मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार खूप सरप्राइझेस; जोडीदारही देणार चांगली बातमी

Daily Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार खूप सरप्राइझेस; जोडीदारही देणार चांगली बातमी

तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 30 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

आजचा दिवस सरप्राइजेसनी भरलेला असेल. मात्र त्यापैकी काही तुम्हाला आधीच अपेक्षित असतील. तुमच्या भावंडाला काय सांगायचं असू शकेल, त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्यासाठी काही वेळ बाजूला काढण्यासाठी चांगला आहे.

LUCKY SIGN - A marigold flower

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

आजचा दिवस तुमच्या आर्थिक स्थितीकडे पाहण्याचा आणि तुमचं पेपरवर्क शिस्तबद्ध करण्याचा आहे. तुम्ही काही गोष्टी पुढे ढकलत आहात. मात्र त्या लवकरच तुमच्याकडे पुन्हा येणार आहेत. जुनी ओळख असलेली व्यक्ती तुमच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न करू शकेल.

LUCKY SIGN - A wooden box

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

कोणी तरी विश्वासू व्यक्ती तुमच्याकडे मदतीची याचना करू शकेल. तुम्ही बिझनेसमध्ये असलात तर पैशांचा प्रवाह आश्वासक वाटू लागेल. तुम्ही नूतनीकरणाच्या प्रकल्पाचा काही विचार करत असलात, तर पुढे ढकलू शकता.

LUCKY SIGN - A bright tie

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमच्या संयमाचं फळ तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर मिळण्याची शक्यता आहे. तुमचा भूतकाळ चांगला नसेल, तर लवकरच तुम्हाला एखादा चांगला समुपदेशक मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगला लागेल.

LUCKY SIGN - A notebook

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्ही गेल्या काही दिवसांपासून ज्या महत्त्वाच्या गोष्टीची वाट पाहात आहात, ती पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराकडून चांगली बातमी कळेल. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन रूटीन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A silver plate

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

आज तुमच्या चेहऱ्यावर हसू खुलण्यासारखं काही तरी कारण घडेल. तुमच्या वडिलांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यातून काही तरी गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. हरवलेली एखादी गोष्ट आता सापडू शकेल. आजचा दिवस असाधारणपणे दमवणारा असेल.

LUCKY SIGN - A bronze article

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमच्या खूपच प्रॅक्टिकल असण्यामुळे कोणी तरी दुखावलं जाऊ शकेल. तुम्हाला तुमच्या एक्स्प्रेशन स्किलवर काम करावं लागेल. तुम्ही जो काही विचार केला असेल, तो पूर्णपणे सांगितला जाईलच असं नाही. तुम्ही उत्साह काही काळ आवरून धरावा.

LUCKY SIGN - A yellow sofa

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

लवकरच सेलिब्रेशन्स होण्याची शक्यता आहे. नियोजन नसलेली एखादी गोष्ट घडत असेल, तर तुम्हाला त्याला काही तरी सिल्व्हर लायनिंग सापडेल. महत्त्वाचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. त्याचे पडसाद उमटू शकतात.

LUCKY SIGN - Sugar syrup

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्ही एखाद्या अज्ञात स्थळाच्या दिशेने नव्या प्रवासाचं नियोजन करत असलात, तर तो प्रवास उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांत संपर्क नसलेलं एखादं चुलत भावंड किंवा नातेवाईकांना अचानक तुमची आठवण येईल. ट्रेडिंगमध्ये असलात, तर आजचा दिवस 'बाय अँड सेल'साठी चांगला आहे.

LUCKY SIGN - A solar panel

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

आजचा दिवस तुम्हाला हवा असेल तितका चांगला असेल. खूप जास्त कामगिरी करण्यासाठी तुमच्या मनावर ताण देऊ नका. तुम्ही मागे बसू शकता किंवा तुमचं काम पूर्ण करण्याचा पर्याय निवडू शकता. तुमच्या ऊर्जेचं नूतनीकरण करण्याचा आणि ताजंतवानं होण्याचा दिवस.

LUCKY SIGN - Favorite fashion label

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

पुढच्या गोष्टींचं प्लॅनिंग करण्याचा आणि काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्यं प्राप्त करण्याचा दिवस आहे. तुमच्या बॉसला तुमच्याकडून पुन्हा एकदा खात्रीची गरज भासेल. तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीच्या जवळ येत असल्याचं तुम्हाला जाणवेल. ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेणं चांगलं.

LUCKY SIGN - A colored glass

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुमच्या निर्णयावर ठाम न राहण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. एखादी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा.

LUCKY SIGN - A blue crystal

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs