मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope: जीवनाची घडी विस्कटलीये? वाचा आजचं राशिभविष्यात, सापडेल मार्ग

Daily Horoscope: जीवनाची घडी विस्कटलीये? वाचा आजचं राशिभविष्यात, सापडेल मार्ग

Daily Horoscope: जीवनाची घडी विस्कटलीये? वाचा आजचं राशिभविष्यात, सापडेल मार्ग

Daily Horoscope: जीवनाची घडी विस्कटलीये? वाचा आजचं राशिभविष्यात, सापडेल मार्ग

25 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला ताण येत असेल, तर आता तुम्ही योग्य प्रतिसादासाठी आणि सामना करण्याच्या धोरणासाठी तयार असल्याचं जाणवेल. एखाद्या नव्या गोष्टीची हळूहळू होणारी सुरुवात आश्वासक बाबीत बदलेल. प्रवासाचे प्लॅन्स आणखी पुढे ढकलले जातील.

LUCKY SIGN – A seed

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तात्पुरती नाती आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आता ते सोडून देऊन पुढे जाण्याची वेळ आहे. जुन्या गोष्टींचं ओझं मागे सोडून देऊन, त्यांचा तुमच्या पुढच्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नका. प्रवासाचे बेत ठरण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN – A white flower

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

व्यवस्थापनातल्या एखाद्या वरिष्ठासोबत गांभीर्याने केलेल्या चर्चेमुळे भरपूर ज्ञान मिळेल. तुमच्या व्यावसायिक जीवनावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत होतात. निष्काळजीपणामुळे तुमच्या दैनंदिन रूटीनवर परिणाम होईल.

LUCKY SIGN – A rainbow

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

आव्हानात्मक परिस्थितीत आत्मविश्वासपूर्ण राहण्यामुळे लवकरच तुम्हाला त्या गोष्टीची दुसरी बाजू उलगडण्यास मदत होऊ शकेल. एखादं रोमँटिक प्रपोझल समोर येईल आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. भविष्यासाठीचा कोणताही निर्णय सावधगिरीने घ्या.

LUCKY SIGN – A solitaire

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

एखादी स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करत असलात, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत असलेली काहीशी अस्वस्थतेची भावना कमी होऊ शकेल. बाहेरचे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका.

LUCKY SIGN – A flask

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

येत्या आठवड्यात तुमचे काही ठोस प्लॅन्स असतील. लवकरच एखादा मोठा समारंभ होण्याची शक्यता आहे. हे सगळं एकत्रितपणे आणि मोठ्या स्वरूपात समोर येण्याची शक्यता आहे. तुमच्या तज्ज्ञतेच्या क्षेत्रात लवकरच नवी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN – A kite

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

काही वेळा काही जण वचन देऊन पाळत नाहीत; पण यावरून तुम्ही त्यांची पारख करावी असं नव्हे. लवचिकता राखा. तुम्हाला हव्या तशा गोष्टी घडत नसतील, तर वेगळ्या कार्यपद्धतीचा अवलंब करून पाहता येईल. रोखीचा प्रवाह आता अपेक्षित आहे.

LUCKY SIGN – A tourmaline

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

तुमची स्टार्ट-अप कंपनी असेल, तर आवश्यक आर्थिक गरजांचं व्यवस्थापन तुम्ही करू शकाल. आंतरराष्ट्रीय पातळीवरची काही घडामोड घडण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकेल. त्यामुळे स्मरणरंजन होईल.

LUCKY SIGN – A seashell

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

कुटुंबाकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. लग्नाचे प्रस्ताव येण्याची आणि उन्हाळ्यात लग्न होण्याचीही शक्यता संभवते. एखाद्या भपकेबाज बाबीपेक्षा कायमच एकदम सभ्य राहण्याकडे तुमचा कल असतो.

LUCKY SIGN – Kiwi fruit

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

काही जुने मित्र नवीन बिझनेस कल्पनेसाठी किंवा भागीदारीसाठी तुमचं मन वळवण्यात यशस्वी होतील. एखाद्या प्रवासादरम्यान ही चर्चा घडण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थोडा आव्हानात्मक काळ आहे. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील.

LUCKY SIGN – A clear quartz

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

एखाद्या आरोपावरून तुम्हाला संघर्ष करावा लागू शकेल. काही व्यक्तींबद्दलच्या तुमच्या मतांमध्ये सकारात्मक बदल होतील. कुटुंबीयांकडून भरपूर पाठिंबा मिळेल. पैसे उधळण्याची सवय नियंत्रित करून आता बचत करायला सुरुवात केली पाहिजे.

LUCKY SIGN - Lilies

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

सध्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी काही वेळा तुम्ही तुमच्या मूळ तत्त्वाकडे जाता आणि त्याचा सध्या तुमच्यावर विपरीत परिणाम होत असावा. ऑफिसमधली एखादी वरिष्ठ व्यक्ती तुम्हाला याबाबत योग्य सल्ला देऊ शकेल. प्रत्येक गोष्ट सगळ्यांकडे उघड करू नका.

LUCKY SIGN – A rock

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya