• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: महानवमीने होणार नवरात्रीचं समापन; पाहा आजचा दिवस कसा? आजचा दिवस कसा?

राशीभविष्य: महानवमीने होणार नवरात्रीचं समापन; पाहा आजचा दिवस कसा? आजचा दिवस कसा?

आज गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर 2021.आज अश्विन शुद्ध नवमी. नऊ दिवसांचे पारणे. कुठल्या देवीचं पूजन आज करावं आणि तुमचं राशीभविष्य वाचा सविस्तर..

  • Share this:
आज गुरुवार  दिनांक 14 ऑक्टोबर 2021.आज अश्विन शुद्ध नवमी. नऊ दिवसांचे पारणे. या दिवसाला महा नवमी म्हणतात. आज नवरात्रीचे समापन होते. नऊ दिवस यथासांग सेवा केल्यानंतर आज घट उत्थापन केले जाते. आज देवीच्या  सिद्धीदात्री या रुपाचे पूजन करतात. माता सिद्धीदात्री  ही शिवाची अर्धांगिनी आहे. त्याच्या पासून उत्पन्न झाली आहे. कमल वसना  आहे.हे रूप सात्विक आहे. देवीची इतर रूपे  भौतिक सुखे प्रदान करतात मात्र माता आपल्या भक्तांना सिद्धी, बुद्धी देते. हिच्या सेवेने अतींद्रिय शक्ति  आणि वाचासिद्धी  प्राप्त होते. अश्या मातेच्या या अद्वितीय रूपाला नमन असो. या नवरात्रात आपण नवदुर्गाची माहिती घेतली. माता जगदंबा सर्वांवर प्रसन्न होवो हीच प्रार्थना. आज चंद्र दिवसभर मकर राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष कार्यालयीन कामकाज वेग  घेईल. महत्त्वाचे निर्णय होतील. दिवस नेहमी प्रमाणे पार पडेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती ठीक राहील. दिवस चांगला. वृषभ आज दिवस आनंदात जाईल. सणाची तयारी उत्साहाने कराल. लहानसहान समारंभ किंवा पुजा यामधे भाग घ्याल. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ. मिथुन राशीच्या अष्टमात आलेला चंद्र  पुन्हा एकदा  नैराश्य आणि तणावाचा सामना करायला लावेल. प्रकृती जपा. मानसिक आंदोलने होतील. दिवस मध्यम. कर्क आज भागीदारी मध्ये सामंजस्य राहील. दोघे मिळून काही खरेदी होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. मात्र खर्च फार होतील. दिवस नेहमी सारखाच पार पडेल. सिंह षष्ठ स्थानात चंद्र प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक देणेघेणे टाळा. शत्रू पासून सावध रहा. तुमच्या वर असलेली गुरुकृपा सर्व अडचणींवर मात करेल. दिवस बरा जाईल. कन्या आज पंचमात चंद्र  तृतीय  शुक्र असे शुभ योग आहेत. मार्केटिंग मध्ये फायदा होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. मुल आनंदी राहतील. तुला आज  घरासाठी काही विशेष कार्य आयोजित कराल. कुटुंबातील व्यक्तीची काही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. त्यासाठी खर्च ही होईल. पण दिवस आनंदात जाईल. वृश्चिक आज प्रवास किंवा  काही महत्त्वाचे फोन येतील. दिवस कुटुंबातील व्यक्तींच्या सोबत आनंदात घालवाल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस अनुकूल. धनु आज दिवस  आर्थिक लाभ घडविणारा आहे. अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत. प्रकृती उत्तम राहील. भाग्य जोरावर आहे. दिवस चांगला जाईल. मकर आज राशीत  शनि चन्द्र  आहेत  मन चिंतित राहील.  मंगळ वाहने जपून चालवा असे सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. आर्थिक स्थिती ठीक राहील. मध्यम दिवस. कुंभ आज व्यय स्थानात शनि चंद्र परदेश संबंधी काही निर्णय होतील. आर्थिक व्यय होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. समारंभाचे आयोजन केले जाईल. मीन आज दिवस ज्येष्ठ व्यक्ती कडून लाभ  मिळवुन देणारा आहे.तृतीय राहू प्रवास योग आणतो. पराक्रमाची वाढ करतो. गुरु सामाजिक प्रतिष्ठा जपा असे सुचवतोय. दिवस शुभ. शुभम भवतु!!
First published: