Home /News /astrology /

Daily horoscope : मिथुन राशीची होणार प्रगती; कन्या राशीने आव्हानांसाठी तयार राहावं

Daily horoscope : मिथुन राशीची होणार प्रगती; कन्या राशीने आव्हानांसाठी तयार राहावं

Daily Horoscope 26 january 2022 : सूर्यराशीप्रमाणे तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) काही जणांना आळसावल्यासारखं आणि काम करू नये असं वाटू शकेल. परिणामी उगाचच गोष्टी लांबणीवर पडू शकतात. तुम्ही अचानक खरेदी करण्याचंही ठरवू शकता. त्यामुळे तुमची एनर्जी एकंदरच विस्कळीत असू शकते. LUCKY SIGN from above – अल्बम (an album) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) मौल्यवान नात्यांसाठीही सतत मेहनत घ्यावी लागते. तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून आणखी संवादाची अपेक्षा असू शकते. काही वेळा लाट किंवा प्रवाह तुमच्या विरुद्ध असेल, तर लांब राहणंच चांगलं असतं. सकाळच्या वेळेचा जास्तीत सदुपयोग करण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN from above – जुनी मोटारसायकल (an old motorcycle) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमची जबाबदारी वाटून घेण्यासाठी एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते. ही तुमच्या प्रगतीसाठी चांगली बातमी आहे. आताच तुमची प्रलंबित कामं संपवण्याचा प्रयत्न करा. वेळेवर झालेल्या आठवणीमुळे जास्तीचं काम करणं वाचेल. LUCKY SIGN from above – की चेन (a key chain) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) कितीही व्यग्र असलात, तरी तुमच्या कुटुंबाच्या संपर्कात राहणं लक्षात ठेवा. यामुळे तुम्ही जमिनीवर राहाल. एखादा क्रीडाप्रकार तुम्हाला उत्सुक करणारा ठरू शकतो. नेतृत्वाची संधी लवकरच मिळू शकेल. LUCKY SIGN from above – a red coral सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही आधी कोणाला दुखावलं असेल तर कदाचित अजूनही त्यांनी तुम्हाला माफ केलेलं नाही. समेट करण्यासाठी हीच वेळ योग्य असू शकते. कॉलेजचे मित्र रियुनियन प्लॅन करू शकतात. अति खाणं टाळण्यासाठी उत्तम दिवस आहे. LUCKY SIGN from above – सप्तरंगी वस्तू (a rainbow color article) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या मनाला पुढे येणाऱ्या आव्हानांसाठी तयार करा. परदेशात जाण्याची संधी तुमच्यासमोर चालून येऊ शकते. दिवसाअखेर तुम्ही काही वेळ एन्जॉय करण्यात घालवाल. LUCKY SIGN from above – कॉफी शॉप (A coffee shop) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखाद्या क्षुल्लक परिस्थितीमुळे घरातलं चांगलं वातावरण बिघडू शकतं. नियोजित नसलेलं अतिरिक्त काम तुम्हाला मिळू शकतं. मनोरंजनाचा एखादा नवा स्रोत तुमचं लक्ष वेधू शकतो. LUCKY SIGN from above – काचेचा जग (a glass jug) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत सजग राहा. तुम्ही आता सहभाग घेतल्यास नंतर तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेजारच्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला प्रगती पाहायला मिळू शकते. LUCKY SIGN from above – बॅटरीचा सेट (A set of batteries) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) कधी तरी काही न कळणं हेसुद्धा चांगलं असतं. आजचा दिवस काहीसा संथ आणि एकसुरी वाटू शकेल. तुम्हाला लवकर झोपायची इच्छा होऊ शकते. तुम्ही एखाद्या लांबच्या व्यक्तीशी संवाद साधाल. LUCKY SIGN from above – जुनी आवडती कादंबरी (old favorite novel) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) युतीसाठी नव्याने येणाऱ्या संधीसाठी तुम्ही सज्ज होऊ शकता. रस्ता जरी मोकळा आणि सरळ वाटला तरी नीट पाहणी करावी लागू शकते. तुमच्या हाताखाली काम करणारे कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे सहकार्य करणार नाहीत. LUCKY SIGN from above – तांब्याचा ग्लास (a copper glass) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आजचा दिवस जसा आहे तसाच तुम्ही तो स्वीकारल्यास गोष्टी सहजसोप्या वाटतील. एखाद्या दिवशी थकल्यासारखं वाटणं सर्वसामान्य आहे. स्वतःला विश्रांती घेण्यासाठी वेळ द्या. कोणत्याही कामाचं मूल्यांकन करण्याआधी सर्व गोष्टी योग्य असल्याची खात्री करा. LUCKY SIGN from above – a cereal bowl मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या चांगल्या मित्राला कौटुंबिक प्रकरणात तुमच्या मदतीची गरज भासू शकते. तुमच्या भावंडावर जास्त टीका न करण्याचा प्रयत्न करा. जमा केलेले पैसे आता मदतीस येऊ शकतात. LUCKY SIGN from above – क्रिस्टल जार (a crystal jar)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या