मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : जोडीदारासोबत वाद झाला असेल तर जरूर पाहा 29 जुलैचं राशिभविष्य; उपायही सापडेल

Daily Horoscope : जोडीदारासोबत वाद झाला असेल तर जरूर पाहा 29 जुलैचं राशिभविष्य; उपायही सापडेल

29 जुलै रोजीचं तुमचं राशिभविष्य पाहा.

29 जुलै रोजीचं तुमचं राशिभविष्य पाहा.

29 जुलै रोजीचं तुमचं राशिभविष्य पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 29 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मिळून काही विषयांवर बोलणं टाळायचं ठरवलं आहे; मात्र हे मुद्दे सोडवले गेले पाहिजेत. ते मुद्दे तात्पुरत्या स्वरूपात बाजूला ठेवण्याऐवजी ते सोडवण्याचा प्रयत्न करा. लाँग डिस्टन्स काँटॅक्ट हा उपाय ठरू शकेल.

LUCKY SIGN - Calming music

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुम्ही रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये असलात, तर तुम्हाला अनुकूल अशा काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. खर्च वाढत आहेत; मात्र तुम्ही ते सहज सांभाळू शकाल. उत्तम आरोग्य हे प्राधान्य बनलं पाहिजे.

LUCKY SIGN - A silver chain

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुमच्या हातात असलेली संधी तुमचं लक्ष दुसरीकडे असल्यास हुकू शकते. काय भूमिका घ्यावी याबद्दल तुम्ही अति विचार करत असलात किंवा त्याबद्दलचा आत्मविश्वास तुमच्याकडे नसेल, तर तुमच्या हातातून संधी जाईल. तुम्हाला बरीच शक्ती लावून उंच झेप घ्यावी लागेल. हा तुम्ही तुमच्यासाठी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता, हे काळ सिद्ध करील.

LUCKY SIGN - A book cover

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

खाण्यापिण्याच्या जुन्या सवयी तुम्हाला सोडायच्या आहेत. गोड खाण्याच्या सवयी सोडायच्या आहेत. त्यात तुम्हाला यश मिळत नाहीये. आता या सगळ्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आता असं दिसतं आहे, की आता ते घडेल.

LUCKY SIGN - A rose quartz

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्ही अति विचार करत आहात आणि त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होत नाहीये. तुमचे विचार एकत्र करा, ठोस नियोजन करा, अवलंबून राहता येण्यायोग्य, विश्वासू व्यक्तीशी चर्चा करा. त्यानंतर तुम्ही लवकरच टेक-ऑफसाठी तयार व्हाल. तुम्ही लवकरच स्थिरतेकडे वाटचाल करणार आहात.

LUCKY SIGN - A blue sapphire

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष देत असाल, तेव्हा तुमचे विचार अनियंत्रित होणार नाहीत, याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या पर्यवेक्षणाखाली असलेल्या बऱ्याच गोष्टी पणाला लागलेल्या असू शकतात. येत्या काही दिवसांत आर्थिक परिस्थिती सुधारेल.

LUCKY SIGN - A solo performance

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

बऱ्याचदा तुमची मतं तुमच्या विचारांपेक्षा जास्त उच्चारवाने व्यक्त होतात. संवाद साधताना पूर्ण लक्ष तिथेच असू द्या. तुमच्या पर्फेक्शनसाठीच्या आग्रहामुळे इतरांवर विनाकारण काहीसा अन्याय होऊ शकेल. तुम्हाला बिझनेस पर्सनसारखी मानसिकता तयार करावी लागेल.

LUCKY SIGN - A large window

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

सध्याच्या नव्या काळात अजेंडाची ताकद भावनांपेक्षा जास्त असते. तुमचा अनुभव मात्र यापेक्षा वेगळा असू शकेल. तुम्ही एखाद्या गोष्टीत भावनिकदृष्ट्या गुंतून पडाल आणि जेव्हा त्या गोष्टीचा शेवट होईल, तेव्हा तुम्हाला त्यापासून वेगळं होणं शक्य होणार नाही. तुमच्या कामाची लवकरच दखल घेतली जाईल.

LUCKY SIGN - A tennis racket

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमच्या आवडीने ठरलेल्या ट्रिपमध्ये तुम्हाला निवांततेचे क्षण मिळतील. गेल्या काही काळापासून तुम्ही त्या क्षणांच्या शोधात होतात. आयुष्य खूप धावपळीचं आणि प्रचंड कष्टांचं झालं आहे. त्यामुळे आता मिळालेल्या निवांततेच्या क्षणांमध्ये भविष्याचं नियोजन करावं आणि ते अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने असावं.

LUCKY SIGN - A cluster of birds

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

सगळ्या विखुरलेल्या गोष्टी आता एकत्र येत असल्याचं तुमच्या लक्षात येत असेल. ते समजण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी मानसिक स्पष्टताही आहे. तुमच्या दृष्टिकोनात थोडासा बदल केल्यास तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकेल. लवकरच संधी येत असेल.

LUCKY SIGN - A heritage clock

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमचं लक्ष नसताना अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्या गोष्टी तुमच्या मनातून पुसून टाकण्याआधी नीट जाणून घ्या. गेल्या काही दिवसांतल्या मोठ्या खर्चांमुळे तुम्हाला तुमच्या खर्चाच्या पॅटर्नचा आढावा घ्यावा लागेल.

LUCKY SIGN - A bell

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

दिवस दमवणारा आहे. तुमच्या मनात बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. एकाच फटक्यात सगळं काही सोडवण्याचा तुमचा विचार आहे. तुम्हाला एकाच वेळी थोडा संयम आणि मार्गदर्शनाची गरज आहे.

LUCKY SIGN - A semi-precious gem

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya