Home /News /astrology /

Daily horoscope : सिंह राशीच्या दिवसाची सुरुवात तर कन्या राशीच्या दिवसाचा शेवट चिंताजनक

Daily horoscope : सिंह राशीच्या दिवसाची सुरुवात तर कन्या राशीच्या दिवसाचा शेवट चिंताजनक

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 28 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आर्थिक बाबींना आज प्राधान्य द्याल. आधीचे काही मुद्दे प्रलंबित असल्यास त्यात तुमचा बराचसा वेळ जाईल. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आधीच अपॉइंटमेंट घ्या. LUCKY SIGN – पीस (a feather) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या यादीतली सर्व कामं तुम्हाला पूर्ण करता येण्याची शक्यता आहे. कामाच्या ओझ्यामुळे आज तुम्ही व्यग्र असू शकता. जवळच्या मित्राबाबतची सकारात्मक बातमी ऐकल्याने तुम्हाला बरं वाटू शकतं. LUCKY SIGN – a neon sign मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आता तुम्हाला जबाबदारीचं विभाजन करावं लागू शकतं. तुम्ही घर बदलण्याचा विचार करत असाल, तर आता चांगली वेळ आहे. रिअल इस्टेटमधल्या व्यक्तींना आता स्थिर वाढीचा अनुभव घेता येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – भिंतीवरचं पोस्टर (a wall poster) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमचा छंद प्रदर्शित करण्यासाठी तुम्हाला नवे मार्ग मिळू शकतात. तुमचा आजचा आत्मविश्वास दुसऱ्यांच्या मनात मात्र मत्सर निर्माण करणारा ठरू शकतो. तुमच्या आसपासचे काही लोक जाणूनबुजून तुमच्याविरूद्ध योजना आखू शकतात. सतर्क राहा. LUCKY SIGN – गाण्यांची यादी (A music playlist) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दिवसाच्या सुरुवातीलाच चिंतेची काही चिन्हं दिसू शकतात; पण लवकरच त्यांचं निराकारण करण्यात तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता आहे. एखादी फसवणुकीची किंवा चोरीची घटना तुमच्या मनाची जागा व्यापू शकते. तुमचं भावंड न सांगता भेट घेण्यास येऊ शकतं. LUCKY SIGN – a late evening drive कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) मित्रांसोबत वेळ घालवल्यास तो तुम्हाला ऊर्जा देणारा ठरू शकेल. दिवसाअखेर मात्र तुमचं चित्त विचलित होऊ शकतं. भूतकाळातली एखादी व्यक्ती संपर्क साधण्यासाठी तुमचा माग काढू शकते. LUCKY SIGN – (A childhood favorite) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) प्रलंबित कामातून कोणत्याही प्रगतीची चिन्हं नसल्यामुळे तुम्हाला कदाचित निराश झाल्यासारखं वाटू शकेल. दुपारच्या वेळी अचानक ठरलेल्या शॉपिंगच्या प्लॅनमुळे तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटू शकतं. एखादी व्यक्ती तुमच्या उत्तराची वाट पाहत असल्यास त्याबद्दल रिमाइंडर लावण्याचा विचार तुम्ही करू शकता. LUCKY SIGN – निळा खडा (a blue stone) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखादं गुप्त प्रकरण आता मात्र कोणाच्या तरी नजरेत येऊ शकते. तुम्ही काही कमिटमेंट्स अपूर्ण ठेवल्या असतील त्याकडे ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या औषधांच्या बाबतीत काळजी घ्या. LUCKY SIGN – तारा (a star) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) नेहमीपेक्षा आज तुम्हाला जास्त सुस्तावलेलं वाटू शकतं. गेल्या काही दिवसापासून असं वाटण्याचा पॅटर्नच झाला आहे. कामाच्या ठिकाणी मिळालेल्या नव्या कामामुळे तुम्हाला जास्तीचा विचार करावा लागू शकतो. तुमच्या हाताखालच्या व्यक्ती समस्या निर्माण करू शकतात. LUCKY SIGN – इनडोअर गेम (An indoor game) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आसपास सुरू असलेल्या गोंधळापासून दूर जाण्यासाठी रोड ट्रीप हा चांगला उपाय ठरू शकतो. तुमचा विश्वास असलेला मित्र वेगळे रंग दाखवू शकतो. परदेशात राहणारा नातेवाईक तुमच्याकडे मदतीची विचारणा करू शकतो. LUCKY SIGN – दिवा (a lamp) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) पालकांसोबत गंभीर संवादही कधी कधी चांगला ठरू शकतो. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आज पुरेसा न वाटण्याची शक्यता आहे. आजही तुम्हाला वैतागल्यासारखं वाटू शकते. दुपारनंतर तुमच्या teperament वर लक्ष ठेवा. LUCKY SIGN – (a loop) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) बहुतेकशी कामं करताना तुम्हाला आज स्थिर आणि कार्यक्षम वाटण्याची शक्यता आहे. घरातल्या लहान मुलांकडे नेहमीपेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज भासू शकते. पोटाबाबतच्या समस्या अचानक जाणवू शकतात. आज नियोजनाचा दिवस आहे. LUCKY SIGN – गोल्ड प्लेटेड वस्तू (a gold plated article)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या