Home /News /astrology /

Daily Horoscope : बिलकुल सोडू नका ही संधी; नव्या कार्याच्या सुरुवातीसाठी आज Holi चा दिवस उत्तम

Daily Horoscope : बिलकुल सोडू नका ही संधी; नव्या कार्याच्या सुरुवातीसाठी आज Holi चा दिवस उत्तम

Photo: Shutterstock

Photo: Shutterstock

Holi horoscope : पाहा होळीच्या दिवसाचं तुमचं राशिभविष्य (Rashibhavishya).

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 मार्च 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (21 मार्च ते19 एप्रिल) तुम्ही नवीन काही तरी सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. एखादा नवीन उपक्रम, प्रकल्प किंवा असाइनमेंट करण्याची संधी मिळेल; मात्र त्यासाठी तुमची पूर्वतयारी चांगली असल्याची खात्री करा. तुमची क्षमता तुम्ही स्वत:चं मूल्यमापन करता त्यापेक्षा खूप जास्त आहे, हे लक्षात घ्या. घरात पवित्र वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - A mirror image वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आपल्या मूळ गोष्टींना, तत्त्वांना चिकटून राहणं खूप महत्त्वाचं आहे. मूलभूत गोष्टीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही प्रगती करू शकाल. तुमच्या मनातला गोंधळ दूर होईल. एखाद्या बाबतीत निर्णय घेणं काही काळ पुढे ढकललं जाऊ शकतं. आज एखादी चांगली ऑफर येईल. LUCKY SIGN - A silver candle मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखाद्यासोबत भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर ही अगदी योग्य वेळ आहे; मात्र त्यापूर्वी बारीकसारीक मुद्द्यांबाबत विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक योजना सर्वांसोबत शेअर करू नका. विनाकारण कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. LUCKY SIGN - A gemstone कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही तुमच्या भावना लपवायचा कितीही प्रयत्न केलात, तरी तुम्हाला अगदी जवळून ओळखणाऱ्या, जिवलग व्यक्तीपासून तुम्ही त्या लपवून ठेवू शकणार नाही. भावनिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहू नका. इतरांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे वाटचाल करणं आवश्यक आहे. LUCKY SIGN - A yellow stone सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्‍हाला बराच काळ न भेटलेल्या एखाद्या व्यक्तीकडून तुमचं स्‍वागत होण्‍याची शक्‍यता आहे. तुम्‍हाला उंची, आलिशान, लक्झरी गोष्टीमध्ये गुंतून पडाल. तुमच्यापैकी काही जण परदेशात सुट्टी घालवण्याचं नियोजन करतील. सध्या स्वयंपाक करणं ही तुमच्यासाठी एक चांगली थेरपी असू शकते. LUCKY SIGN - A candle कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये असाल ती तुमच्यापासून दूर जात असेल, मात्र तुम्ही त्या व्यक्तीबद्दलच्या भावनांमधून लवकर बाहेर पडू शकणार नाही. तुमच्या एकमेकांबद्दलच्या भावना इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. तुम्ही रोख रकमेशी संबधित काम करत असाल तर सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कारण तुमच्यावर बारीक लक्ष असण्याची शक्यता आहे. तुमचे महत्त्वाचे संपर्क क्रमांक इतरांना देऊ नका. LUCKY SIGN - A buddha statue तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमचं नेतृत्व कौशल्य चांगलं विकसित होत आहे. त्याबद्दल तुमचा सन्मान होऊ शकतो. कामात अधिक परिपूर्णता आणण्यावर तुमचा भर असल्यानं तुम्ही नेहमी उत्कृष्ट काम सादर करता. कोणी तरी तुमची प्रशंसा करील, मात्र दुरून. घरात एखादी चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. LUCKY SIGN - An indoor plant वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या कार्यपद्धतीवर यापूर्वी काही जणांनी आक्षेप घेतला होता. त्यांचं मत आता बदलेल. तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात आणि लोक काय समजत आहेत याबाबतीत एक संतुलन साधण्याची गरज आहे. आता आर्थिक लाभ होत राहतील. लवकरच नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. LUCKY SIGN - A chamber धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) अगदी मर्यादित वेळेत तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेत केलेला प्रभावी बदल सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरेल. तुम्ही नवीन व्यवसायाचा विचार करत असाल, तर लवकरच त्यात यश मिळेल. तुम्ही त्यासाठी भागीदारीदेखील करू शकता. घरातली शांतता आव्हानात्मक वाटू शकते. LUCKY SIGN - A climber मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र अनुभव देणारा आहे. एखादी महत्त्वाची माहिती हाती लागलेली असणं आणि कोणतंही आव्हान हाताळण्याचा तुमचा उत्साह यामुळे एक संमिश्र वातावरण अनुभवता येणार आहे. ज्यावर तुमचा खूप विश्वास आहे, अशा व्यक्तींवरचं तुमचं अवलंबित्व प्रयत्नपूर्वक कमी करा. लवकरच एखाद्या रोड ट्रिपला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A butterfly कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमची मागे पडलेली कामं आज पूर्ण करण्याची योजना आखत असाल; मात्र आजही ही कामं पुढं ढकलली जातील. त्यामुळे चिडचिड न करता शांत राहण्याचा प्रयत्न करा. आराम करा आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करा. कुटुंबाकडून किंवा जोडीदाराकडून मिळणारा कोणताही सल्ला सध्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल असं दिसत नाही. LUCKY SIGN - Canvas मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असणाऱ्या व्यक्तींना प्रतिसाद देणं तुम्हाला अवघड काम वाटू शकतं. भूतकाळातल्या तुमच्या काही कृतींबद्दल तुम्हाला अपराधी वाटू शकतं. तुमचा जोडीदार, साथीदारही तुम्हाला त्याची आठवण करून देत असेल; मात्र काळ तुम्हाला लवकरच आणखी एक संधी देईल असं दिसतं. LUCKY SIGN - Two feathers
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs, होळी

पुढील बातम्या