Home /News /astrology /

Daily horoscope : या राशीसाठी आज आर्थिकदृष्ट्या सकारात्मक, पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily horoscope : या राशीसाठी आज आर्थिकदृष्ट्या सकारात्मक, पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily Horoscope 26 january 2022 : कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्ही आता नव्या संधीचा शोध घेत असाल तर, एखादी चांगली संधी येण्याची शक्यता आहे. कायद्यासंबंधी प्रकरण तुमच्या अनुकूल होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्याबाबत गैरसमज झाला असल्यास तो तात्पुरता असेल. LUCKY SIGN – चायना प्लेट (a china plate) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) जर तुम्ही एखाद्या नेतृत्वाचा भाग असाल किंवा विभागाचे प्रमुख असाल तर तुम्हाला तुमच्या कामाचं समर्थन करावं लागू शकतं. तुम्ही कोणत्याही अनावश्यक संभाषणात गुंतणार नाही, याकडे लक्ष द्या. झोपेच्या बाबतीत काही समस्या जाणवू शकतात. LUCKY SIGN – चिमणी (a sparrow) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही ज्या नात्यांमध्ये आहात त्यात आता तुम्हाला काहीशी अशांतता जाणवू शकते. एकतर्फी संवादामुळे जोरदार वाद होऊ शकतात. जर परीक्षेसाठी तयारी करत असाल तर त्याचे परिणाम उत्साहवर्धक असू शकतात. LUCKY SIGN – स्टडी टेबल (a study table) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही तपशीलांकडे बारकाईने लक्ष द्याल. आज दूरपर्यंत पायी जावं लागेल. अचानक संध्याकाळी बाहेर जाण्याची योजना ठरू शकते. LUCKY SIGN – पांढरी वाळू (white sand) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) धीर धरावा लागेल कारण तुमच्या योग्यतेची गोष्ट तुम्हाला देण्याबाबत ऑफिसमध्ये पुनरावलोकन सुरू आहे. तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्याशी स्पर्धा करावीशी वाटू शकते. मूळ गावी जाण्याचा योग आहे. LUCKY SIGN – वॉटरकलर पेंटिंग (watercolor painting) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या एखाद्या मित्राला आर्थिक मदतीची गरज भासू शकते आणि तुम्ही ती द्यायला तयारही होऊ शकता. तुमची नुकतीच भेट झालेला नवा पुरूष हा चांगल्या प्रकारे लोकांशी जोडलेला आणि उपयोगी ठरू शकतो. आज खाण्याची इच्छा नेहमीपेक्षा जास्त होऊ शकते. LUCKY SIGN – आनंदी झोप (A blissful sleep) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) जर तुम्ही शांतताप्रिय असाल तर आजचा दिवस कदाचित व्यत्यय आणणारा असू शकतो. तुमच्या आसपासची काही जण तुमच्याबद्दल गॉसिप करू शकतात पण ते बिनबुडाचं असेल. आर्थिक बाबतीतील गंभीर प्रकरणात तुम्हाला सकारात्मक हालचाल दिसू शकते. LUCKY SIGN – अ टेराकोटा ट्रंब्लर (a terracotta tumbler) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमची सर्जनशीलता आज उच्चीची असेल. तुमच्या मनातल्या एखाद्या प्रकरणात आज नवीन प्रगती झाल्याचं दिसू शकतं. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीच्या निवडीसाठी तुमच्या अंतर्मनाच्या संकेतांचा वापर आज करा. LUCKY SIGN – ॲन अमेथिस्ट (an amethyst) धनु (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमची तातडीची कामं पुढे ढकलण्याचा दिवस आहे, कारण आजची उर्जा तितकीशी अनुकूल नाही. जे तुम्हाला वाटतं ते व्यक्त करणं महत्त्वाचं ठरू शकतं. आज तुम्हाला आळसावल्यासारखं वाटू शकेल. LUCKY SIGN – निळा खडा (A blue stone) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) आज धीर धरा, कारण एखाद्या गंभीर संभाषणासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. तुमच्या मुलांमुळे तुम्हाला निखळ आनंद अनुभवता येऊ शकतो. आर्थिकबाबतीत आता चढता आलेख दिसू लागेल. LUCKY SIGN – सॅटीन कापड (a satin cloth) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आजच्या उर्जेचा जास्तीत जास्त वापर करा कारण त्या तुमच्यासाठी अनुकूल आहेत. एखादं अर्धवट राहिलेलं काम आज पूर्ण करता येईल. प्रलंबित संभाषण पुन्हा सुरू करता येतील. आरोग्य चांगलं राहील. LUCKY SIGN – दोरी (a rope) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही कधीकाळी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून बालपणीच्या मित्र मदत करेल. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तपासणीची गरज जाणवू शकते. दुपारच्या वेळी कदाचित एखाद्या शक्तीमुळे त्रास होऊ शकतो. गरज भासेल तेव्हा खरं बोला. LUCKY SIGN – चांदीची तार (a silver wire)
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या