मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily horoscope : या व्यक्तींना शुभ फळ देणारा दिवस; पाहा आजचं राशिभविष्य

Daily horoscope : या व्यक्तींना शुभ फळ देणारा दिवस; पाहा आजचं राशिभविष्य

Horoscope today : तुमच्या राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

Horoscope today : तुमच्या राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

Horoscope today : तुमच्या राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार?

आज दिनांक 25 डिसेंबर 2021 वार शनिवार. तिथी मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी. आज चंद्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज दिवस मध्यम असून चंद्र भ्रमण अनुकूल स्थानात आहे. काहीसे आशावादी वातावरण राहिल. दशमात शुक्र शनि युती कामाच्या ठिकाणी काळजी घ्या असे सुचवीत आहे. आज दिवस शुभ.

वृषभ

संततीकडे जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती ठिक राहिल. घरातील मोठ्या व्यक्तींना जपा. घरात भरपूर काम पडेल. दिवस चांगला.

मिथुन

घरांमध्ये काही विशिष्ट घटना घडतील. त्यापासून मानसिक त्रास होऊ शकतो. जास्तीची काम आटपून घ्याल. तुमचे मनोबल उत्तम राहिल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कर्क

आज काही महत्त्वाचा निर्णय होईल. ऑफिसमध्ये संवादातून गैरसमज टाळा. शनी उपासना करणे योग्य राहिल. आर्थिक बाजू ठिक राहिल. बहीण भावंडांची भेट होईल. प्रवासात जपून राहा. या काळात शिव उपासना करावी.

सिंह

राशीस्थानात ग्रहस्थिती मिश्र फळ देईल. पैसा मिळेल पण खर्चदेखील वाढेल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. वास्तूसंबंधी निर्णय होईल. दिवस कौटुंबिक चिंतेचा. दान करावे.

कन्या

आज मानसिक ताण, हुरहुर, संतती चिंता असा दिवस आहे. आर्थिक स्थिती ठिक राहिल. नवीन कला शिकण्यास अनुकूल वेळ आहे. जोडीदार मदत करेल.  शिधा  दान करावे. दिवस चांगला जाईल.

तुला

धन स्थानात ग्रह हॉस्पिटल किंवा कोर्ट कचेरीमध्ये खर्च होईल. प्रकृती साथ देणार नाही. शीत विकार संभवतात. परदेशी जाण्याची बोलणी सुरू होतील. चतुर्थ स्थानात शुक्र उंची वस्त्रे, दागिने खरेदी कराल. दिवस बरा जाईल.

वृश्चिक

शुक्र आणि लाभात चंद्र अनेक उत्तम घटना घडतील. प्रवास, मौज मजा, मित्रमैत्रिणींना भरपूर वेळ द्याल. त्यांच्याकडून फायदादेखील होईल. स्त्री वर्ग सहकार्य करणार आहे. दिवस बरा जाईल.

धनु

अतिशय व्यग्र असा हा दिवस कामात व्यस्त असा जाईल. काहीतरी मोठी खरेदी घरासाठी कराल. खर्चात वाढ करणारा दिवस. या काळात  दान करणे योग्य राहील.

मकर

अष्टमात  ग्रहस्थिती नुसार अनेक संधी उपलब्ध होतील. नवीन काही विचार येतील. सौंदर्य पूर्ण वस्तू खरेदी होतील. आर्थिक स्थिती ठिक राहील. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. दिवस मध्यम जाईल.

कुंभ

चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य बिघडेल. तसेच काही तरी विचित्र अशी हुरहूर जाणवेल. भांडण, वाद नको. आर्थिक लाभ होतील. ईश्वरी सेवा करून आशीर्वाद प्राप्त करावा. मध्यम दिवस.

मीन

आज व्यवसाय, नोकरी पेशा व्यक्तींना शुभ फळ देणारा दिवस. महत्त्वाचा फोन, संभाषण यातून फायदा होईल   शुक्र अनेक संधी प्राप्त करून देईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. दिवस चांगला जाईल

शुभम  भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark