सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 22 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
आजचा दिवस काहीसा आळसवाणा आणि दिरंगाईचा असेल. तुम्हाला आज स्वतःला प्रवाहाच्या विरोधात ढकलावं लागेल. नित्यनेमाची कामं करण्यासाठी स्वतःला खेचावं लागू शकतं.
LUCKY SIGN – चुंबक (a magnet)
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुमची सहयोग करण्याची कल्पना लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. तुम्ही एखादी महत्त्वाची डेडलाइन चुकवण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – कुलूप आणि किल्ली (a lock and key)
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
समजुतीने निर्णय घेतल्यास परिस्थितीतून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत होईल. तुमच्या भावंडाला तुमच्या मदतीची खूप गरज असू शकते. तुमच्या भावनांना दाबण्याचा जास्त प्रयत्न करू नका. व्यक्त व्हा आणि त्यातून बाहेर पडा.
LUCKY SIGN – सिरॅमिक जग (a ceramic jug)
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
साधेपणाचेही काही तोटे कधी कधी असतात. त्यामुळे दुसऱ्यांनी गैरफायदा घेण्याआधी काही क्लृप्त्या तुम्ही शिकून घ्या. गेले काही दिवस तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध धावत आहात. तुमच्या कृतींबाबत विचार करण्यासाठी काही क्षण घ्या आणि मग पुढे जा.
LUCKY SIGN – काचेची कलाकृती (A glass artifact)
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
कामाच्या ठिकाणी कोणी तुमच्यावर वर्चस्व करायचा प्रयत्न करत असल्यास त्याविरुद्ध आवाज उठवा. तुमचा आंतरिक आवाज गेले काही दिवस एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाऊल उचलण्यास सांगत आहे. आता तुम्ही त्याचं अनुसरण करू शकता. भूतकाळातली एखादी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते.
LUCKY SIGN – खुणांची भाषा (sign language)
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
भूतकाळातल्या एखाद्या सुंदर आठवणीमुळे तुम्ही दिवसभर विचलित राहण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीतल्या गोष्टी काही दिवसांनी समोर येऊन उभ्या ठाकतील. तुम्हाला पुढचं पाऊल उचलण्यासाठीची स्पष्टता मिळू शकते. काही समस्या असल्यास त्या सोडवा.
LUCKY SIGN – ससाणा (A hawk)
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
एखाद्याच्या साध्या टिप्पणीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो; पण ते सध्या मनावर न घेतलेलंच बरं राहील. तुम्ही खरेदीला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. ज्येष्ठांना त्यांच्या गरजेच्या काळात मदत करा. स्वतःला चपळ ठेवण्यासाठी जास्तीची विश्रांती घ्या.
LUCKY SIGN – सिलिकॉन साचा (a silicon mould)
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुम्ही ज्यांचं समर्थन करत नसाल त्यांच्या कल्पनांचं स्वागत करण्यास काहीच हरकत नाही. आता विचारांसाठी मन मोकळं ठेवल्यास तुम्हाला प्रगतीसाठी मदत होण्याची शक्यता आहे. तुमची कागदपत्राची कामं उशीर होण्याआधी पूर्ण करा. तुम्ही पुस्तक लिहिण्याचा किंवा छापण्याचा विचार करत असाल तर आत्ताची वेळ ते सुरू करण्यासाठी चांगली आहे.
LUCKY SIGN – A mannequin
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
दुसऱ्या बाजूकडची हिरवीगार कुरणं तुम्हाला आनंदाचा भ्रम देऊ शकतात; पण त्या सापळ्यात न अडकलेलंच बरं आहे. सध्याची वेळ स्वतःसाठी शांततापूर्ण जागा शोधून बसण्याची, गोष्टीचं विश्लेषण आणि त्यावर विचार करण्याची आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी केलेल्या चर्चेमुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू शकतात.
LUCKY SIGN – डायरी (A diary)
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
तुम्हाला लवकरच फिरण्याचं प्लॅनिंग करण्याची इच्छा होऊ शकते. नंतरच्या दिवसात कामाचं ओझं वाढू शकतं. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये महत्त्वाच्या आणि मूल्यवान मुद्द्याबाबत एकमत न होण्याची शक्यता आहे. तुमच्या भावनिक आरोग्यासाठी पुन्हा गुंतवणूक करा.
LUCKY SIGN – फेरी (a long walk)
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
कष्टाने कमावलेले पैसे नेहमी चांगले निकाल देतात; पण तरीही तुम्हाला समाधानकारक वाटणार नाही. अनेक कल्पनांमुळे तुमच्या डोक्यात गोंधळ उडू शकतो. डोक्यातला विचारांचा गुंता सुटण्यासाठी स्वतःला ब्रेक देण्याची गरज भासू शकते. सध्या फक्त नियोजन करा आणि वेळ आल्यावर कृती करा.
LUCKY SIGN – तंबू (a tent)
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
लॅव्हिश लाइफस्टाइल जगणं हे तुमचं स्वप्न असलं तरी सध्या ती फार लांबची गोष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अज्ञात रस्त्यांवर चालावं लागू शकतं. सुरुवातीची काही कठीण तथ्यं तुम्हाला त्रास देणारी असू शकतात. संगीतामुळे थोडं बरं वाटेल.
LUCKY SIGN – बुद्धीबळाचा खेळ (a game of chess)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs