Home /News /astrology /

Daily horoscope : कुणाला कसा जाणार या वर्षाचा शेवटचा दिवस? पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

Daily horoscope : कुणाला कसा जाणार या वर्षाचा शेवटचा दिवस? पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

Daily horoscope : 31 डिसेंबर, 2021, वर्षाच्या अखेरच्या दिवशी तुमच्या राशीत काय आहे पाहा.

आज दिनांक 31 डिसेंबर 2021. शुक्रवार मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी/त्रयोदशी. या वर्षीचा हा अखेरचा दिवस. उद्यापासून इंग्रजी नवीन वर्ष सुरू होत आहे. सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा.  वर्ष 2022 चा शुभ अंक 6 येत असून हे शुक्राच्या प्रभावाखालील वर्ष आहे. या वर्षी तीन मोठी स्थित्यंतरे होणार असुन राहू, गुरू आणि शनि हे बलाढ्य ग्रह राश्यांतर करणार आहेत. त्यानुसार वेळोवेळी माहिती दिली जाईल. आज चंद्र सायंकाळी 7 नंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल. त्यानुसार पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस फारसा अनुकूल नाही. मन अशांत राहिल. आर्थिक बाजू ठिक आहे. अचानक कोणीतरी येण्याची शक्यता आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम. वृषभ आज नोकरीमध्ये उत्तम फळ मिळेल. मिष्टान्न लाभ. मानसिक ताण जाणवेल. आर्थिक बाजू ठिक राहिल. आईकडून लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. दिवस चांगला आहे. मिथुन राशीच्या पंचम/षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण प्रकृतीकडे लक्ष असू द्या असं सुचवत आहे. नातेवाईक भेटतील. नोकरीत काम जास्त पडेल. खर्च होईल. दिवस चांगला जाईल. कर्क मुलांना आणि घरच्या लोकांना वेळ द्या. शिक्षणात उत्तम प्रगती, वाचन लिखाण यात वेळ जाईल. आर्थिक घडामोडी होतील. दिवस बरा जाईल. सिंह षष्ठ शुक्र आणि चतुर्थ चंद्र घरामध्ये भरपूर खर्च करवणार आहेत. मंगळ केतू काही त्वचेचे विकार निर्माण करतील. घरात जास्तीचं काम पडेल. गुरुकृपा राहिल. दिवस शुभ. कन्या आज आर्थिक प्राप्ती, महत्त्वाचा निर्णय किंवा काही कौटुंबिक समारंभ होईल. भावंडं भेट देतील. प्रकृती ठिक राहिल.सायंकाळ नंतर उदास होईल. दिवस बरा जाईल. तुला राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण आर्थिक लाभ मिळवून देईल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहिल. कुटुंबात काही छान घटना घडेल. दिवस शुभ. वृश्चिक राशीतील चंद्र राहूच्या दृष्टीत आहे. मन थोडं अशांत राहिल. प्रकृती जपा. संभ्रमात पडाल. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यासंबंधी बोलणी होतील. दिवस चांगला. धनु लाभ/व्यय स्थानातील चंद्र भ्रमण वाढलेला खर्च, दगदग दाखवत आहे. भाग्य मात्र साथ देईल. वडील व्यक्तींची मदत होईल. दिवस मध्यम जाईल. मकर राशीच्या दशम स्थानातील चंद्र प्रवास योग, गाठीभेटी आणि लाभकारक आहे. प्रकृती जपा. एकट्याने प्रवास करणं टाळा. अध्यात्मिक साधना होईल. दिवस शुभ. कुंभ कामाच्या ठिकाणी आज जास्तीचं काम, विशेष जबाबदारी पडेल. आर्थिक बाजू ठिक राहिल. प्रकृती ठिक राहिल. जोडीदार मदत करतील. दिवस अनुकूल. मीन राशीच्या अष्टम/भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आज काही वेगळाच अनुभव देईल. तुमचा एकटेपणा वाढेल. घरात शांतता राहिल. काहींना प्रवास योग येतील. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या