Home /News /astrology /

Daily Horoscope : दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार Good News; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार Good News; पाहा तुमचं राशिभविष्य

Daily horoscope 11 May 2022 : 11 मे, 2022 तुमचा हा दिवस कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 11 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) सध्या प्रॅक्टिकल निर्णय उपयुक्त ठरू शकतील. काही समस्या सोडवण्यात मित्र महत्त्वाची भूमिका निभावू शकेल. ती प्राधान्याची नसेल तर न थांबता पुढे चालत राहा आणि चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. LUCKY SIGN - A parrot वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) प्रत्येक समस्येशी तुम्ही भावनिकदृष्ट्या जोडला गेला नाहीत, तर होणारं नुकसान खूप कमी असेल. जुन्या समस्यांवर नवे उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक प्रतिसादामुळे तुम्हाला तुमचा दृष्टिकोन नव्याने तयार करण्यास मदत होईल. LUCKY SIGN - A new signboard मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्या समस्येत तुम्ही अडकून पडला असलात, तर तुम्हाला एखादा चांगला उपाय सापडेल. एखादी नवी व्यक्ती एखादी उत्तम कल्पना घेऊन समोर येईल. त्या कल्पनेचा विचार करा. कौटुंबिक समस्येमुळे तुम्हाला तुमचे अन्य प्लॅन्स सध्या तरी पुढे ढकलावे लागू शकतात. LUCKY SIGN - A trunk कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) क्षुल्लक गोष्टींमध्ये बराच वेळ घालवत असलात, तर तुम्हाला तुमच्या प्रायॉरिटीज पुन्हा एकदा ठरवाव्या लागणार आहेत. दिवसाची सुरुवात होतानाच एखादी चांगली बातमी मिळेल आणि सकारात्मकता वाढीला लागेल, आशा निर्माण होईल. तुमच्या भावंडाला कदाचित काही तात्पुरत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल आणि ते तुमच्याकडे मदत मागू शकतात. LUCKY SIGN - A glow sign सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) शेजारची एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत असण्याची शक्यता आहे. तुम्ही ते थांबवलं पाहिजे. किरकोळ चोरीची घटना घडण्याचे संकेत आहेत. त्यामुळे दक्ष राहा. पूर्ण मनापासून प्रयत्न न केल्यास ताजी संधी हुकू शकते. LUCKY SIGN - A prism कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) दिवस रिलॅक्स होण्यासाठी आहे. काही जणांना हा दिवस संथही वाटेल. मागे पडलेल्या काही गोष्टी आता कदाचित परत वर येतील आणि त्यावर आता काम करावं लागेल. टेलिफोनवरच्या एखाद्या संभाषणामुळे नवा, इंटरेस्टिंग दृष्टिकोन मिळेल. LUCKY SIGN - An apple तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) सहज साध्य करता येणार नाही असं वाटणारं उद्दिष्ट असलं, तरी तुम्हाला ते प्रयत्न करण्यापासून थांबवू शकत नाही. बिघडलेले नातेसंबंध सुरळीत करताना तुम्हाला त्याबद्दल काही नवी तथ्यं कळतील. दिवस बिझी असेल आणि ठरवलेली बहुतेकशी कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A blue stone वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) मर्यादित विचार तुम्हाला नव्या गोष्टी ट्राय करण्यापासून रोखू शकतात. तुम्हाला तुमची कार्यक्षमता अधिक वाढवण्याची गरज भासू शकते. आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. तुमची कौशल्यवृद्धी करण्यासाठी बदल करणं उपयुक्त ठरेल. LUCKY SIGN - A classic novel धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखादी पूर्णतः नवी असलेली गोष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुम्हाला जुन्या मित्राची साथही मिळेल. तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने केलेल्या सोंगाचं तुमच्याकडून कौतुक न होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A canvas painting मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्हाला पूर्वी वाटलं होतं, त्याप्रमाणेच निर्णय घेणं सोपं वाटू शकेल. काही जुन्या पॅटर्न्समध्ये लवकरच सुधारणा करण्याची गरज भासू शकेल. अचानक पैसे मिळतील किंवा अडकलेले पैशांचे व्यवहार मार्गी लागतील. त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. LUCKY SIGN - A bone China mug कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) प्रगती संथ गतीने झाली, तरी ती प्रगतीच असते. नव्या परिस्थितीशी जुळवून घेणं तुम्हाला कदाचित कठीण जाऊ शकेल. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात, तर तुम्ही या प्राथमिक मुद्द्यांवर मात करू शकाल. दूरवरून तुमच्या प्रयत्नांचं कौतुक करणारी मंडळीही आहेत. LUCKY SIGN - A logo मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं असेल आणि आता ते तुम्ही जवळून अनुभवत असण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामात अनपेक्षित साह्य मिळण्याची शक्यता आहे. जुन्या रिलेशनशिपमध्ये असलात, तर काही नवे पैलू आता पुढे येऊ शकतील. LUCKY SIGN - An amber stone
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या