• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या 4 राशींना दिवस शुभ; तुमच्या राशीला अमावास्येचा प्रभाव जाणवणार का?

राशीभविष्य: या 4 राशींना दिवस शुभ; तुमच्या राशीला अमावास्येचा प्रभाव जाणवणार का?

आज शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 2021 आषाढ कृष्ण चतुर्दशी. रात्री अमावास्या प्रारंभ होते आहे. याचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?

  • Share this:
आज शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 2021 आषाढ कृष्ण चतुर्दशी.आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करणार असून रात्री अमावास्या प्रारंभ होते आहे. मेष आज चंद्र उच्चीचा असून तुम्हाला उत्तम गृहसौख्य देईल. अमावास्येचा अशांत काळ आहे. त्यानंतर घरात शुभता येईल. घर सजावट, साफसफाई यात दिवस जाईल. वृषभ आज तृतीय चंद्र  आहे, छानसा फेर फटका मारून याल. काही महत्त्वाचे फोन येतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. दिवस आरामात घालवा. मिथुन आज धन स्थानातील ग्रह  कुठूनतरी आर्थिक लाभ मिळवुन देणार आहेत. कुटुंब सुख  मिळेल. कुटुंबीयांना हवा तसा वेळ द्याल. दिवस शुभ आहे. कर्क राशी स्थानात रवि बुध  आहेत. जपून रहा. कायद्याचे उल्लंघन करू नका. राशीतील उच्च चंद्र अणि धन स्थानातील मंगळ आणि शुक्र शुभ फल देईल.  प्रवास किंवा आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम. सिंह आज चंद्र बाराव्या स्थानात असून काही नुकसान होण्याची शक्यता आहे. धार्मिक बाबींसाठी खर्च संभवतो. मुले खुश राहतील. दिवस मध्यम आहे. कन्या आज दिवस मित्र मैत्रिणींसोबत मजा करण्याचा आहे  लाभ होतील. नवीन खरेदी होईल. प्रकृती साथ देईल. तुमच्या चांगल्या कामासाठी मदत मिळेल. दिवस शुभ आहे. तुला आज शनिवार असूनही काही अचानक काम आले तरी करावे लागेल. त्यासाठी काही नियोजन करून ठेवा. घरी देखील वेळ द्या. दिवस बरा जाईल. वृश्चिक अमावस्येच्या अशुभ प्रभावात असलेल्या वृश्चिक व्यक्तींना आज  जपून राहण्याचा संकेत आहे. परोपकार, हाती घेतलेल्या कामात यश आणि प्रशंसा मिळेल. दिवस शुभ आहे. धनु आज अष्टमात आलेला चंद्र शारीरिक त्रास दर्शवतो. घरी आरामात रहा. वाहन चालवणे टाळा   आर्थिक नुकसान संभवते. एकूण मिश्र फळ देणारा दिवस आहे. मकर सप्तम चंद्र, शनिच्या प्रतियोगात आहे. थोडी नकारात्मक मानसिकता होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. आर्थिक स्थिती ठीक. दिवस चांगला. कुंभ आज दिवसभर  थकवा वाटेल. आराम करा. कोणाशी बोलाचाली करू नका. शत्रू निर्माण होतील. आर्थिक व्यवहार टाळा. दिवस  शांततेत घालवा. मीन आज दिवस मुलांच्या अपेक्षा पुरवण्यात जाणार आहे. अध्यात्मिक कल  होईल. वाचन किंवा अभ्यास उत्तम होईल. दिवस आनंदात जाईल.
First published: