सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 29 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
आधी केलेल्या कमिटमेंट्समुळे किंवा अतिकामामुळे थकवा जाणवेल. योग्य व्यवस्थापनासाठी शिस्तबद्ध पद्धत फायद्याची ठरेल. आगामी सोहळ्यासाठी तयार राहा. त्यात तुमच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असू शकतील.
LUCKY SIGN – A turquoise stone
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
एखादी परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच त्याबद्दल मूल्यमापन करणं तुम्हाला शक्य होणार नाही. एकाच वेळी अनेक कामं हाती घेतल्यामुळे मनाचा गोंधळ उडेल. ते टाळता येण्यासारखं नाही. तब्येतीकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN –A ceramic bowl
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
स्वतःशी नवी कमिटमेंट करा आणि त्यासाठी योग्य डेडलाइन ठरवा. या कमिटमेंट्स पार पाडण्यासाठी तुमच्याकडे भरपूर ऊर्जा असेल. कामाच्या ठिकाणच्या एखाद्या चांगल्या बातमीमुळे किंवा संवादामुळे मूड सकारात्मक राहील.
LUCKY SIGN - Monochrome Bag
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
आज दुपारनंतर काही वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडथळा निर्माण होईल. तुमची रिलेशनशिप मजबूत होईल; मात्र त्यासाठी काही स्टेप्स आवश्यक आहेत. तुम्ही लवकरच एखाद्या लीगल प्रोफेशनलशी चर्चा कराल.
LUCKY SIGN – A Gift
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
कुटुंबीयांसोबत लवकरच काही निवांत क्षण व्यतीत कराल. काही काळासाठी तुमचं काम प्राधान्यक्रमावर राहणार नाही. रखडलेलं आर्थिक प्रकरण मार्गी लागेल.
LUCKY SIGN – A Decorated room
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
कामाच्या ठिकाणची एखादी अचान घडलेली घडामोड तुमचा संपूर्ण दिवस आनंदी करील. तब्येतीची, विशेषतः पचनासंबंधी काळजी घ्या. सध्या तुमचा वेग आवरता घेतल्यास त्याचा भविष्यात अधिक फायदा दिसेल. मार्गदर्शनानुसार तुम्ही प्लॅनिंग सुरू करू शकता.
LUCKY SIGN – A new Lamp
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात तुमची प्रतिमा आणखी चांगली होईल. काही काळापासून तुम्ही एखादा संवाद पुढे ढकलत असाल, तर आज तो साधण्याची योग्य संधी आहे. दिवसाच्या शेवटी अगदी शांत आणि रिलॅक्स वाटेल.
LUCKY SIGN – A Clear Sky
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
ओळखीतल्या काही व्यक्ती तुमच्याबद्दल गॉसिप करतील. आजचा दिवस स्वतःमध्येच गुंतून राहाल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे नवी जबाबदारी देण्याबाबत चर्चा होईल. ते भविष्यात होऊ शकतं. एखाद्या फॅमिली फ्रेंडची भरपूर मदत होईल.
LUCKY SIGN – An Amber stone
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
विस्मरणात गेलेल्या आठवणी जुने फोटो पाहून ताज्या होतील. काही आर्थिक बाबी आशादायी वाटतील. मन शांत असल्यामुळे रखडलेली कामं पार पडण्यासाठी मदत होईल. एखादा तातडीचा मेसेज मिळण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN – An Emerald
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
क्लिष्ट प्रश्नांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. कित्येक वेळा अवघड प्रश्नांचं उत्तर अगदीच सोपं असतं. त्याप्रमाणेच जटिल समस्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अगदी साधा ठेवा. ती समस्या सुटत का नाहीये याबाबत फेरविचार करा. एखादं काम पार पाडण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज मेडिटेशन केल्यामुळे फायदा होईल.
LUCKY SIGN – A lake
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमचा मित्र किंवा मैत्रिणीने तुमच्यासाठी केलेली छोटीशी गोष्टही तुम्हाला आनंदी करील. आज शॉपिंग करण्याचे संकेत आहेत. आजचा दिवस आल्हाददायक असून, त्याचा तुम्ही आनंद घ्याल. बाहेरचं खाणं टाळा. अधिक व्यक्त होण्याचा प्रयत्न करा.
LUCKY SIGN – A Signboard
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
नवीन नातेसंबंध मजबूत होण्यास बराच वेळ लागतो. अशा गोष्टींमध्ये संयम बाळगणं गरजेचं असतं. तुटलेला किंवा बिघडलेला संवाद पहिल्यापासून सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला पूर्ण करता येणार नाही, असं वचन देणं टाळा.
LUCKY SIGN – A Silver wire
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs