Home /News /astrology /

Daily horoscope : कुणाची आर्थिक भरभराट तर कुणाचं भाग्य उजळणार; पाहा आजचं राशिभविष्य

Daily horoscope : कुणाची आर्थिक भरभराट तर कुणाचं भाग्य उजळणार; पाहा आजचं राशिभविष्य

Daily horoscope : तुमच्या राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा.

आज दिनांक 29 डिसेंबर 2021. बुधवार. आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी. चंद्र आज तुला राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरूशी नव पंचम योग आणि शुक्र शनी सोबत केंद्र योग करीत असून बुध मकर राशीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भ्रमण अनुकूल असून दिवस आनंदात जाईल. जोडीदारासोबत विशेष खरेदी कराल. घर आणि व्यवसाय दोन्हीसाठी दिवस शुभ आहे. वृषभ आज जास्तीच्या कामांना खूप वेळ द्यावा लागेल. त्यामुळे थकवा येईल. अंगदुखी, सर्दी पडसे इत्यादी पासून जपून रहा. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. दिवस चांगला जाईल. मिथुन पंचमातील चंद्र भ्रमण उत्तम आध्यात्मिक अनुभव देणार आहे.  व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. तुमच्या हस्ते काही मोठे काम होईल ज्यायोगे तुमचे नाव होईल. दिवस शुभ आहे. कर्क आजचा दिवस घरात जास्तीची काम करण्याचा आहे. म्हणजे आठवडा व्यवस्थित जाईल. कामाचे  नियोजन करा. मंगळ क्रोधावर नियंत्रण ठेवा असे सुचवत आहे. दिवस शुभ. सिंह तृतीय स्थानात आलेला चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे. अतिशय उत्तम दिवस. धार्मिक गोष्टीमध्ये मन रमेल. छोटासा प्रवास योग. दिवस आरामात जाईल. कन्या आज धनस्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल असून आर्थिक भरभराट करणार आहे. शुक्राचे भ्रमण चैनीच्या गोष्टीवर खर्च करायला लावेल. जपून खर्च करा. दिवस उत्तम. तुला राशीतील चंद्र गुरूशी  शुभ योग करीत आहे. आध्यात्मिक अनुभव येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने तुम्ही भाग्य खेचून आणाल. लाभ होतील. दिवस उत्तम. वृश्चिक व्यय स्थानातील चंद्र आज शारीरिक कष्ट, आर्थिक व्यय दाखवित आहे. लवकरच भाग्य आणि कर्म यांची उत्तम साथ लाभणार आहे. तेव्हा सगळ्या कष्टांची फळ मिळतील. दिवस मध्यम. धनु ग्रह स्थितीनुसार आज प्रवास होईल. दिवस लाभदायक असून फार दगदग ना करता पार पडेल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. दिवस उत्तम. मकर आजचा दिवस शांतपणे घरात व्यतीत कराल. लहानसहान समारंभात भाग घेणार आहात. आर्थिक बाजू ठिक. शुक्र उत्तम लाभ मिळवून देईल. दिवस चांगला आहे. कुंभ भाग्यकारक दिवस. धनु राशीतील ग्रहांची फळे मिळतील. शत्रू पिडा संभवते. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य थोडं सांभाळावं लागेल . आज योग्य ती काळजी घ्या. आराम करा. दिवस मध्यम आहे. मीन आज ग्रहस्थिती कष्ट देणारी असून कोणतंही धाडस करू नका. वाद टाळा. शारीरिक कष्ट असतील तर घरात आराम करा. नाम जप करा. मानसिक हुरहूर जाणवेल. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या