Home /News /astrology /

Daily horoscope : आज आहे उत्तम संधी; स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ

Daily horoscope : आज आहे उत्तम संधी; स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

सूर्यराशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा आहे? वाचा दैनंदिन राशीभविष्य आणि तुमचं भाग्यचिन्ह.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला मार्ग दाखवत राहिल. मात्र यावेळी त्याकडे नीट लक्ष द्या. बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं एखादं काम पूर्ण करावं लागेल. डोक्यातल्या विचारांना स्पष्टता मिळाल्याने योग्य ती कृती कराल. LUCKY SIGN - हिरवं कापड (A green cloth) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) जुन्या गोष्टी नव्या मार्गाने करणं हा आजच्या दिवसासाठीचा मंत्र असेल. तुमच्या सर्जनशीलतेची नोंद घेतली जाईल. तुमच्या मनातल्या भावना ऐकण्यासाठी आज कोणी श्रोता मिळेल. LUCKY SIGN - चमकदार वस्तू (a shimmering article) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमची कल्पना किंवा नेमका विचार दुसऱ्यांसमोर ठेवण्यात अडथळा येईल. त्यावर पुन्हा काम करा. कामाच्या ठिकाणी असलेलं हे वातावरण काही दिवसांतच बदलेल. खासगी कामांना जास्त प्राधान्य द्याल. LUCKY SIGN - वर्तमान पत्रातील मुख्य बातमी (Newspaper headlines) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखाद्या बाबतीतला योग्य पैलू तुम्हाला आई-वडील किंवा कुटुंबाकडूनच मिळेल. बाहेरच्या व्यक्तींवर भावनिक आधारासाठी जास्त अवलंबून राहू नका. आजच्या दिवसाचा शेवट एखाद्या सेलिब्रेशनसाठीच्या चांगल्या मेजवानीने होऊ शकेल. LUCKY SIGN - काचेचा जग (a glass jug) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) हातात असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर केल्यास नवीन संधी आपोआप चालून येतील. तुमच्या दुर्लक्षामुळे तुमचा जोडीदार नाराज होऊ शकेल. कामातली व्यग्रता लवकरच अनुभवास येईल. LUCKY SIGN - तुमची आवडती कॉफी (your favorite coffee) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) एखादं ध्येय पूर्ण करण्यासाठी आधीपासून मनाची तयार केल्यास ते पूर्णत्वास जाईल. अशा प्रकारची कार्यक्षम ऊर्जा आज तुम्हाला आज अनुभवायला मिळेल. तुमच्या आहारात थोडे बदल केल्यास चांगलं राहील. ते लवकर आत्मसात केल्यास उत्तम ठरेल. LUCKY SIGN - बाथ सॉल्ट (A bath salt) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) काही कारण नसताना तुमच्या सहवासाची अपेक्षा करणाऱ्यांपासून अंतर ठेवलेलंच बरं राहील. जुने सहकारी लवकरच गेट-टुगेदर आयोजित करू शकतात. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत Collaboration केल्यास तुमचं काम सुलभ होईल. LUCKY SIGN - स्पोर्ट्स वॉच (sports watch) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमचं अंगभूत कौशल्य दाखवायची संधी पुन्हा एकदा चालून येईल. त्या संधीला योग्यरीत्या प्रतिसाद द्या. एखाद्या वेगळ्या पर्यायाची चाचपणी करण्याची तुमच्या मुलाची इच्छा असेल. त्याबाबत त्याच्याशी चर्चा कराल. Long Drive साठी बाहेर पडाल. LUCKY SIGN - कुंपण असलेला बगीचा (A fenced garden) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कामाच्या ठिकाणी झालेल्या गंभीर चर्चेतून नवे निर्बंध लागू होतील. आज तुम्हाला भावनिक आधाराची गरज भासू शकेल. एखादी जुनी सवय आता बदलावी लागेल. तेलकट पदार्थ खाणं टाळा. LUCKY SIGN - जुनं सर्टीफिकेट an old certificate मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कामाच्या ठिकाणी नव्या आव्हानांकडे तुमचं लक्ष वेधलं जाईल. त्यामुळे व्यग्र राहाल. नव्या काँट्रॅक्टमधल्या बारीकसारीक गोष्टी नीट कळण्यासाठी ते काळजीपूर्वक वाचून घ्या. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असल्यास मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी अजून काही वेळ घ्यावा, असं तुम्हाला वाटू शकतं. LUCKY SIGN - आवडता गोड पदार्थ (favorite dessert) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) गेल्या काही दिवसांत झालेल्या साचेबद्ध रूटीनमुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवेल; पण नवीन ध्येयासाठी तयार व्हा. आजच्या दिवसाची ऊर्जा असे संकेत देत आहे, की कदाचित तुम्ही अनपेक्षित कामाकडे ओढले जाल. LUCKY SIGN - काचेचं टेबल (a glass top table) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) चर्चेदरम्यान तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी नवी परिस्थिती तयार होईल. एखाद्या गंभीर मुद्द्याला हात घालायचा असल्यास काही दिवस थांबा. कारण आजूबाजूची परिस्थिती बदलू शकेल. वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवलेले पैसे सहज उपलब्ध असतील, याची काळजी घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. LUCKY SIGN - काचेचं काम असलेला तुकडा (a mirror work patch)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या