टी दुसरीकडेही सांगत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून राहणं कमी करा. लवकरच एखाद्या रोड ट्रिपचं आयोजन होईल. LUCKY SIGN – A Butterfly कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही तुमचं काम अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी थोडा वेळ लागेल. योग्य संधी येण्याची वाट बघा. जोडीदार देत असलेला कोणताही सल्ला सध्या उपयोगी वाटणार नाही. LUCKY SIGN – Canvas मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) भूतकाळातल्या काही कृत्यांबद्दल तुम्हाला भरपूर पश्चाताप होईल. तुमचा जोडीदारदेखील त्या गोष्टींची तुम्हाला सारखी आठवण करून देईल; मात्र नशीब तुम्हाला लवकरच आणखी एक संधी देणार आहे. LUCKY SIGN – Two Feathers
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या