Home /News /astrology /

Daily Horoscope : या राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावे, मात्र तरीही काळजी नसावी!

Daily Horoscope : या राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावे, मात्र तरीही काळजी नसावी!

६ जून २०२२. वार सोमवार. ज्येष्ठ शुक्ल षष्ठी. चंद्र सायंकाळपर्यंत सिंह राशीत असून शनिशी प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .

आज दिनांक ६ जून २०२२. वार सोमवार. ज्येष्ठ शुक्ल षष्ठी. चंद्र सायंकाळपर्यंत सिंह राशीत असून शनिशी प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य . मेष आज दिवस तुम्हाला भाग्य दायक आहे. चंद्र मन आनंदित ठेवेल. व्यय स्थानातील शुक्र गुरू स्त्री वर्गाकडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. संततीची काळजी घ्या.दिवस शुभ. वृषभ आज आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम आहे.अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नाव लौकिक वाढेल. दिवस शुभ फल देईल. मिथुन अचानक प्रवास योग, तृतीय शनि, भाग्यातील शनि धार्मिक कार्यात यश देतील. शुक्राचा आनंद दायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल. कर्क राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. दिवस सुट्टीचा आहे तरी तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरात देखील काम राहील.दिवस मध्यम जाईल. सिंह आज दिवस भाग्यदायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल. कन्या आज दिवस गडबडीचा व कष्टाचा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र विचलित होऊ नका. दिवस शांतपणे घालवा. तुला आज जोडीने आनंदात गृह सौख्य अनुभव कराल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल.नातेवाईक भेटतील. दिवस शुभ. वृश्चिक आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. शत्रू निर्माण होतील. मात्र नवीन वर्षात दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवां. आर्थिक बाजू जपा. धनु राशीच्या भाग्यस्थानातील चंद्र सामाजिक जीवनात प्रतिष्ठा व आनंद मिळवून देईल. आर्थिक लाभ होतील मुलांसोबत दिवस सुखात जाईल. मकर तुमच्या धनस्थनातील वक्री शनि अजूनही ताण देत आहे तरी आज भाग्य उजळेल. आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल. दिवस शुभ आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानी पासून जपावे. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र,दागिना खरेदी कराल.दिवस उत्तम. मीन आज उच्च प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजु समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस अतिशय गडबडीत जाईल. शुभम भवतू !!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या