मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily Horoscope : 'या' 4 राशींवर आज लक्ष्मीची कृपा; धनलाभ होणार

Daily Horoscope : 'या' 4 राशींवर आज लक्ष्मीची कृपा; धनलाभ होणार

Horoscope Today : तुमच्या राशीत आर्थिक लाभ आहे की नाही पाहा.

Horoscope Today : तुमच्या राशीत आर्थिक लाभ आहे की नाही पाहा.

Horoscope Today : तुमच्या राशीत आर्थिक लाभ आहे की नाही पाहा.

आज दिनांक 2 डिसेंबर 2021 तिथी कार्तिक कृष्ण त्रयोदशी. वार गुरुवार. आज चंद्र तुला राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीच्या सप्तम स्थानात चंद्र जोडीदाराला शुभ आहे, मात्र वाद टाळा. बरेच दिवस रेंगाळणारी घराची कामं उरकून घ्या. ऑफिसमध्ये  तुमचा अधिकार वाढेल. लोक तुमच्या मतांचा आदर करतील. दिवस अनुकूल आहे.

वृषभ

षष्ठ स्थानात असलेला चंद्र अडचणीत वाढ करेल. स्वभाव तेजस्वी होईल. मंगळ चंद्र युती संततीसाठी शुभ. दुपारनंतर मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन

पंचमात प्रवेश करणारा चंद्र मंगळ हा  शैक्षणिक कामांसाठी उत्तम. सरकारी नोकरी असणार्‍यांना आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील. शनीची उपासना करा. दिवस अनुकूल आहे.

कर्क

राशीच्या चतुर्थ स्थानात असलेला चंद्र तुम्हाला नोकरीची संधी मिळवुन देईल किंवा सरकारी कामं होतील. वकील, कलाकार यांना संधी निर्माण होईल. प्रवास योग, भेटी होतील. दुपारनंतर जरा आराम करा. दिवस बरा.

सिंह

तृतीय स्थानात येणारा चंद्र तीव्र परिणाम देईल. बोलण्यावर ताबा कटाक्षाने असू द्या. आरोग्य सांभाळावं लागेल. पैतृक संपत्तीसंबंधी काही अडचणी येतील. बहीण भावंड भेट देतील. दिवस शुभ आहे.

कन्या

धन स्थानात चंद्र आणि  मंगळ यांचे काही अचानक परिणाम होतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबाशी बोलाचाली, मुलांशी वाद होतील. प्रकृती ठिक राहिल. दिवस शुभ आहे.

तुला

राशीत आलेला चंद्र मंगळ प्रगतीचे नवीन दालन उघडेल. हा महिना तुमच्या करिअरसाठी सर्वोत्तम आहे. मुलाखत यशस्वी झाल्याने आत्मविश्वास वाढेल. पण मंगळ प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतो.

वृश्चिक

रवि अचानक नवीन संधी घेऊन येईल. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधी निर्णय होईल. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. परदेशी प्रवासासाठी अनुकूल काळ. मानसिक ताण जाणवत असेल तर घरी आराम करा.

धनु

मंगळाची चंद्रासोबत होणारी युती आज नोकरीसाठी उपयोगी सिद्ध होऊ शकते. आईवडिलांना जपा. काहींना अचानक आर्थिक लाभ होतील. पण सर्व व्यवहार जपून करा. दिवस चांगला जाईल.

मकर

राशीतील शनि जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. कोणाशी शाब्दिक वाद नको. मात्र व्यवसाय असणार्‍यांना सरकारी मदत मिळेल. अचानक कामाचा दबाव वाढेल. दिवस चांगला.

कुंभ

भाग्य स्थानात चंद्र सरकारी कामांसाठी शुभ आहे. अडचणी येतील पण काम होईल.  प्रकृतीच्या तक्रारीकडे लक्ष द्यावं. शत्रू पिडा वाढेल पण जिंकणार तुम्हीच. प्रवास जपून करा. दिवस शुभ. शनीची उपासना करावी.

मीन

चंद्र मंगळ जोडीदाराला शुभ नाही. प्रकृती, पोटाचे त्रास किंवा काही कायदेशीर बाबी समोर येतील. तुमच्यासाठी धार्मिक वाचन, काही नवीन शिकण्यास अनुकूल वेळ आहे. शुक्र काही संधी, धनलाभ मिळवून देईल. दिवस मध्यम जाईल

शुभम भवतु !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs