Home /News /astrology /

Daily Horoscope: प्रवासाचे योग आणि थरारक बातमी मिळण्याचे योग; आज तुमची रास देतेय हे संकेत

Daily Horoscope: प्रवासाचे योग आणि थरारक बातमी मिळण्याचे योग; आज तुमची रास देतेय हे संकेत

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) हिशेबात झालेली छोटीशी चूकही तुमचे सगळे श्रम पाण्यात नेऊ शकते. कोणत्याही सूचना देताना तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कुटुंबातल्या कोणाला तरी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A diamond ring वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमची भूतकाळातली कृत्यं आता तुमचा पिच्छा पुरवणार आहेत. तुम्ही सध्या संवेदनशील, हळव्या काळात आहात. नवे बंध तयार करणं, नवे नातेसंबंध तयार करणं यावर तुम्ही आता काम करायला हवं. LUCKY SIGN - Mustard cushion मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या अगदी हृदयाशी जपून ठेवावेत असे अनेक क्षण आहेत आणि सध्याचा क्षण त्यापैकीच एक आहे. नव्या प्रवासासाठी तयार राहा. नोकरीत बदल होऊ शकतो किंवा कामाच्या जागेत बदल होऊ शकतो, असे संकेत आहेत. LUCKY SIGN - A silk scarf कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) बऱ्याच काळानंतर तुमचं कुटुंब एकत्र येत आहे. त्याचा आनंद तुम्ही साजरा केला पाहिजे. प्रवास करताना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही अधिक स्ट्रीट-स्मार्ट होण्याची गरज आहे. LUCKY SIGN - A bird cage सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्याला सहानुभूती दर्शवणारी कृती केल्यास ती व्यक्ती नाराज होऊ शकते. जो कोणी तुमच्यासाठी काम करत आहे, तुमच्या बाजूने काम करत आहे, त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहिलं पाहिजे. तुमचं पॅशन अगदी निष्ठेने पाळलं, तर अधिक चांगले विचार तुमच्या मनात येतील. LUCKY SIGN - Granite stone कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही सिंगल असलात, तर तुमची गाठ एखाद्या समविचारी व्यक्तीशी पडण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या गोष्टी केवळ स्वतःपाशीच ठेवायला तुम्ही शिकलं पाहिजे. चांगला सहवास असेल तर बराच फरक पडेल. LUCKY SIGN - A crystal jar तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखादी नवी प्रगल्भ व्यक्ती आकर्षक वाटू शकते; मात्र हे आकर्षण फसवं असू शकतं. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते दोनदा तपासून घेण्याची सवय लावली पाहिजे. गायनाच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तीला चांगला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Cast iron वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखाद्याचा तुमच्यावरचा विश्वास उडाला असेल, तर केवळ कृतीच उपयुक्त ठरू शकते, शब्द त्यात बदल घडवू शकत नाहीत. ऑफिस पॉलिटिक्सकडे तुम्ही गांभीर्याने पाहायला हवं. कोणी तरी तुमच्या पाठीमागे गॉसिप करत असावं. LUCKY SIGN - Silver jewelry धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्ही एखादं ध्येय किंवा व्यक्तीच्या पाठीमागे धावत असाल, तर त्यांचं आता तुमच्याकडे थोडं लक्ष जाईल. अजूनही त्यावर वेळ वाया घालवणं योग्य नाही. तुमची आतली भावना तुम्हाला खरं चित्र दाखवील. LUCKY SIGN - A money plant मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्यापैकी अनेकांचा दिवस यथातथाच जाईल. फारसं काही साध्य होणार नाही; पण हा कदाचित प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीचा छोटा ब्रेक असू शकेल. बऱ्याच काळानंतर आता काही तरी वाचनाची शिफारस केली जात आहे. LUCKY SIGN - A silicon mould कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) नफ्या-तोट्याच्या परिस्थितीमुळे कामाच्या ठिकाणच्या नातेसंबंधांत ढवळाढवळ होऊ शकते. तुम्ही कोणत्या बाजूला राहायचं याचा निर्णय घ्यावा लागेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्याशी काही तरी महत्त्वाचं शेअर करायचं आहे. खूपच मागण्या करत राहिलं, तर अन्य व्यक्ती निराश होऊ शकते. LUCKY SIGN - A honeybee मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) दुसरा विचार केलेल्या व्यक्तीचं मन वळवण्यात, त्याला आनंदी करण्यात तुम्ही कदाचित यशस्वी होणार नाही. तुमच्या आजूबाजूच्या इंटरेस्टिंग व्यक्ती तुमचा वेळ वाया घालवत आहेत. तुमचं ध्येय सध्या तरी अस्पष्ट दिसत आहे; मात्र काही काळात ते स्पष्ट होईल. LUCKY SIGN - A pyramid
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या