Home /News /astrology /

Daily horoscope : भावना व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ; मोकळेपणाने बोला

Daily horoscope : भावना व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ; मोकळेपणाने बोला

कर्कच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मानसिक तणाव असू शकतो. तसेच, मुलाची चिंता राहील. आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पैशाच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगावी लागेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

कर्कच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मानसिक तणाव असू शकतो. तसेच, मुलाची चिंता राहील. आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पैशाच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगावी लागेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Daily horoscope 15 March 2022 : तुम्ही आज काय करायला हवं आणि काय नाही पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 मार्च 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या सर्व भावना एकाच वेळी व्यक्त करण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे. त्या भावना बाहेर बोलून दाखवण्यासाठी तुम्ही काही काळापासून वाट पाहात होतात. आजचा दिवस संमिश्र भावनांचा असेल. मागे राहिल्यासारखं आता तुम्हाला वाटणार नाही. कामासाठी सकाळचे तास अनुकूल असतील. LUCKY SIGN - A star वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) अन्य व्यक्ती कदाचित तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील; मात्र तुम्ही अजूनही रहस्यासारखे असून, त्यांना कन्फ्युज करताय. तुम्ही जे काही Manipulate करण्याचा प्रयत्न करताय, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जुन्या संधीकडे पुन्हा एकदा पाहण्याची ही वेळ आहे. LUCKY SIGN - A ceramic planter मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या जवळच्या व्यक्ती काही वेळा कदाचित तुम्हाला अपेक्षित असल्याप्रमाणे वागणार नाहीत; पण ते अगदी नॉर्मल आहे. दुसऱ्या माणसांची परिस्थिती समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःच्या शोधात आहात आणि त्याची गरजही आहे. LUCKY SIGN - A nightingale कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही कोणाकडून पैसे उसने घेतले असतील किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं असेल, तर तुमच्या त्या व्यक्तीसोबतच्या नातेसंबंधांना धोका आहे. तुमच्या भविष्याच्या नियोजनाच्या प्रक्रियेत तुम्ही वर्तमानकाळातल्या काही गोष्टी गमावत आहात. काही वेळा जोडीदाराचं बोलणं संयम ठेवून ऐकणं शहाणपणाचं ठरतं. LUCKY SIGN - A few cardboard boxes सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) असं दिसतंय, की तुम्ही आणि तुमचे वरिष्ठ यांच्यामधली केमिस्ट्री चांगली जुळतेय. तुम्ही त्यासाठी कष्ट घेतले आहेत. तुमची स्वीकारार्हता आणि Mental Alignment सध्या अत्यंत उत्तम आहे; पण पुढच्या पातळीवर जाण्यासाठी आणखी काही वेळ जावा लागू शकतो. LUCKY SIGN - A caterpillar कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) बारीकसारीक तपशीलांची काळजी घेऊन तुमचं पोटेन्शियल वाढवा. तुमचे काही जवळचे मित्र तुम्हाला सरप्राइज देण्याचा प्लॅन करतील. एखादी रिक्वायरमेंट तुमच्यासमोर येईल. त्यासाठी तुम्हाला जास्त काळ प्रशिक्षण घ्यावं लागेल. LUCKY SIGN - A gem stone तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) काही वेळा आपल्याला स्वतःलाच आपल्या भावना कळत नाहीत आणि आपल्या विचारांबद्दल मिसकम्युनिकेशन होतं. तुम्ही गिल्टच्या बाहेर येऊन तुमच्या परिस्थितीचा त्रयस्थ व्यक्ती म्हणून विचार करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणांहून चांगला सपोर्ट मिळवण्यात तुम्ही यशस्वी झाला असाल, तर भविष्यासाठी ते प्रेरक ठरेल. LUCKY SIGN - A cast iron pan वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) दोन मित्र बऱ्याच काळानंतर भेटतात, तो क्षण जादुई असतो. तशी स्थिती तुम्ही अनुभवण्याची शक्यता आहे. पूर्वी कधी तुम्ही दुखावले गेला असाल, तर ते व्यक्त करण्याची ही वेळ आहे. तुम्हाला दिलासा मिळेल. कोणाचंही साह्य मिळत असेल, तर ते नाकारू नका. LUCKY SIGN - A large park धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) आजचा दिवस एकदम तेजस्वी असेल. प्रलंबित असलेलं काम, विसरलेल्या कामांची यादी आदींवर काम सुरू कराल. घरच्या जबाबदाऱ्यांना आज प्राधान्य दिलं जाणार नाही. सोशल मीटिंग्ज तात्पुरत्या स्थगित केल्या जाऊ शकतात. LUCKY SIGN - A marigold flower मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कामाच्या ठिकाणी ज्युनिअर व्यक्तीने काही काळजी व्यक्त केली किंवा मुद्दा मांडला, तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ द्या. स्टॉक मार्केटमध्ये सक्रियपणे सहभागी असाल, तर तुम्हाला क्विक मनी मिळण्याच्या काही संधी आहेत. बिझनेस मीटिंगमध्ये तुमच्या म्हणण्याला किंमत असेल. LUCKY SIGN - A neon light कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये काही किरकोळ समस्या उद्भवतील; पण ही तात्पुरती फेज आहे. कामाच्या ठिकाणचा ताण कदाचित नेहमीपेक्षा जास्त असेल. संगीत ही चांगली थेरपी होऊ शकेल. तुम्ही कदाचित छोटी ट्रिपही प्लॅन कराल. LUCKY SIGN - Retro music मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) ग्रुप म्हणून तुम्ही काही नियोजन करत असाल, तर त्याला आता आकार येण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून ते पुढे ढकललं जात आहे. लवकरच तुम्ही काही मजेचे क्षण अनुभवणार आहात. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. काही नव्या गुंतवणुकीचं नियोजन कराल. LUCKY SIGN - A glass door
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या