Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : मेष राशीसाठी भाग्याचा दिवस; कन्या राशीला होणार आर्थिक लाभ

दैनंदिन राशिभविष्य : मेष राशीसाठी भाग्याचा दिवस; कन्या राशीला होणार आर्थिक लाभ

Horoscope 28 January 2022 : तुमच्या राशीत आज काय आहे पाहा आजचे राशिभविष्य.

आज दिनांक 29 जानेवारी 2022 वार शनिवार तिथी पौष कृष्ण द्वादशी. चंद्र आज दिवसभर धनु राशीत भ्रमण करेल आणि शुक्र मंगळसोबत योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज मेष रास भाग्यवंत ठरेल. काही दिवस मानसिक ताण जाणवत असेल तर तो आता कमी होईल. मंगल चंद्र आर्थिक स्थिती सुधारेल. घरात अचानक बदल करण्याची इच्छा होईल. त्यासाठी कष्ट कराल.दिवस शुभ. वृषभ थोडे जपून रहा असा आजचा दिवस सुचवतो आहे. अष्टमात चंद्र मंगळ भ्रमण मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडवते. राशीतील राहू संभ्रम निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी जपून वागा. दिवस मध्यम आहे. मिथुन सप्तम स्थानातील शुक्र आणि शुभ चंद्र आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहेत. आर्थिक नियोजन करण्याचे विचार येतील. नुकसान  होणार नाही हे बघा. जोडीदारासोबत दिवस आनंदाने व्यतीत करा. कर्क राशीच्या षष्ठ स्थानातील मंगळ चंद्राशी युती योग करीत आहे. जपून रहा. प्रकृती सांभाळा. अति कामाचा ताण घेऊ नका. ग्रहस्थिती फारशी  अनुकूल नाही. पण लवकरच ठिक होईल. मारुतीची उपासना करणं योग्य. सिंह या राशीच्या व्यक्ती आज आनंदी असतील. नावलौकिक वाढेल. मुलांकडे लक्ष असू द्या. पंचम स्थानातील मंगळ संततीचे नाहक खर्च किंवा  चैनीकडे कल दाखवत आहेत. तिकडे लक्ष असू द्या. दिवस  चांगला. कन्या आज सगळा वेळ घरासाठी काही विशेष काम करण्यात जाईल. आर्थिक लाभ  होतील. एकूण दिवस चांगला आहे. पण मुलांशी वाद नको. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस चांगला जाईल. तूळ छोटे प्रवास, त्याची तयारी किंवा आखणी करण्यात आजचा दिवस घालवाल. काही महत्त्वाचा संवाद आज घडू शकतो. फोन, ईमेल याद्वारे जनसंपर्क घडेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी  घ्या. वृश्चिक आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख समाधान यात आज वाढ होईल. खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. घरासाठी काही वस्तूंची खरेदी  कराल. थोडक्यात आणि सौम्य बोला. शुभ दिवस. धनु राशीतून होणारे चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य देईल. राशीतील मंगळ शुक्र शुभ आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारीकडे लक्ष द्या. अति खर्च, प्रवास नको. आर्थिक स्थिती ठिक राहिल. गृहसौख्य मिळेल. दिवस चांगला. मकर आज दिवस फारसा अनुकूल नाही. शनी, व्यय स्थानातील चंद्र मंगळ आणि पंचमात राहू सांभाळून रहा असं सुचवत आहे. खर्च सांभाळून करा. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर घ्या. दिवस मध्यम आहे. कुंभ दिवस लाभ मिळवून देणारा आहे. मित्रमैत्रिणींना भेटणं शक्य होईल. मुलांना वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काही खर्चही होईल. धार्मिक कार्यामध्ये मन रमेल. गुरू उपासना करा. मीन नोकरी व्यवसायात आज फार दगदग होणार आहे. मंगळ कोणी नवीन व्यक्तीची भेट दर्शवत आहे. दिवस भर कामाचा ताण राहिल. धार्मिक घटना घडतील. त्याची तयारी कराल. दिवस चांगला आहे. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या