Home /News /astrology /

Daily Horoscope : 'या' राशीचा दिवस त्रासदायक पण एक सरप्राईझ बदलेल चित्र

Daily Horoscope : 'या' राशीचा दिवस त्रासदायक पण एक सरप्राईझ बदलेल चित्र

मल्टिटास्कर असतात या राशी

मल्टिटास्कर असतात या राशी

Daily Horoscope 25 january 2022 : जन्मतारखेनुसार ठरणाऱ्या सूर्यराशीप्रमाणे तुमचं भविष्य काय वाचा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 जानेवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आजचा दिवस तुमच्या सकारात्मक मानसिकतेमध्ये थोडा अडथळा आणू शकेल. अशीही शक्यता आहे, की हे तात्पुरत्या काळाकरिता असेल; पण तरीही ते त्रासदायक असेल. अचानक मिळालेल्या एखाद्या सुखद सरप्राइजमुळे दिवसाचा नूर पालटू शकतो. LUCKY SIGN from above – पहाटेची बातमी (an early morning news) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्हाला दिलेलं काम वेळेत पूर्ण केल्यास तुमचा पुढचा दिवस नक्कीच चांगला जाईल. दुसऱ्यांवर विश्वास ठेवणं थोडं कठीण वाटू शकेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी योजना आखण्यासाठी तुम्हाला नव्याने कल्पना सुचेल. LUCKY SIGN from above – कोलाज (a collage) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) थोडक्यात पण प्रभावीपणे आज तुम्हाला तुमचं मत मांडता येऊ शकेल. अशा अनेक वास्तव गोष्टी आहेत, ज्या आता तुमच्या समोर येतील. कामाच्या ठिकाणी काही बदल करावे लागतील. सीरियस अॅप्रोच ठेवल्यास तुम्हाला गोष्टी सुरळीत ठेवण्यास मदत होऊ शकेल. LUCKY SIGN from above – आकाशातलं नक्षत्र (a constellation in the sky) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुमच्या तुम्हाला काही सवयींमध्ये बदल करण्यास सांगितलं जाऊ शकतं. थोड्याफार इकडच्या तिकडच्या संघर्षांमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. तुम्ही समोरच्या माणसाचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न कराल. LUCKY SIGN from above – a cobbler सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आर्थिक व्यवहार आज तुमचं मुख्य प्राधान्य असू शकतात. तुम्हाला तुमच्या वायफळ खर्चांनाही आळा घालावा लागू शकेल. लवकरच एखादा उत्पन्नाचा स्रोत नव्याने मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पोटाच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवा. LUCKY SIGN from above – चांदीचा ट्रे (a silver tray) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमचं मन सध्या एकाकीपणाच्या अवस्थेतून जात आहे आणि ते नवीन साथीदाराच्या शोधात असू शकतं; पण यासाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागू शकते. आरोग्यावर लक्ष केंद्रित करून नियमित वेळापत्रक पाळल्यास तुम्हाला मदत होऊ शकते. LUCKY SIGN from above – गजराचं घड्याळ (An alarm clock) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्ही व्यावसायिक असाल, तर एखाद्या कायदेशीर प्रसंगाला सामोरं जावं लागू शकतं. तुमचे व्यवहार बारकाईने तपासा आणि त्यांचं पुनरावलोकन करा. तुमची भेट लवकरच एखाद्या प्रभावशाली माणसाशी होऊ शकते. LUCKY SIGN from above – फळांची डिश (a plate of fruits) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) बऱ्याच दिवसांपासून कामाच्या ठिकाणी जास्त भार असल्याने तुम्ही ब्रेक घेण्याच्या विचारात आहात. त्यामुळे तुम्ही एखादा छोटासा ब्रेक आता प्लॅन करू शकाल. एखादी व्यक्ती फक्त तुमच्याकडून माहिती मिळवण्यासाठी जवळीक साधायचा प्रयत्न करेल. सतर्क राहा. LUCKY SIGN from above – आवडत्या गाडीचा फोटो (image of your favorite car) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) दिवसाची सुरुवात संथ गतीने होणार असली, तरी संध्याकाळपर्यंत दिवसाला वेग येईल. आजचा दिवस तुमच्या सामाजिक समूहातल्या मित्रपरिवाराला पुन्हा भेटण्यासाठी चांगला आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्रात असाल तर तुमच्यावरचा कामाचा भार वाढू शकतो. LUCKY SIGN from above – नवीन कादंबरी (a new novel) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमचा जुन्या मित्रांचा ग्रुप तुमची पुन्हा भेट घेण्यासाठी प्रतीक्षेत असू शकतो. पालकांना त्यांच्या निरीक्षणानुसार काही गोष्टींबाबत तुमच्याशी बोलायचं असेल. त्याबाबत तुम्ही विचार करू शकता. दिवसभर तुम्हाला आळसावल्यासारखं वाटेल; पण तरी तुम्ही स्वतःला पुढे ढकलत राहाल. LUCKY SIGN from above – खडतर रस्ता (a rough road) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहात ते सतत लांबणीवर पडत आहे. तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागू शकतात. तुमच्या आवडीच्या गोष्टी काही काळाकरिता मागे ठेवाव्या लागण्याची शक्यता आहे. तुमच्या टू डू लिस्टमधलं एखादं काम यंदा पूर्ण होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN from above – a synchronized car number मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) आळशीपणामुळे तुम्ही सकाळच्या वेळी काम करण्याच्या मूडमध्ये नसू शकता; पण दुपारनंतर तुम्ही जास्त वेगाने कामं कराल. तुम्ही तुमच्या मूळ गोष्टींकडे परत जाण्याचा विचार करू शकता; पण कदाचित त्यासाठी अजून वेळ लागू शकतो. LUCKY SIGN from above – सोन्याची अंगठी (a gold ring)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या