मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : 'या' राशीचं आज नशीब फळफळणार; तुम्ही तर ती व्यक्ती नाहीत ना?

Daily Horoscope : 'या' राशीचं आज नशीब फळफळणार; तुम्ही तर ती व्यक्ती नाहीत ना?

27 नोव्हेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

27 नोव्हेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

27 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

या आठवड्यात तुमच्याकडे काही परदेशी पाहुणे येण्याची शक्यता आहे. गेट-टुगेदर किंवा अचानक एखादी ट्रिप ठरू शकते. एखाद्या अगदी छोटासा वादही विनाकारण ताणला जाऊ शकतो. तुम्हाला गोष्टीची तुमची बाजू दाखवण्याची संधी मिळेल. मुलांची वागणूक कदाचित थोडं अस्वस्थ करणारी असेल. इतरांसाठी काही गोष्टींचं नियोजन करणं किंवा आयोजन करणं यात तुमची महत्त्वाची भूमिका असेल.

LUCKY SIGN – A handheld

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

एखाद्या इंटरव्ह्यूत निवड होण्याबाबत किंवा जजेसकडून तुमची निवड होण्याबाबत चांगली संधी आहे. तुमचं नशीब फळफळणार आहे. घरातली बाजू कदाचित अजूनही थोडीशी डळमळीत असेल. रोजच्या कामकाजामुळे कामाची आघाडी मात्र झळाळून उठणार आहे. वाक्यांच्या मधला अर्थ समजून घेण्याचं कौशल्य आता तुम्हाला आत्मसात करण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - A salt lamp

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

बदल होण्याचे संकेत आहेत. तुम्ही कशावर तरी काम करत होतात, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. तुम्ही लेखनाच्या क्षेत्रात असलात, तर तुम्हाला तुमच्या कामाच्या विस्तारीकरणाला मदत होईल अशी उत्साहवर्धक बातमी मिळू शकेल. छोटे व्यावसायिक गट किंवा स्टार्ट-अप्स आता कदाचित रिझल्ट्स दाखवू शकतील आणि नफा कमावू शकतील. तुमच्या व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी जी संधी तुम्हाला गरजेची होती, ती इतके दिवस मिळत नव्हती ती एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या माध्यमातून, लीडमधून किंवा एखाद्या योजनेच्या माध्यमातून मिळेल.

LUCKY SIGN – A solitaire

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी काही नवीन मार्ग दिसू शकतील आणि तुम्हाला त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळू शकेल. गेले काही महिने तुम्ही एकदम शांत, सुस्त होतात आणि अन्य व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या. आता तुम्हाला प्रगती करणारा काही बदल जाणवला असेल. तुमच्या कुटुंबाबद्दल असलेली काळजी, चिंता, समस्या लवकरच दूर होईल. तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल.

LUCKY SIGN – A ropeway

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

काही व्यक्तींची वृत्तीच अशी असते, की तुमचं आयुष्य त्यांना बिघडवायचं असतं. केवळ त्यांच्या उपस्थितीनेही ते तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. तुम्ही कदाचित अशा काही व्यक्तींना सामोरं जात असाल; पण आता मात्र ऊर्जेचा तुम्हाला पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हवं तसं तुम्ही नियोजन करू शकाल. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर कदाचित तुमच्या एखाद्या रिसोर्सबद्दल उद्भवलेली तात्पुरती समस्या सोडवू शकाल. आध्यात्मिकदृष्ट्या तुमची प्रगती होईल.

LUCKY SIGN – A golden gate

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

संवाद प्रभावी होण्यासाठी अन्य व्यक्तींचा विश्वास जिंकावाच लागतो. कामाच्या ठिकाणी काही अनुभवी व्यक्ती तुमच्या कामावर समाधानी नसतील आणि कदाचित ते काही तरी आक्षेपही नोंदवतील. तुमच्या हातात कदाचित आता काही संधी असतील; पण त्यापैकी काही संधी व्यवहार्य ठरू शकतील. हाती असलेल्या रिसोर्सेससह चालत राहा. कदाचित काही आंतरिक प्रेरणेची मदत होईल.

LUCKY SIGN – A silver wire

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमचे हेतू हेच सर्व काही आहे. चांगल्या हेतूसाठी समर्पित भावनेने काम करा, म्हणजे सगळं आपोआप नीट होईल. तुमच्या मनात इतरांबद्दल बऱ्याच शंका आहेत. त्या नकारात्मकतेमुळे तुमच्या सुरळीत होणाऱ्या कामात अडथळे येत आहेत. शेजारी कदाचित तुमच्या गोष्टींमध्ये जास्तच नाक खुपसतील. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. तुमच्या मित्रांशी प्रत्येक गोष्ट शेअर करू नका. ती विनाकारण पसरण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN – A glass tumbler

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

मानसिक आरोग्य आणि स्थैर्य हे सध्या तुमच्यासाठी सगळ्यात जास्त काळजीचे विषय आहेत. सध्या तुमच्या मनात खूप विचार असतील आणि त्यानेच तुमचं मन व्यापलेलं असेल. त्यामुळे, जे नेमकं करायचं आहे, ज्याकडे तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे, त्याकडे कदाचित तुम्ही बसून शांतपणे लक्ष देऊ शकणार नाही. तुमच्या अस्वस्थपणावर, चिंतेवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, स्वत:वर लक्ष केंद्रित करा आणि थोडीशी ध्यानधारणा, चिंतन करा. तुमच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

LUCKY SIGN - A blue aventurine

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

गोष्टी अवघड होण्याआधी त्या सोडवा. तुमच्या एखाद्या जीवलगाशी तुम्ही जोडले गेला असाल किंवा मनाने कोणाशी तरी जोडले गेला असाल किंवा त्या व्यक्तीशी रोमँटिक संबंधात असाल तर शांतपणे बसून ते सोडवण्याची, त्यावर विचार करण्याची गरज आहे. तुम्ही दोघांनी छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्या, तर त्यामुळे तुमच्यातलं अंतर, दुरावा वाढत जाईल. वेळेवर मिळालेला सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. तुम्ही लवकरच एखादं गेट टुगेदर किंवा लग्नसोहळ्याला हजेरी लावू शकता.

LUCKY SIGN – A lake

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

सगळं तुमच्या अ‍ॅटिट्यूडवर अवलंबून आहे. तुमच्याकडे संधी आधीच चालून आलेली आहे आणि आता ती तुम्हाला योग्य रीतीने हाताळायची गरज आहे. ती कदाचित तुमच्या अपेक्षांपेक्षा थोडी वेगळी असेल; पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण समर्पण वृत्तीने काम करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या, व्यापक स्तरावर जाण्यासाठीचीही कदाचित ही पहिली पायरी असू शकते. सार्वजनिक ठिकाणी पैशांचा व्यवहार किंवा पैसे हाताळणं टाळा. सावधगिरी बाळगा.

LUCKY SIGN – A white candle

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुम्ही तुमचा फोकस सुधारलेला आहे आणि तुमचं मनही त्यावर केंद्रित केलं आहे. तुमचा फोकस इतका नेमका असल्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती त्याबद्दल किंचित सावध आहेत. तुम्हाला हव्या तशा गोष्टी करून घेण्यासाठी याचा तुम्ही फायदा करून घ्यायला हवा. असं असलं तरी तुम्ही अंतर्मुख राहाल आणि बऱ्यापैकी आत्ममग्न असाल. परिणाम साधायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खुलेपणानं बोलणं गरजेचं आहे.

LUCKY SIGN - A black tourmaline

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

अन्य व्यक्तींवर अति टीका करणं आता तुम्हाला थांबवण्याची गरज आहे. अन्यथा ते तुमच्या मताला आता किंमत देणार नाहीत. तुमच्याकडे तुमचे अनुभव असतीलही; पण त्यामुळे एखाद्याच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण होत असेल तर त्याचं अजिबातच कौतुक होत नाही. कितीही काळजी वाटत असली तरी दोन पावलं मागे या. तुम्ही संशोधनाच्या क्षेत्रात असाल, तर तुमच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी काही सुविधा मिळण्याकरिता तुम्हाला काही काळ थांबण्याची गरज आहे.

LUCKY SIGN – A red scarf

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs