Home /News /astrology /

Daily horoscope : आज 'या' राशीला अचानक धनलाभ होणार

Daily horoscope : आज 'या' राशीला अचानक धनलाभ होणार

Daily horoscope : पाहा तुमचे आजचे राशिभविष्य.

आज दिनांक 28 डिसेंबर 2021 मंगळवार. तिथी मार्गशीर्ष कृष्ण नवमी. आज चंद्र दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी तुला राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत तो चित्रा नक्षत्रात असेल. आज बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस थोडा संथ आहे. नवीन काम, निर्णय टाळा आर्थिक स्थिती ठिक राहिल. घरात खूप खर्च होईल. शत्रूपासून सावध, सांभाळून राहण्याची गरज आहे. वृषभ आज मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुलांना समजून घेणं आवश्यक राहिल जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मानसिक ताणतणाव कमी होतील. दिवस चांगला जाईल. मिथुन चंद्राचे चतुर्थ स्थानात भ्रमण असणार आहे. आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी फार काम राहणार आहे. नवीन अडचणी येतील. आर्थिक स्थिती ठिक राहील. घराकडे लक्ष देणं गरजेचं राहिल. दिवस शुभ आहे. कर्क सप्तम स्थानात आता बुध, शनि, शुक्र असे तीन ग्रह आहेत. जोडीदाराची काळजी घ्या. आईवडील भेटणार आहेत. आर्थिक बाजू चांगली राहिल. संतती सुख चांगले. प्रवास योग येतील. दिवस सर्वसामान्यपणे जाईल. सिंह आज आर्थिक भरभराट होईल. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून प्राप्तीचे योग आहेत. फार अपेक्षा नकोत. नवीन काही सुरू करणे टाळा. घराकडे लक्ष द्यावं लागेल. दिवस चांगला. कन्या आज राशीतील चंद्र ताणतणाव निर्माण करेल. दिवस अस्वस्थ पार पडेल. राशीच्या तृतीय स्थानात आलेला मंगळ कानाच्या समस्या निर्माण करेल. भावंड नाराज होतील. धार्मिक कार्य ठरतील. दिवस उत्तम. तुला प्रकृतीची काळजी, मानसिक ताण आणि थकवा असा आजचा दिवस आहे. नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी येऊ शकते. राशीच्या चतुर्थ स्थानातील शुक्र सुखद लाभ देणार आहे. ईश्वरी उपासना करावी. दिवस मध्यम जाईल. वृश्चिक घरात होणार्‍या अवाजवी खर्चाला आता कात्री लावणं गरजेचे  आहे. लाभ स्थानातील चंद्र भ्रमण आज काही मित्रांची भेट घडवून आणेल. संतती सुख उत्तम. नोकरीमध्ये सांभाळून निर्णय घ्या. दिवस प्रवासाचा  आहे.. धनु आजचा दिवस ऑफिसमध्ये जास्तीची जबाबदारी, ताण आणि काही आवश्यक निर्णय घेण्याचा आहे. घराकडे लक्ष द्या. जोडीदाराची साथ  लाभेल. एकूण मिश्र दिवस आहे. मकर भाग्य स्थानातील चंद्र, उत्तम भाग्याची साथ  मिळवून देईल. छोटे प्रवास किंवा त्याची आखणी असा हा दिवस आहे. भावंडाची साथ मिळेल.  उपासना करावी. नोकरीमध्ये उत्तम संधी येतील. धार्मिक कार्य घडेल. शुभ दिवस. कुंभ आज दिवस संथ, कंटाळवाणा जाईल. व्यय स्थानातील ग्रह प्रवासाचे संकेत देत आहे. जास्तीची कामे त्रास देतील. शरीर साथ देणार नाही. गृह चिंता सतावू  शकते. त्यासाठी खर्च होईल. जपून रहा असा संकेत आहे. मीन तुमचे  आपल्या जोडीदाराशी सूर जुळतील. मात्र  मंगळ, रवि काळजीपूर्वक रहा असे सुचवत आहे. जोडीने  प्रवास, खरेदी कराल मुलांची उत्तम प्रगती होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. धार्मिक गोष्टींवर खर्च कराल  दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या