मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: जे मनात येईल ते आज उतरेल प्रत्यक्षात; या राशींसाठी अत्यंत आनंदाचा आजचा दिवस

Daily Horoscope: जे मनात येईल ते आज उतरेल प्रत्यक्षात; या राशींसाठी अत्यंत आनंदाचा आजचा दिवस

रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा आहे वाचा... 11 ऑगस्टचं भविष्य..

रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा आहे वाचा... 11 ऑगस्टचं भविष्य..

रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा आहे वाचा... 11 ऑगस्टचं भविष्य..

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 11 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखादा प्लॅन किंवा सेलिब्रेशन अचानक ठरू शकतं. नवीन गुंतवणूक आणि भागीदारी होऊ शकते. वाटाघाटी करताना संयम बाळगा. महत्त्वाच्या गोष्टींचं पुनरावलोकन करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. LUCKY SIGN – A Mannequin वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) भूतकाळात तुम्ही भरपूर भावनिक तणावाला सामोरे गेला असाल, तर आता तो तणाव कमी होऊ लागेल. भूतकाळातल्या काही परंपरा अडथळा ठरतील. मन शांत करण्यासाठी आणि स्पष्टता मिळण्यासाठी चालणं फायद्याचं ठरेल. LUCKY SIGN – A Role Model मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आज एखादा प्लॅन बदलल्यामुळे संपूर्ण दिवसच बदलेल. एखाद्या समारंभाचं आमंत्रण मिळेल. तिथे नवीन व्यक्तीशी ओळख होईल. या ओळखीचा भविष्यात फायदा होईल. बाहेर खाणं टाळा. LUCKY SIGN – A Silver String कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी काहीसं नर्व्हस वाटेल; मात्र नशीब तुमच्या बाजूने आहे. एखादा निर्णय अंमलात आणण्याबाबत तुमच्या मनात गोंधळ असेल. स्पष्टता मिळवण्यासाठी आणखी काही वेळ घ्या. LUCKY SIGN – A Rose Plant सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आजचा दिवस तुमच्या अटींनुसार गोष्टी पूर्ण करून घेण्याचा आहे. इतरांसोबत नैतिक स्पर्धा होईल. परिणामी तुमचं भरपूर कौतुक होऊ शकतं. आज केलेल्या कामाचं फळ तुम्हाला लवकरच मिळेल. LUCKY SIGN – A Sunrise कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) दिवसाची सुरुवात संथ गतीने होईल; मात्र दुपारनंतर वेगाने घडामोडी घडतील. दैनंदिन कामाचा ताण जाणवेल. स्वतःला थोडी मानसिक स्पेस देऊन हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी आनंदी वातावरण राहील. LUCKY SIGN – A Tall Building तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमचा अनेक वर्षांचा अनुभव सध्याची स्थिती नीट हाताळण्यासाठी उपयोगी पडेल. तुमच्या हातून एखादी खूप चांगली गोष्ट घडेल. तुमच्यावर अवलंबून असणारी एखादी जवळची व्यक्ती संकटात सापडू शकते. LUCKY SIGN – A Tan Wallet वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्ही ज्या व्यक्तीशी कमिटेड आहात, तिच्यासाठी गरजेच्या वेळी उपलब्ध असणं हे तुमचं मुख्य कर्तव्य आहे; मात्र हीच गोष्ट होत नसल्यामुळे तुमच्यातले वाद वाढत आहेत. प्रॉपर्टी डीलिंग व्यवसायातलया व्यक्तींनी चांगली वेळ येण्याची वाट पाहावी. LUCKY SIGN – An Emerald धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) आज विविध प्रकारच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. या संधी लहान असल्या, तरी तुमचं लक्ष वेधून घेतील. रखडलेले निर्णय पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. कॉल आणि मेसेजेसना उत्तर देण्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. LUCKY SIGN – A Golden Embroidery मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आज दिवस अगदी सर्वसाधारण, मात्र चांगला असेल. भविष्यासाठी योजना आखण्यासाठी आज वेळ व्यतीत कराल. एखादा मित्र अचानकपणे भेटेल. त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल. आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. LUCKY SIGN – A Honeybee कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आज एखाद्या व्यक्तीची प्रमाणापेक्षा जास्त आठवण येईल; मात्र सध्याची सत्य परिस्थिती स्वीकारून त्यात समाधान मानणं गरजेचं आहे. एखादी आकर्षक संधी तुमच्या दिशेने येत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्याला नवं वळण मिळेल. LUCKY SIGN – A Jute Bag मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यामुळे तुम्ही दुखावले जाण्याची शक्यता आहे; मात्र या भावना मनात ठेवल्यामुळे चिंता सतावे. त्यामुळे या भावना लिहून पाठवणं फायद्याचं ठरेल. याबाबत तुमचं गुपित माहिती असलेल्या एखाद्या जवळच्या मित्रावर विश्वास ठेवू शकता. LUCKY SIGN – A Lake
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या