मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: कायदेशीर गोष्टींमध्ये आज मिळेल दिलासा; प्रवास करणार असाल तर जरा थांबा; असा असेल आजचा दिवस

Daily Horoscope: कायदेशीर गोष्टींमध्ये आज मिळेल दिलासा; प्रवास करणार असाल तर जरा थांबा; असा असेल आजचा दिवस

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 12 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 12 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 12 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 12 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) सध्या भरपूर वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यामुळे तुम्हाला आपल्या गतीवर थोडं नियंत्रण आणणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीत तुम्हाला अचानक रस आलेला पाहून इतरांना आश्चर्य वाटेल. एखाद्या दुसऱ्या स्रोतातून चांगली कमाई होईल. LUCKY SIGN – A Constellation वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या विषयातला तुमचा रस वाढण्याचं मुख्य कारण हे तुम्हाला वाटतं ते नसेल. झोपेत काही त्रासदायक स्वप्नं पडू शकतात. दिवसाही त्यांबद्दल विचार कराल. एखादी सवय सोडवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आता यश मिळेल. LUCKY SIGN – A Hat मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखादी व्यक्ती तुमचं नीट निरीक्षण करत असू शकेल. कदाचित तुमच्यावर कोणी तरी पाळत ठेवतंय असं वाटेल; मात्र ती व्यक्ती हे केवळ कुतुहलापोटी करत असण्याची शक्यता आहे. तुमच्या खासगी गोष्टी किंवा बाबी ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना सांगू नका. LUCKY SIGN – Lukewarm Water कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमची नियोजन खरोखरच चांगलं असतं, तर आतापर्यंत तुम्हाला अपेक्षित निकाल मिळायला हवा होता. त्यामुळे आता तुमची स्ट्रॅटेजी बदलण्याची वेळ आली आहे. एखादी नवी संकल्पना वरिष्ठांना आवडेल. घरामध्ये काही तणावाचं वातावरण राहील; मात्र लवकरच परिस्थिती सुधारेल. LUCKY SIGN – A New shoe सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) भूतकाळातली एखादी व्यक्ती आयुष्यात पुन्हा येईल; मात्र तुम्ही त्या व्यक्तीकडे पाठ फिरवाल. तुम्ही कामामध्ये व्यग्र राहाल; मात्र एकटेपणाही जाणवेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीने केलेल्या कृत्यामुळे आनंदी व्हाल. LUCKY SIGN – A Diamond Ring कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कामाच्या ठिकाणात झालेला बदल चांगला ठरेल. कदाचित प्रवासात काम कराल किंवा एखाद्या दूरच्या ठिकाणी जाल. ऑफिसमधली एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करील. तुम्ही केलेली छोटीशी गोष्टही मोठा परिणाम साधेल. LUCKY SIGN – An Eclipse तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) घरामधल्या एखाद्या व्यक्तीला तिच्याकडे दुर्लक्ष होत असल्यासारखं वाटेल. एखादा जुना फोटो किंवा आठवण यामुळे दडलेल्या भावना बाहेर येतील. तुमच्या संकल्पना नेहमीच हटके असतात. त्या सादर करण्याची संधी लवकरच मिळेल. स्वतःहून संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN – A Headphone वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्हाला लवकरच व्यक्त होण्याची संधी मिळेल. तुम्ही आधीच जी गोष्ट प्लॅन केली आहे, त्यावर पुन्हा विचार करणं तुम्हाला आवडणार नाही. विदेश दौरा तुम्हाला एखादी नवीन गोष्ट समजण्यास मदत करील. तुमच्या दिनचर्येत खंड पडू देऊ नका. LUCKY SIGN – A Terracotta Basin धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखाद्या कामाची डेडलाइन आता जवळ आली आहे. त्यामुळे आणखी प्रयत्न करणं गरजेचं आहे. घरगुती बाबतीत आशेचा एक किरण दिसून येईल. तुमचं लक्ष्य साध्य करण्यासाठी एखाद्या तरुण व्यक्तीचं धोरण तुम्हाला प्रेरणा देईल. LUCKY SIGN – A Silicon Tray मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या व्यक्तीला तुमचा भरपूर मत्सर वाटेल. तुम्हाला अशा व्यक्तींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या नवीन सवयीचे परिणाम अपेक्षेपेक्षा लवकर दिसून येतील. तुम्हाला अधिक लवचिक होण्याची गरज आहे. LUCKY SIGN – A Candle कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) कायदेशीर प्रकरणांमध्ये काहीसा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करील. एखादी मोठी घोषणा करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. मेडिटेशन केल्यामुळे फायदा होईल. LUCKY SIGN – A Candy मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टींचा पॅटर्न तुमचं लक्ष वेधून घेईल. तुमचं लक्ष्य आता जवळ आलं आहे असं वाटेल; मात्र त्यासाठी आणखी वेळ लागेल. तुमचं लक्ष नसताना कदाचित एखादी संधी दार ठोठावेल. LUCKY SIGN – A Yellow Crystal
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या