मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily horoscope : आज चंद्र-गुरूचा नवपंचम योग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

Daily horoscope : आज चंद्र-गुरूचा नवपंचम योग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

Photo: Shutterstock

Photo: Shutterstock

Horoscope today : पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

आज दिनांक 21 डिसेंबर 2021 वार मंगळवार तिथी मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया. आज चंद्र दिवसभर मिथुन राशीत असेल. तिथून तो गुरूशी नवपंचम योग करेल. त्यानुसार आणि इतर ग्रह स्थितीनुसार पाहूया बारा राशींचं राशीभविष्य.

मेष

तृतीय चंद्र नेहमी संवाद वाढवण्यासाठी येतो. त्यात गुरू चंद्र योग तुमचं बोलणं सर्वाना प्रभावित करेल. भावंड खूश राहतील. मंगळ आकर्षक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. दिवस उत्तम.

वृषभ

आर्थिक प्राप्ती, मेजवानी, कुटुंबियांसाठी आजचा दिवस शुभ आहे. छान खरेदी कराल. बुद्धीचा उत्तम वापर करून शिक्षणात भरघोस यश मिळेल. भाग्यात शुक्र शनी जीवनात सौख्य निर्माण करेल. दिवस उत्तम.

मिथुन

राशीतील चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे. आज दैवी शक्ती मदत करतील. सूर्य सप्तम स्थानात जोडीदारासाठी शुभ फळ देईल. अकस्मात खर्च होईल. दिवस शुभ.

कर्क

व्यय स्थानात चंद्र प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. षष्ठ स्थानात बुध ओजस्वी वाणी आणि संभाषण चातुर्य वाढवेल. शुक्राचा प्रसन्न प्रभाव सप्तम स्थानात जोडीदारासाठी विशेष खरेदी होईल. दिवस मध्यम जाईल.

सिंह

आज दिवस लाभदायक असून मित्र मैत्रिणींना भेटणं, मजेत वेळ घालवणं शक्य होईल. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. घराची नाविन्य पूर्ण सजावट कराल. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ.

कन्या

कार्यक्षेत्रात काही उत्तम संधी मिळतील. व्यवसाय उत्तम राहील. बुद्धी चातुर्याने नाव मिळवाल. आर्थिक बाजू ठीक राहील. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. दिवस चांगला जाईल.

तुला

भाग्य आज तुमच्यावर प्रसन्न आहे. आर्थिक लाभ, उत्तम खरेदी आणि घरात काही सौंदर्य पूर्ण सजावट असा हा दिवस तुम्हाला प्रसन्न ठेवेल. राशीच्या धनस्थानात केतू मंगळ थोडी प्रकृती जपा असा संकेत देत आहेत. सांभाळून बोला. दिवस शुभ.

वृश्चिक

अष्टमात चंद्र शारीरिक कष्ट, आर्थिक घडामोडी अणि नोकरी पेशा व्यक्तींना त्रास दर्शवतो. मंगळ पोटाचे विकार देऊ शकतो. तुमच्या राशीचा स्वामी राशीस्थानी विशेष शुभ नाही. संताप आवरा. दिवस मध्यम .

धनू

साथीदार आज विशेष प्रसन्न राहील. व्यावसायिक प्रगतीचा दिवस आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. गुरू कुटुंबात सौहार्द निर्माण करेल. दिवस बरा जाईल.

मकर

आज दिवस फारसा अनुकूल नाही. नोकर त्रास देतील. प्रकृतीमध्ये थोडा नकारात्मक प्रभाव राहील. उत्तरार्ध जरा जपून राहण्याचा संकेत देतो. दिवस बरा.

कुंभ

आज तुमच्या मुलांचा विशेष प्रभाव तुमच्यावर राहील. दशमातील मंगळ केतू धार्मिक रुची वाढेल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ.

मीन

आज घरासंबंधी काही विशेष खरेदी, साफसफाई  कराल. भाग्यात मंगळ धार्मिक निष्ठा जपण्याचे संकेत देत आहेत. प्रवास टाळा. आज दिवस अनुकूल आहे.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs