Home /News /astrology /

Daily Horoscope : सावध राहा! तुमच्यावर नवं संकट येण्याची शक्यता; संकेतांना हलक्यात घेऊ नका

Daily Horoscope : सावध राहा! तुमच्यावर नवं संकट येण्याची शक्यता; संकेतांना हलक्यात घेऊ नका

Daily Horoscope 15 May 2022 : या राशीच्या व्यक्तींवर बऱ्याच दिवसांपासून घोंगावतं आहे संकट.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आर्थिक संकटांकडे दुर्लक्ष करत असाल तर ते टाळा. लवकरच त्याबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल. एखाद्या कार्यक्रमामध्ये नव्या व्यक्तीसोबत चांगली ओळख होईल. तुम्ही एखादी ट्रिप प्लॅन करत असाल तर ती पुढे ढकलली जाईल किंवा रद्द होईल. अवघड प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात सोप्या पद्धतीने प्रयत्न करून पाहा. LUCKY SIGN – A pearl वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमच्या मनामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे द्वंद्व सुरू आहे, त्याचं उत्तर तुमच्या दैनंदिन जीवनातच दडलेलं आहे. नोकरीच्या शोधात असाल किंवा एखादी विशिष्ट पोस्ट हवी असेल तर त्याबाबत स्पष्ट बोला. काही गोष्टी उगाचच गृहीत धरून चालाल. तुमचं बऱ्याच काळापासून रखडलेलं एखादं काम पूर्ण करण्यासाठी एखाद्या स्त्रीची मदत होईल. तुम्ही गेल्या काही काळापासून बाजूला ठेवलेली ऑफर आज स्वीकाराल. LUCKY SIGN – A blue Ribbon मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या आयुष्यातली मोक्याची वर्षे इतरांसाठी आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात खर्च झालीत. त्यामुळे आता थोडं स्वतःकडे लक्ष द्या. काही साध्या साध्या गोष्टी सुरुवातीला अवघड वाटतील. मात्र त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला त्या गोष्टी समजतील. एखादा नवीन छंद तुम्हाला पुढील कित्येक दिवस गुंतवून ठेवेल. तुम्हाला गरज पडल्यास एखादा नातेवाईक आधार देईल. LUCKY SIGN – A Bright lounger कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला एखाद्या संकटाचे संकेत मिळत आहेत. त्यावर तातडीने काही उपाय न केल्यास ते संकट दारात उभं ठाकेल. तुम्ही लेखक किंवा कथाकार असाल तर तुमच्या लेखनाला प्रसिद्धी मिळेल. संवादाचं नवं माध्यम तुम्हाला आवडेल. कंटेंट रायटर्स आणि पत्रकारांनाही प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानामुळे तुम्हाला भरपूर सहकार्य होणार आहे. LUCKY SIGN – A Carnelian सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) मानसिकरीत्या सध्या तुम्ही अगदीच कमकुवत आहात. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे किंवा मोठ्या नुकसानामुळे हे असू शकतं. अशा वेळी तुमचा जोडीदार तुम्हाला आधार देईल. नियमांचं पालन करत राहिलात तर तुमचा वेग थोडा कमी होईल. एखाद्या वेळी नियमांना थोडीशी बगल दिली तरी चालेल. एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला प्रेरणा देईल. LUCKY SIGN – A Gold Chain कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमचा अहंकार तुम्हाला हानिकारक ठरू शकतो. तुम्ही एकटे काम करण्यावर भर देत असाल तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. नवीन योजना सुरू होतील आणि बरेच प्लॅन्स प्रत्यक्षात येतील. काही संकटं येतील; मात्र जवळच्या व्यक्तींच्या मदतीने ती टळतीलही. नवी नाती जोडताना समंजसपणे निर्णय घ्या. LUCKY SIGN – A Celebrity तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीची वा मदतीची परतफेड घेण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या आजूबाजूला भरपूर समृद्धी आणि भरभराटीची ऊर्जा राहिल. लोकांसोबत नवे संबंध प्रस्थापित करणं फायद्याचं ठरेल. जुन्या ओळखीचा फायदा होईल. स्वतःबद्दल काही न्यूनगंड असेल, तर तो कायमचा विसरून जाल. LUCKY SIGN – A Glass Bottle वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या ओळखीतल्या व्यक्ती कदाचित तुम्हाला साथ देणार नाहीत. तसंच कोणी अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या मनात काही छुपा उद्देश असू शकतो. एखाद्या विशिष्ट घटनेनंतर तुमचा आत्मविश्वास हरवला असेल तर तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्हाला बऱ्याच काळापासून हवी असणारी एखादी गोष्ट पदरात पडेल. दुसऱ्या कोणासाठी एखादं सरप्राइज प्लॅन करत असाल तर तुम्हालाच एखादं सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – An Aventurine धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) स्वतःच्या दिनचर्येत आणि आयुष्यात एखादा सकारात्मक बदल घडवाल. स्वतःमध्ये व्यक्तिमत्त्व बदल घडवण्यासाठी प्रयत्न कराल. प्रेमात पडण्याची दाट शक्यता आहे. काही वेळ त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये हरवून जाल. जर मित्रांसोबत एखादी ट्रिप प्लॅन करत असाल, तर ती यशस्वी होईल. LUCKY SIGN – A Neon light मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या समस्येवर काहीच उपाय नाही असं सुरुवातीला वाटेल; मात्र लवकरच त्यावर समाधान सापडेल. सध्या जे काही करत आहात त्याबद्दल लोक तुम्हाला जज करतील; मात्र त्याकडे दुर्लक्ष करा. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला एखादा प्लॅन अमलात येईल. जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत असाल तर बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेली चांगली बातमी तुम्हाला मिळेल. गुंतवणुकीसंबंधी एखादी नवी कल्पना डोक्यात येईल. LUCKY SIGN – A Green Candle कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) भरपूर वेळ कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर जाईल. कामाच्या ठिकाणी नव्या नियमामुळे थोडीफार तडजोड करावी लागेल. तुमच्या प्रगतीवर ऑफिसमधील एखादा सहकारी जेलस होईल. नव्या संकल्पना राबवाल. नव्या बिझनेससंबंधी एखादी ऑफर मिळेल. मात्र, ही ऑफऱ स्वीकारण्यापूर्वी त्याबाबत पूर्ण माहिती घ्या. दैनंदिन जीवनातून थोडासा ब्रेक घेण्याची इच्छा होईल. LUCKY SIGN – A Fish tank मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) ऑफिसमध्ये सहकाऱ्यासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होईल. हा वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल तर आणखी वाढू शकतो. अभ्यासासाठी वा कामासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. पालकांना वैद्यकीय मदतीची गरज भासेल. काही प्रमाणात मूड स्विंग होतील. मेडिटेशनची मदत घ्याल. LUCKY SIGN – A red dot
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या