मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : 'या' 2 राशींनी जपून राहा! प्रिय, जवळची व्यक्तीच तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार

Daily Horoscope : 'या' 2 राशींनी जपून राहा! प्रिय, जवळची व्यक्तीच तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

सूर्यराशीनुसार 18 सप्टेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्याभोवतीची ऊर्जा काहीशी गोंधळाची दिसते आहे. त्यामुळे तुम्ही जे काही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमच्या कृतींना साथ देणार नाही. कोणाचं तरी लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला काही नवे मार्ग शोधण्याची गरज भासू शकेल. आर्थिक डिल्स करण्याच्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी गैरसमज टाळण्यासाठी काळजीपूर्वक संवाद साधावा. स्वतःची कौशल्य अपडेट करण्याची इच्छा जागृत होईल. तुम्ही ते बारकाईने फॉलो केल्यास त्यातून काही बिझनेस आयडियाज मिळतील. LUCKY SIGN - A technicolor photo वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) ज्यांना बाकीच्यांकडून चुकीचं ठरवलं गेलं आहे, ते आता नव्या स्ट्रॅटेजीचा विचार करतील. अनेकदा एक्स्प्रेशन्स भावनांपेक्षा जास्त असतात; मात्र तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे हे समोरच्या व्यक्तीला कळणं महत्त्वाचं असतं. नवी नोकरी शोधत असलात, तर इंटरेस्टिंग संधी दिसायला सुरुवात होईल. रिलेशनशिप्सना प्राधान्य द्याल आणि तुम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करावीशी वाटेल. LUCKY SIGN - A cardboard मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्हाला मिळालेली संधी किंवा तुमचं पॅशन पुढे न्यायचं असेल, तर खऱ्या प्रयत्नांची गरज आहे. तुमचं काम अधिक विश्वासार्ह आणि वेळेच्या बाबतीत तपासलेल्या तंत्राच्या साह्याने पूर्ण करण्याचा पर्याय आगामी दिवसांत समोर येईल. तुम्हाला अधिक कॉन्फिडंट आणि फ्रेंडली वाटेल. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेली वैद्यकीय समस्या आता जाणवणार नाही. तुमचा जोडीदार एखादं सजेशन देईल आणि ते विचार करण्यायोग्य असेल. LUCKY SIGN - A solo performance कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) नव्या विचारांचं वादळ डोक्यात घोंघावत असेल; मात्र ते दिशाहीन असण्याची शक्यता आहे. तुमच्या उद्योगक्षेत्रातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती भेटेल. त्या व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असलात, तर तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे व्यक्त करण्याची गरज भासेल. तुमच्या जोडीदाराने काही गोष्टी गृहीत धरल्या आहेत. त्या निस्तरल्या पाहिजेत. तुमच्यापैकी कोणा एकाची भावनिक कोंडी झाली, तर वाद होणं शक्य आहे. LUCKY SIGN - Antique article सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) खासकरून कामाच्या ठिकाणी तुमचं फर्स्ट इम्प्रेशन आतापर्यंत प्रेडिक्टेबल झालं असेल. तुम्ही आजूबाजूच्या काही व्यक्तींना आश्चर्याचे धक्के देत आहात. तुमचा हेतू सकारात्मक असला, तरी संवादाच्या पद्धतीत बदल गरजेचा आहे. अधिकारपदावर असलात, तर तुम्ही लवकरच रिसिव्हिंग एंडला असाल. गेल्या काही काळात अडचणीत असलेल्या बिझनेसमध्ये सुधारणा दिसेल. शैक्षणिक क्षेत्रात व्यवहार करणाऱ्यांची चांगली प्रगती होऊ शकेल. LUCKY SIGN - A roller कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या नव्या दृष्टिकोनावर भूतकाळातल्या एखाद्या गोष्टींचा मोठा प्रभाव दिसेल. तुमची भविष्यातली धोरणं सुधारून पुन्हा आखण्यासाठी तुम्ही बाह्य स्रोतांकडे जाऊ शकता. तातडीच्या काही गोष्टींमध्ये स्पष्टता आली नसेल, तर त्यासाठी मदत घ्यावी. चांगल्या आर्थिक प्रगतीमुळे तुमची गाडी पुन्हा रुळावर येऊ शकेल. ट्रिपला जायचं असेल, तर योग्य नियोजन करा. तुम्हाला संतुलित झोनमध्ये जावंसं वाटेल. LUCKY SIGN - A honeybee तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्याकडे असलेल्या कौशल्याची स्वीकारार्हता आता वाढेल आणि कौतुक होईल. एरवी अत्यंत कंटाळवाणं असलेलं रूटीन लवकरच बदलणार असून, येत्या काही आठवड्यात ते अत्यंत हेक्टिक होणार आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये तुम्ही नवी संधी शोधत आहात. त्याबद्दल एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला एखादा संदर्भ देईल. व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत. हे बदल अधिक चांगलं होण्यासाठी असतील आणि स्वयंप्रेरणेतून असतील. LUCKY SIGN - A red flower वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) भूतकाळात केलेल्या काही निवडींचे परिणाम सकारात्मक झाले आहेत, हे आज ना उद्या तुम्ही मान्य कराल. काही वेळा एखाद्या व्यक्तीला एका ठरावीक दिशेलाच चालावं लागणं तिच्या नशिबात लिहिलेलं असतं. तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल आत्मविश्वास आहे आणि आता अन्य व्यक्तीही त्याच्याशी सहमत होतील. कामाच्या ठिकाणी काहीसा त्रासदायक, अस्वस्थतेचा काळ येण्याचे संकेत आहेत. स्वतःमधली राक्षसी बाजू तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करील; मात्र तिकडे जास्त लक्ष देऊ नका. सध्याचा काळ एका सरळ रेषेत चालण्याचा आहे. LUCKY SIGN - Your favorite dessert धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) रिलेशनशिपसाठी भूतकाळात तुम्ही उचललेली काही छोटी पावलं आता कठीण काळात बचाव करणारी ठरतील. काम आवाक्यातलं असेल, पण दमवणारं असेल. अनेक डेडलाइन्स पाळता पाळता दमछाक होईल. लीगल केसमध्ये अडकले असलात, तर तुमच्याकडे पुरावे सुरक्षित राहतील याची काळजी घ्या. कोणी तरी जवळची व्यक्ती तुमच्याबद्दलची गुप्त माहिती अन्य कोणाला तरी देऊ शकेल. LUCKY SIGN - A sage plant मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्ही ज्याबद्दल नियोजन करत होतात, ती झेप घेण्यासाठी आता चांगला काळ आहे. बिझनेस आयडियाजमधून सुरुवातीचे रिझल्ट्स चांगले निघतील. पार्टनरशिपमुळे तुमच्या चिंता बऱ्याच प्रमाणात दूर होतील. तसंच, कष्ट करताना थोडा दिलासाही मिळेल. औपचारिक पद्धतीने आलेला लग्नाचा प्रस्ताव लाभदायी ठरेल. तुमच्या मनाला स्पष्टता येईल. मित्रांसोबत अचानक ठरवलेला एखादा प्लॅन दिलासादायक ठरेल. LUCKY SIGN - Blueberries कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजचं नियोजन करताना तुमची सत्त्वपरीक्षा पाहिली गेली असेल. आता पुढे जाण्यासाठी अनुकूल काळ आहे. एखादी मदत मिळण्याची शक्यता आहे. घरापासून दूर राहत असलात, तर होम सिक वाटेल; मात्र ते तात्पुरतं असेल. व्यायामाचं रूटीन बनवणं आता शक्य होईल. प्रिय व्यक्तीच्या विचित्र वागण्यामुळे तुम्हाला त्रास होईल आणि तुम्ही शीघ्रकोपी व्हाल. LUCKY SIGN - A yellow clay pot मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) कामासाठी एखाद्या फॅमिली फ्रेंडकडून सजेशन मिळेल. सध्या लक्ष विचलित होण्यासाठी अनेक गोष्टी आजूबाजूला आहेत. तरीही दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवल्यास तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळू शकतो. तुमच्या परिसरातल्या काही नव्या व्यक्ती तुमच्याबद्दल एखादं मत बनवतील. त्यामुळे तुम्हाला थोडंसं अस्वस्थ व्हायला होईल. छोट्या ट्रिपमधून दिलासा मिळू शकेल. बाहेरच्या एखाद्या ठिकाणी गेल्यानंतरचा अनुभव तुम्हाला नवा पर्स्पेक्टिव्हही देऊ शकेल. LUCKY SIGN - A silk cloth
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या