Home /News /astrology /

Daily Horoscope : नवी संधी तुमच्यासमोर येईल पण...; 'या' राशीच्या व्यक्तींनी सावध राहा

Daily Horoscope : नवी संधी तुमच्यासमोर येईल पण...; 'या' राशीच्या व्यक्तींनी सावध राहा

Daily horoscope 04 May 2022 : जन्मतारखेनुसार ठरते ती सूर्यरास आणि या राशीनुसार तुमचं 04 मे 2022 रोजीचं राशिभविष्य पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) नवा प्रोजेक्ट, नवी असाइनमेंट किंवा नवं व्हेंचर तुमच्यासमोर चालून आलं, तर त्याचा स्वीकार करा; पण त्यात उतरण्यापूर्वी चांगलं होमवर्क करा. घरात एखादा पवित्र कोपरा तयार करण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - A mirror वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) मूलभूत गोष्टींना चिकटून राहणं खूप उपयुक्त ठरत असल्याचं लक्षात येईल. ज्या मूलभूत गोष्टी किंवा तत्त्वं तुम्ही पाळता ती सोडू नका. त्यातूनच तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही प्रगती करू शकाल. निर्णय घेणं काही काळासाठी पुढे ढकलू शकता. एखाद्या चांगल्या ऑफरमुळे तुमचा दिवस चांगला ठरेल. LUCKY SIGN - A candle मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही कोणाशी पार्टनरशिप करू इच्छित असलात तर आता योग्य वेळ आहे; मात्र तत्पूर्वी तुम्हाला आढावा घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाबरोबर शेअर करणं चांगलं नाही. विनाकारण कोणत्याही गोष्टीचा अति ताण घेऊ नये. LUCKY SIGN - A gemstone कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या व्यक्त न केलेल्या भावना आता तुम्हाला अगदी अंतर्बाह्य ओळखणाऱ्या व्यक्तीला दिसू शकतात. तुम्ही भावनिकदृष्ट्या अन्य कोणत्या तरी व्यक्तीवर खूप अवलंबून आहात, ते चांगलं नाही. तुम्ही स्वतःला वेगळं करणं आणि स्वतंत्रपणे वाटचाल करणं आवश्यक आहे. LUCKY SIGN - A yellow stone सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही गेल्या काही काळात ज्या व्यक्तीला भेटलेला नाहीत अशा व्यक्तीकडून तुमचं जोरदार स्वागत होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ऐशोरामी गोष्टींचा आनंद घ्यावासा वाटेल, असे संकेत आहेत. तुमच्यापैकी काही जण परदेशात सुट्टी एन्जॉय करण्याचा बेत आखत असावेत. LUCKY SIGN - A candle कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही ज्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये आहात ती व्यक्ती सोडून चालली असल्यास तुमची भावनिक गुंतवणूक लवकर संपुष्टात येणार नाही. तुम्हाला एकमेकांविषयी वाटणारं प्रेम एकमेवाद्वितीय आहे. रोखीचे व्यवहार सावधगिरीने करावेत. त्यावर कोणाचं तरी बारीक लक्ष असण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A buddha statue तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्यातले नेतृत्वगुण वाढत आहेत. त्याबद्दल तुमचा गौरवही होईल. पर्फेक्शन आणि बारकाव्यांबद्दल तुमचा आग्रह असतो. तुम्ही त्याचा चांगला वापर कराल. घरून एखादी चांगली बातमी येईल आणि तुमचा उत्साह वाढेल. LUCKY SIGN - An indoor plant वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) कामाच्या ठिकाणी तुमच्या पद्धतीला तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्तींकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. आपण सर्वश्रेष्ठ आहोत, असं तुम्हाला अनेकदा वाटेल; मात्र तुम्ही ती भावना नियंत्रणात ठेवली पाहिजे. अचानक एखाद्या आउटिंगचा योग आहे. LUCKY SIGN - A rocking chair धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) अल्पावधीत तुम्ही दाखवलेली मानसिक क्षमता आणि चपळाई कौतुकास पात्र आहे. नव्या बिझनेस आयडियाबद्दल विचार करत असलात, तर ती तुम्हाला लवकरच अनुकूल ठरेल. पार्टनरशिपचीही शिफारस करण्यात येत आहे. LUCKY SIGN - A climber मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दिवसाच्या व्हाइब्ज संमिश्र आहेत. तुम्ही उत्साहामुळे कोणतंही चॅलेंज स्वीकारू शकता. ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप विश्वास ठेवता, ती व्यक्ती अन्य कोणाची तरी रिसोर्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - A butterfly कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्लॅन करत असाल; मात्र तरीही तो पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबीय किंवा जोडीदाराकडून दिला जाणारा सल्ला सध्या तरी तुम्हाला योग्य वाटणार नाही. LUCKY SIGN - Canvas मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्याकडून जे कोणी प्रतिसादाची वाट पाहत आहेत, त्यांना प्रतिसाद देणं हे अवघड काम असू शकतं. तुम्ही भूतकाळात केलेल्या कृतींबद्दल तुमच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. तुम्हाला लवकरच एखादी नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A feather
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या