मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : आरोग्याची छोटीशी समस्या पण ही रास असेल तर प्रकृतीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका

Daily Horoscope : आरोग्याची छोटीशी समस्या पण ही रास असेल तर प्रकृतीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका

24 नोव्हेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

24 नोव्हेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

24 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

काही गोष्टी सोडून देणं हे तुमच्यासाठी कधी तरी आव्हानात्मक असतं. बिझनेसमध्ये लवकरच नवी पार्टनरशिप होण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक होण्याकडे दुर्लक्ष करावं. कारण बाकीच्यांना तुमचे हेतू स्पष्टपणे कळून येऊ शकतात.

LUCKY SIGN - A lake

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

परफॉर्मन्स विचलित झाल्यास वरिष्ठांकडून खपवून घेतलं जाणार नाही. कारण तुम्हाला तसा इशारा आधीच देण्यात आला आहे. कामात पुढे येणारी आव्हानं लक्षात घेऊन आतापासूनच तयारीला सुरुवात करण्याची गरज आहे. आरोग्याची किरकोळ समस्या येऊ शकेल आणि दुर्लक्ष केल्यास ती मोठं रूप धरण करू शकेल.

LUCKY SIGN - A honeybee

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्ही बऱ्याच कष्टांनी प्रयत्न केले असतील; मात्र तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही व्यक्त केलं पाहिजे. तुम्ही दक्षपणे तुमच्या स्वतःच्या संवादावर आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण/लक्ष ठेवायला हवं. तुमचा सहकारी तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करील.

LUCKY SIGN - A bronze wallet

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमच्याकडून काही सकारात्मक व्हाइब्ज इतरांना जाऊ शकतात. तुम्ही सत्य स्वीकारण्यासाठी पाठीमागे येण्याची गरज आहे. तुम्ही ज्या माणसांवर विश्वास ठेवत आहात, त्यांचा आढावा घेण्याची, किंवा त्यांच्याशी नित्य संवाद ठेवण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - A tumbler

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

इतरांविषयी प्रसन्न अ‍ॅटिट्यूड, टीम स्पिरिट आणि सतत कुतुहलाची भावना जागृत असलेलं विद्यार्थीपण हे गुण स्वतःमध्ये बाणवून घ्या. तुमच्या अ‍ॅटिट्यूडसाठी तुमच्यावर घरात टीका होत आहे. पैशांच्या प्रवाहाचं बारकाईने व्यवस्थापन करण्याची गरज आहे.

LUCKY SIGN - A walking stick

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

काही वेळा दोन व्यक्तींच्या भेटीतून खरंच काही स्पार्क पडू शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. येत्या काही दिवसांत तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला अगदी अनियोजितपणे भेटणार आहात. लवकरच तुमची एखादी छोटी सहल घडेल. त्या सहलीच्या आठवणी बराच काळ टिकतील.

LUCKY SIGN - A black crystal

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

सध्या तुम्हाला काही बाबींबद्दल खात्री नसेल, तर काही आत्तापुरत्या त्या पुढे ढकला. तुमच्या कुटुंबाला तुमच्यासोबत काही क्वालिटी टाइम व्यतीत करण्याची इच्छा आहे. नवा प्रोजेक्ट किंवा असाइनमेंटमध्ये काही दिवस बिझी राहाल.

LUCKY SIGN - Teak wood furniture

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

कामाच्या ठिकाणी दीर्घ काळ प्रलंबित असलेली बढती तुम्हाला मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. लवकरच गेट-टुगेदर होण्याची शक्यता असून, त्यामुळे तुम्हाला रिफ्रेश व्हायला मदत होणार आहे. नंतर खर्च करण्यासाठी आता बचत करा.

LUCKY SIGN - A bamboo plant

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

जेव्हा तुम्ही समस्यांवर उपाय शोधत असता, तेव्हा कधीच राग हे उत्तर असू शकत नाही. राग नियंत्रणातच ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. जुगारासारख्या गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहा. नवं वाहन खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A clear quartz

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

कुटुंबातल्या कोणाची तरी प्रकृती हे सध्या काळजीचं कारण बनू शकतं. अनपेक्षित समस्येशी दोन हात करण्यासाठी कोणाची तरी छोटी मदत किंवा कर्ज उपयोगी ठरू शकेल. काही कालावधीसाठी आर्थिक तणाव असेल. जोडीदाराशी चर्चा करणं उपयुक्त ठरेल.

LUCKY SIGN - A climber

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला वागणूक मिळेलच असं नाही. छोट्या प्रवासाचे योग असून, त्यात तुम्ही घराबाहेर काही क्वालिटी टाइम व्यतीत कराल. तुम्ही परत याल, तेव्हा तुमचे ताण मागे सोडून या.

LUCKY SIGN - Blue sapphire

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्ही प्रलंबित ठेवलेली कामं होतील. एकंदरीत आजचा दिवस कमी ताणाचा असेल. कौटुंबिक पातळीवर तुम्हाला बरीच मदत मिळेल. सध्याच्या काळात नवी गुंतवणूक करण्याची शिफारस केली जात आहे.

LUCKY SIGN - A peacock's feather

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs