Home /News /astrology /

Daily horoscope : 'या' 2 राशींना आज कार्यक्षेत्रात मिळणार मोठं यश

Daily horoscope : 'या' 2 राशींना आज कार्यक्षेत्रात मिळणार मोठं यश

Daily horoscope : पाहा तुमचं रविवारचं राशिभविष्य.

आज दिनांक 26 डिसेंबर 2021. रविवार मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला चंद्र कन्या राशीतून भ्रमण करणार असून गुरूशी षडाष्टक तर शुक्राशी नव पंचम योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करणार असून सूर्य धनु राशीत आहे. आज दिवस जरा आळसामध्ये जाईल. कामकाज करण्याची इच्छा नसेल. शरीर शिथील, मन अशांत. दिवस घरात, आरामात घालवणं योग्य. वृषभ आजचा दिवस शुभ संकेत देतो आहे. मुलं, मुली तुमची प्राथमिकता राहिल. वाचन लिखाण, छोटे प्रवास संभवतात. दिवस उत्तम जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. जपून व्यवहार करा. दिवस शुभ. मिथुन राशीच्या व्यय स्थानातील राहू आणि षष्ठ स्थानात असलेला मंगळ अशा ग्रहस्थितीमुळे संतती चिंता सतावू शकते. चंद्र आज चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. घरासाठी काही खरेदी करणं गरजेचं वाटेल. दिवस बरा आहे. कर्क प्रवास, भेटीगाठी असा हा दिवस आहे. भाऊ बहिणी संपर्क करतील. मंगळ आईशी मतभेद दर्शवत आहे. खर्च बेताने. कामे वाढतील. पण काळजी नको. जोडीदाराला वेळ द्या. उपासना करा. सिंह आज पैसा मिळण्याची शक्यता आहे. पण येण्याआधीच खर्च होईल. कुटुंबासाठी त्याग करावा लागेल. प्रकृती सांभाळून दगदग करा. दशमातील राहू कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. कायदा पाळा. दिवस चांगला. कन्या आज राशीतून होणारे चंद्रभ्रमण शुभ आहे. दोन दिवसापासून वाटणारी अस्वस्थता कमी होईल. सूर्य अणि शुक्र कार्यक्षेत्रात यश मिळवून देणार हे नक्की. गुरु जप करा. दिवस चांगला आहे. तुला आज घाई गडबड न करता शांततेत काम करा. व्यय होऊ शकतो. पैसा, वेळ अथवा आरोग्य जपून असा. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी आल्या तरी घाबरू नका. निवारण होतील. संतती सहकार्य करेल. दिवस मध्यम . वृश्चिक उत्तम लाभ, प्रवास, मित्रमैत्रिणी जमवून छोटी पिकनिक असा दिवस आहे. पण सध्या थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. मंगळ सध्या राशी स्थानात आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. काळजी घ्या . धनु आज भरपूर काम करावं लागेल. लागोपाठ मीटिंग्स, फोन, भेटी यामुळे थकून जाल. दिवसाचे नीट नियोजन करा. कामानिमित्त प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. दिवस चांगला आहे. मकर दोन दिवसापासून वाटणारा तणाव आज नक्की कमी होईल. अडचण आली असली तरी मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. पण वाद नको. संतती चिंता आता जरा कमी होईल. दिवस अनुकूल. कुंभ अष्टमात चंद्र, राशीच्या व्यय स्थानात शनी ही ग्रहस्थिती फारशी बरी नाही. जपून चालावं. सांधे आणि हाडाची दुखणी डोकं वर काढतील. घरातली काही आवश्यक कामं करावी लागतील. शनी जप करावा. मीन आज काही खरेदी असेल तर जोडीने करून घ्यावी.  मंगळ, बारावा गुरू हा आरोग्यचिंता निर्माण करेल. गुरूची  उपासना, जप आणि दान  करीत असावं. हिंमत वाढेल. दिवस शुभ आहे. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या