मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: रिलेशनशिपमध्ये धोका आणि प्रचंड अडचणींचा आजचा दिवस; गोंधळातून बाहेर या

Daily Horoscope: रिलेशनशिपमध्ये धोका आणि प्रचंड अडचणींचा आजचा दिवस; गोंधळातून बाहेर या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आजचा दिवस आर्थिक स्वरूपाची चांगली बातमी घऊन येईल. अलीकडच्या काळात तुमच्या आजूबाजूला घडलेल्या घटना पाहून तुम्हाला भरून येईल. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती अचानक अडचणीत येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A kite वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखादी नवी व्यक्ती मोठ्या प्रमाणावर लक्ष विचलित करील. गोंधळाच्या Receiving End ला तुम्ही आहात, असं तुम्हाला वाटेल. नवा गोंधळ होण्याच्या आधी या गोंधळातून बाहेर या. जे करणं तुम्हाला शक्य होणार नाही, अशा गोष्टीचं वचन देणं टाळा. LUCKY SIGN - A windmill मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही नुकत्याच पूर्ण केलेल्या एखाद्या असाइनमेंटमुळे तुम्हाला थकून गेल्यासारखं वाटेल. तुम्हाला पुढच्या आयुष्याचं नियोजन करण्यासाठी, उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासाठी काही स्पेसची गरज आहे. एखादी गरजू व्यक्ती तुमच्या माध्यमातून अ‍ॅक्सेस मिळण्यासाठी वाट पाहत असण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A silver wire कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही तुमच्यासाठी शॉपिंगचं नियोजन केलं असेल, तर तुम्ही त्यात गुंतून पडत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. कामाच्या ठिकाणी डेडलाइन्स पाळाव्या लागतील. घरगुती मदतनीसाकडून दैनंदिन कामात अडथळे निर्माण होतील. LUCKY SIGN - Silverware सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही पूर्वी नाकारलेला एखादा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होऊ शकेल. एखाद्या गोष्टीचं अति विश्लेषण केल्यामुळे अपेक्षित रिझल्ट्स मिळणार नाहीत. आजच्या दिवसात तुम्हाला काही तांत्रिक अडचणींना तोंड द्यावं लागेल. बॅकअप घेऊन ठेवायला विसरू नका. LUCKY SIGN - A wooden stick कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आव्हानात्मक काळात तुम्हाला अचानक एखादी सपोर्ट सिस्टीम सापडेल. एखाद्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाल्यास तातडीने काही परिणाम होऊ शकतात. सध्या तुम्हाला खूप घाई असल्यासारखं वाटेल. ते शांत होण्यासाठी वेळ द्या. LUCKY SIGN - A clay jar तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखाद्या गेट-टुगेदरमुळे तुम्हाला स्वतःला मोकळं होण्याची संधी मिळेल. काही इंटरेस्टिंग संवादही होतील. तुमचं कौतुक करणारी, तुमची बाजू घेणारी व्यक्ती या वेळी तुमचं लक्ष वेधून घेईल. तुम्हाला ज्या स्पेसची बरीच गरज आहे, ती तुम्हाला लाँग वॉकद्वारे मिळू शकेल. मेडिटेशन करा. LUCKY SIGN - A gold net वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्ही एखाद्या अधिकारपदावर असल्याचं तुमच्या लक्षात येईल. पैसे अधिक अ‍ॅक्सेसिबल असू शकतात. एखाद्या गोष्टीची तुम्ही तीव्र इच्छा बाळगलीत, तर ती गोष्ट लवकरच तुम्हाला अनुकूल घडू शकेल. कुटुंबातल्या कोणाहीसोबत वाद टाळा. LUCKY SIGN - Storage trunk धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्हाला देण्यात आलेलं काम कदाचित पुढे ढकललं जाईल किंवा तुम्हाला वेळेची कमतरता भासेल. त्यामुळे आधीच तयारीत राहणं उत्तम. तुम्हाला वडिलांनी काही काम दिलं असेल, तर तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या शारीरिक कृती आणि मानसिक स्थिती यांचा ताळमेळ असू द्या. LUCKY SIGN - A bubble wrap मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कोणत्याही प्रकारचा प्रवास तुमच्या मनाला बरीच शांतता देईल. काही जुने मित्र तुम्हाला या आठवड्यात भेटू इच्छितात. तुम्ही तुमचे विस्कळीत विचार प्रयत्नपूर्वक एकत्र केले पाहिजेत. LUCKY SIGN - A paper cup कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या कामाचं नव्या व्यक्तीकडून कौतुक होईल. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये काही हादरा बसला असेल, तर ती स्थिती सुधारण्याच्या संधी आहेत. कोणाच्या तरी तोट्यामुळे कोणाचा तरी फायदा होऊ शकेल. LUCKY SIGN - Peach roses मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या वैद्यकीय कारणामुळे तुमचं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. तुमच्यासोबत काम करणाऱ्या एखाद्या अगदी जवळच्या सहकाऱ्याला काही कौटुंबिक अडचणी येऊ शकतील. तुमच्या आयुष्याचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. LUCKY SIGN - A yellow cloth
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या