Home /News /astrology /

Daily Horoscope: तूळ राशीला सतावेल ही गोष्ट; मीन राशीला येणार अनपेक्षित कॉल

Daily Horoscope: तूळ राशीला सतावेल ही गोष्ट; मीन राशीला येणार अनपेक्षित कॉल

Daily Horoscope 19 January 2022: जन्मतारखेनुसार ठरते ते सूर्यरास. तुमच्या राशीत आजचा दिवस कसा आहे? वाचा दैनंदिन राशीभविष्य आणि तुमचं भाग्यचिन्ह...

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) कामाच्या ठिकाणी तुम्ही कंपनीतल्या प्रभावशाली व्यक्तींशी चांगलं जुळवून घ्याल. तुम्हाला घरच्यांची आठवण येत असेल तर त्यांच्या भेटीचे बेत आखा. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात, तो आज सत्यात येईल. LUCKY SIGN - नवा मार्ग (A new road) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आजचा दिवस तुम्हाला निवांत आणि मनासारखा वाटेल. तुमच्या साथीदाराला भावनिक आधार देण्याची गरज भासेल. तुमचा वेळ वाया जाईल अशी प्रलोभनांपासून सावध राहा. LUCKY SIGN - निळी बाटली (a blue bottle) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) नुकत्याच केलेल्या प्रवासामुळे पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा मिळेल. तुमच्या जुन्या कौशल्याचा वापर करून पुन्हा एकदा माणसं जोडाल. नव्या आव्हानांमुळे व्यग्र राहाल. LUCKY SIGN - रंगीबेरंगी कागद (Colored paper) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) भूतकाळातल्या समस्या पुन्हा डोकं वर काढतील. तुमच्या कामात चोखपणा येण्यासाठी जास्तीचा वेळ बाजूला काढून ठेवा. घरातून काम करायची इच्छा असल्यास आजच सुरुवात करा. LUCKY SIGN - तुमचा आवडता खाद्यपदार्थ (your favorite snack) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखादी देणगी देण्याची किंवा दान करण्याची संधी मिळेल. घरी वादविवाद झाले असल्यास ते विसरण्यातच भलाई आहे. तुमची मुलं तुमच्यासाठी काही तरी विशेष गोष्ट करतील. LUCKY SIGN - an indoor hobby कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) कधी कधी जास्त प्रॅक्टिकल असणंही फायदेशीर नसतं. एखादी जवळची व्यक्ती तुमच्या वागण्यामुळे दुखवेल. आजचा दिवस नवं वर्क शेड्यूल आखण्यासाठी चांगला आहे. LUCKY SIGN - फळांची टोपली (A fruit basket) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या मनातल्या भीतीपासून आज मुक्तता होईल. ज्या व्यक्तीला भेटण्याचं बरेच दिवसांपासून टाळत होतात, त्यांची भेट घ्याल. एखाद्या छोट्याशा जखमेमुळे किंवा त्वचेच्या त्रासाने हैराण व्हाल. LUCKY SIGN - मऊ कापड (A soft fabric) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या बाबतीतल्या काही अफवांची चर्चा होत असल्याचं तुमच्या कानावर येईल. LUCKY SIGN - दोन चिमण्या (Two Sparrwos) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्ही जुन्या ओळखीच्या व्यक्तींची भेट घ्यायचा विचार करत असाल तर आज घ्या. जुन्या गोष्टी करण्यातही उत्साह जाणवेल. आरोग्याला प्राधान्य द्याल आणि नवीन आरोग्यदायी वेळापत्रक आखाल. LUCKY SIGN - पुस्तकाचं दुकान (a book shop) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) प्रत्येक दिवस हा नव्या सुरुवातीसाठी नसतो. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत पुनर्विचार कराल. आजचा दिवस हा दृष्टिकोन बदलण्याचा आहे. LUCKY SIGN - पीस (a feather) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आज तुम्हाला आराम करावासा वाटेल आणि स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देण्यासाठी चांगला दिवस आहे. कोणाकडूनही उसने पैसे घेण्याची कल्पनाही करू नका. खाण्यावर नियंत्रण ठेवा. LUCKY SIGN - बांबूचं झाड (a bamboo plant) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) कदाचित एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीत हवा तसा निकाल लागणार नाही. तुम्हाला त्या गोष्टीतून नेमकं काय हवंय याबाबत पुन्हा विचार करावा लागेल. एखाद्या अनपेक्षित कॉलमुळे दिवस चांगला जाईल. LUCKY SIGN - a flickering traffic signal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या