मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: तुमच्या मौल्यवान गोष्टी आज ठेवा सांभाळून; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

Daily Horoscope: तुमच्या मौल्यवान गोष्टी आज ठेवा सांभाळून; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)दुर्लक्ष तुम्हाला एखादं छोटंसं काम मिळेल; मात्र त्यातूनच पुढे मोठ्या संधी उपलब्ध होतील हे लक्षात घ्या. चांगल्या परफॉर्मन्सची चिंता सतावेल. आठवड्याच्या शेवटी कॅश फ्लो दिलासादायक असेल. LUCKY SIGN – A Canopy वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही एखाद्या गोष्टीशी सहमत नसाल, तर ती गोष्ट करू नका. एखादी नियोजित असाइनमेंट तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ नेईल. कामासाठी एखादी छोटीशी सहल होईल. LUCKY SIGN – A Jade Plant मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या नवीन व्यक्तीशी भेट होईल. त्या व्यक्तीवर तुमची छाप पडेल. तुम्ही योग्य खबरदारी घेतली नाही, तर एखादी मौल्यवान गोष्ट गमावून बसाल. सध्या अधिक सतर्क राहण्याची वेळ आहे. LUCKY SIGN – An Iron tower कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादी आंतरराष्ट्रीय संधी चालून येईल किंवा एखाद्या क्लायंटकडून चांगली बातमी मिळेल. एखादं बहुप्रतीक्षित काम तुम्हाला मिळेल. प्रकृतीची एखादी समस्या उद्भवेल, ज्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. LUCKY SIGN – A Cushion सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही ज्या गोष्टी पुढे ढकलत होतात, त्या आता वेळेपूर्वीच करण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या घरगुती गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं ठरेल. एखाद्या जवळच्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल. LUCKY SIGN – Stripes कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) भरपूर अडथळ्यांमुळे तुमच्या कामाच्या गतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तुम्हाला एरव्हीपेक्षा अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखादं अडकलेलं पेमेंट मिळाल्यामुळे आनंदी असाल. LUCKY SIGN – A Coffee Outing तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याची तुमच्यापेक्षा अधिक चर्चा होईल; मात्र हे काही काळापुरतंच असेल. एखादा ऑनलाइन कोर्स किंवा ट्युटोरिअल कराल. आत्मविश्वास भरपूर राहील. LUCKY SIGN – A Rabbit वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखाद्या गुंतवणुकीमुळे चिंता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची टीम तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगलं काम करील. घरातल्या एखाद्या व्यक्तीचा सल्ला गांभीर्याने घ्या. LUCKY SIGN – A football match धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कामासाठी प्रवास घडेल. घरी काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला सध्या दैनंदिन जीवनात ब्रेक घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बाहेर फिरायचा जाण्याचा प्लॅन फायद्याचा ठरेल. LUCKY SIGN – A Solar Panel मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या गोष्टीसाठी तुमची तयारी अपूर्ण असेल, ज्यामुळे चिडचिड होईल. तुमच्या आवाक्याबाहेरचं उद्दिष्ट ठेवाल. तुमच्या इंडस्ट्रीमधली एखादी वरिष्ठ व्यक्ती अगदी मोलाचा सल्ला देईल. LUCKY SIGN – A Flower vase कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला काही त्रासदायक व्यक्तींपासून दूर राहायचं असेल, तर त्यादृष्टीने प्रयत्न करा. तुमच्या मागे घडणाऱ्या काही गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. तुमचं मन सांगेल ते ऐका. LUCKY SIGN – A Honeybee मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखादी व्यक्ती दूरवरून रोमँटिक पद्धतीने तुमचं कौतुक करत आहे. कामाच्या ठिकाणी वेगळा दृष्टिकोन ठेवल्यास प्रगती होईल. लवकरच भागीदारीची संधी प्राप्त होईल. LUCKY SIGN – A Turquoise Pottery
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या