Home /News /astrology /

Daily Horoscope : महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका, जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?

Daily Horoscope : महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका, जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस?

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

दिनांक 5 जून 2022. वार रविवार. आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी. आज चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 5 जून 2022. वार रविवार. आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी. आज चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज मानसिक आंदोलने होतील. मित्र मैत्रिणी भेट होईल. कार्यक्षेत्रात परदेश संबंधी घटना घडतील. विशेष पूजा हातून घडेल. दिवस उत्तम. वृषभ आज दिवस लाभदायक असून महत्वाचे निरोप मिळतील. मौल्यवान खरेदी, आर्थिक लाभ होतील. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. तरीही सावध रहा. दिवस शुभ. मिथुन आनंदी राहण्याचा दिवस. आर्थिक लाभ होईल. मात्र खर्च देखील भरपूर होईल. घरात काही तणावाची स्थिती राहील. महत्वाचे निर्णय टाळा. दिवस उत्तम. कर्क आज प्रकृती ठीक राहिल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराची काळजी घ्या. ईश्वराची उपासना सर्व संकटातून मार्ग काढेल. मानसिक ताण होईल. दिवस मध्यम. सिंह शत्रू डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतील. पण शनि त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल. चंद्र जोडीदाराला आर्थिक लाभ दाखवत आहे. आरोग्य चिंता वाटेल. दिवस उत्तम. कन्या जोडीदाराला नवीन संधी प्राप्त होतील. मुलांची चिंता वाटेल. आर्थिक आणि शारीरिक व्याधी कमी होतील. कार्यक्षेत्रात नाव मिळेल. दिवस उत्तम. तुला गृह, नवीन वाहन याचे योग येतील. कुठेही अनावश्यक धाडस करू नये. कार्यक्षेत्रात विशेष घटना घडतील. संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्वाचा निर्णय आज घ्या. दिवस उत्तम. वृश्चिक आज अचानक घरा संबंधी काही काळजी वाटेल. जास्तीचे काम पडेल. मन अशांत राहील. वादविवाद टाळा. दिवस मध्यम. धनु आज अनेक ठिकाणाहून जबाबदाऱ्या येतील. आर्थिक चिंता दूर झाली तरी खर्च जपून करा. प्रवास, बंधूभेट संभवते. कुटुंब सुख लाभेल. दिवस उत्तम. मकर शनि कुटुंब स्थानात अनेक संमिश्र फळ देणार आहेत. फार ताण घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास होईल. जोडीदाराला शुभ काळ. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. दिवस उत्तम. कुंभ जपून रहा. फार महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. देवदर्शन घडेल. दिवस मध्यम. मीन कुटुंबीयांच्या समवेत दिवस जाईल. काही तरी विशेष करून दाखवाल. लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल. आर्थिक दृष्ट्या कठीण दिवस आहे. उपासना करा. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या