मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: मीन राशीसाठी आज लग्न जुळण्याचे योग तर कन्येला होणार 'हा' त्रास; काय सांगते तुमची रास

Daily Horoscope: मीन राशीसाठी आज लग्न जुळण्याचे योग तर कन्येला होणार 'हा' त्रास; काय सांगते तुमची रास

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 14 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीचा विषय असू शकतो; पण तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून पटली तर तुम्ही बहुतांश वेळा ती पूर्ण करता. तुमची खेळातली आवड तुम्हाला काही ठिकाणी घेऊन जाऊ शकते. तुमच्या वैयक्तिक हितसंबंधांसह तुमच्या कामाच्या ठिकाणच्या योजना कार्यान्वित करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही आपल्या टीममध्येच असावं, अशी इच्छा असलेली एखादी व्यक्ती तुमच्यासाठी लॉबिंग करू शकते. LUCKY SIGN – A mask वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या संस्थेकडून तुम्हाला त्वरित प्रतिसाद मिळू शकतो आणि तुमची निवड होण्याची शक्यताही खूप जास्त आहे. तुम्ही तुमच्या क्षमता चांगल्याच ओळखून आहात. त्यामुळेच तुम्ही एखादं ठरावीक ध्येय गाठायची अपेक्षा बाळगून आहात. यासाठीच्या शक्यताही खूप चांगल्या आहेत. तुमच्या यशात तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाचा मोठा भाग आहे. तुमची स्वप्नं प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तुम्हाला एखाद्या स्पॉन्सररची मदतही तुम्हाला मदत होऊ शकेल. नवीन प्रकल्प अधिक आकर्षक वाटू शकतात. LUCKY SIGN – A tubewell मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) स्वत:चा व्यवसाय सुरू करणं हे तुमचं स्वप्न आहे आणि त्या दिशेनं तुम्ही प्रचंड मेहनत करत आहात. कितीही लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी असल्या तरी तुम्हाला वेगळा विचार करायला त्या भाग पाडणार नाहीत. या व्यवसायाशी संबंधित भविष्यातल्या नियोजनाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येतो. त्याशिवाय तुमच्या मार्गात एखादी नवी गोष्ट आली तर ती पूर्णपणे नाकारू नका, त्यावर किमान दृष्टिक्षेप टाका. काही वेळ तग धरू शकाल इतकी पुरेशी बचत तुमच्याकडे आहे. LUCKY SIGN - A sports model कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्हाला आतापर्यंत तुमच्या स्वत:च्या मनाच्या स्पष्टतेबद्दल आणि अंत:प्रेरणेबद्दल कल्पना आली असेल. नेमकं काय करायचं आहे याचे संकेत त्यातून मिळत असतील. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हाच विचार प्रामुख्याने तुमच्या मनात असू द्या. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या तुमच्यापैकी काही जणांना खूप काळ ज्याची प्रतीक्षा होती अशी छाप पाडता येईल. ज्या व्यक्ती प्रयत्न करतात किंवा त्याच्यासाठी वाट पाहतात त्यांचीच स्वप्नं पूर्ण होतात. तुमच्या कामाचं लवकरच कौतुकही होईल. लवकरच एखादी संस्मरणीय ट्रिपही होऊ शकते. LUCKY SIGN – A ceramic vase सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) खासगी संभाषणं सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीमध्ये करणं टाळा. अचानकपणे एखाद्या प्रकरणात गुंतलं गेल्याचं तुमच्या लक्षात येईल. आजचा दिवस संमिश्र भावनांचा आहे. तुमच्याकडे आकर्षित झालेली एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. तुम्ही भावनिकदृष्ट्या असुरक्षित असल्याचं तुम्हाला जाणवेल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा गोंधळ होत असेल, तर तो निर्णय लांबणीवर टाका. दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा. LUCKY SIGN – Red color कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या मार्गात एखादी इंटरेस्टिंग गोष्ट येण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा तुम्ही विचारही केला नसेल किंवा ती तुम्हाला अपेक्षितही नसेल आणि ती मुख्य प्रवाहातही नसेल. या प्रस्तावावर तुम्ही गांभीर्यानं विचार केलात तर तो खूप इंटरेस्टिंग असू शकेल. सगळ्यांकडून मिळणाऱ्या सल्ल्यांचं स्वागत करा. सर्वांना त्यांचं मत व्यक्त करण्याची परवानगी आहे. शेवटी काय निर्णय घ्यायचा हे तुमच्यावर आहे. कायदेशीर क्षेत्रात असणाऱ्यांसाठी येणारे काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत. LUCKY SIGN – A smart watch तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) स्पर्धात्मक असणं ही एक गोष्ट आहे; पण त्यासाठी नियोजन करणं किंवा कट रचणं किंवा अगदी षडयंत्र रचणं हे कोणाच्याही हिताचं नाही, अगदी तुमच्याही नाही आणि तुम्ही ज्याच्यासाठी नियोजन करत आहात त्याच्यासाठीही हे चांगलं नाही. तुमच्या व्यवहारामध्ये पारदर्शक आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे. तुमच्या जवळच्या कुणाचा तरी प्रेमभंग होण्याची शक्यता आहे आणि ती व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येऊ शकते. आरोग्यदृष्ट्या नाजूक परिस्थिती आहे आणि त्यामुळे चिंता वाढू शकते. अर्थात ही परिस्थिती तात्पुरती आहे आणि काळ जाईल तशी परिस्थितीत सुधारणा होईल. LUCKY SIGN – A patterned cushion वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्हाला फायदा होतो. तुमच्या नेटवर्कमुळेही तुमचा लाभ होतो. त्याच वेळी काही जणांच्या विश्वासार्हतेचा प्रश्नही तुम्हाला भेडसावेल. वरिष्ठ किंवा अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. खूप पायपीट करायला लागू शकते अशीही शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमचा सर्वांत मोठा टीकाकार आणि सपोर्ट सिस्टीमही आहे. एखादी प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याबद्दलची प्राथमिक बोलणी होऊ शकतात. LUCKY SIGN – An embroidery work धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखादी गोष्ट करण्यात काही जणांना कमीपणा वाटतो किंवा ते ती गोष्ट पूर्ण करण्यास सक्षम नसतात. तुम्हाला एखादी गोष्ट करण्यात कमीपणाही वाटत नाही किंवा तुम्ही सक्षम नाही असंही तुमच्याबाबतीत नाही. त्यामुळे आता तुमचा आत्मविश्वास परत मिळवा. तुमच्यासमोर जे आहे त्यासाठी सज्ज व्हा. कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका आणि तुम्ही पुन्हा एकदा यशस्वी होण्यात यश मिळवाल. तसंच पूर्ण माहिती करून घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट थेट फेटाळू नका. येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही आणखी धाडसी पावलं उचलताना दिसाल. LUCKY SIGN – A peacock मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) भूतकाळातले काही कडवट अनुभव पुन्हा येऊ शकतील; पण अर्थात ते अगदी तसेच्या तसेच नसतील. त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही; पण तुम्हाला कदाचित परत त्या गोष्टींना उजाळा द्यावा लागेल. चांगल्या अनुभवांसाठी आता नवीन गोष्टी तुमच्यासमोर येणार आहेत. एखाद्या उच्चभ्रू गटामध्ये तुमच्या कंपनीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी लवकरच तुम्हाला मिळणार आहे. पारदर्शकपणा ठेवा. कारण पारदर्शकपणामुळे अनेक जण तुमचं कौतुक करतील. LUCKY SIGN – A celebrity कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) एखादं संकट आलं तर तुम्ही एकाकी पडाल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तशी परिस्थिती नाही. काळ अत्यंत लवचिक असतो आणि तो सगळ्यांसाठी बदलत असतो. तुमच्या भूतकाळात डोकावून बघा आणि तुमच्या चुकांचा आढावा घ्या. तुमच्या स्वभावात काहीही बदल न करताही त्या तुम्हाला दिसू शकतील. एखाद्या आध्यात्मिक किंवा धार्मिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे ट्रिप घडू शकते. तुमचा कुठे तरी हरवलेला उत्साह तुमचे मित्र-मैत्रिणी तुम्हाला परत मिळवून देतील. LUCKY SIGN – A fancy car मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमचं लग्न अजून झालं नसेल तर ते जुळण्याची भरपूर शक्यता आहे. किती तरी निवडलेल्या जोडीदारांमधून नतुम्ही तुमच्यासाठी नियतीने ठरविलेल्या जोडीदाराचीच निवड करू शकाल. तुम्हाला जे हवं आहे तेच तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीलाही हवं असू शकेल आणि आपण तुमच्याएवढे नशिबवान नाही असं त्याला वाटेल. ज्या लोकांना सतत मत्सर , हेवा वाटतो किंवा जे विषारी विचार पेरत राहतात त्यांच्यापासून सावधान राहा. काही वेळा नकारात्मक विचार तुम्हाला आयुष्यात काही पावलं मागे घेऊन जातील. LUCKY SIGN – Tree of life
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या