आज दिनांक 24 डिसेंबर 2021. शुक्रवार. आज तिथी मार्गशीर्ष कृष्ण पंचमी. आज चंद्र दिवसभर सिंह राशीत असेल. तिथून तो गुरूशी समसप्तक योग करेल. चंद्राचे भ्रमण आणि इतर ग्रह स्थितीनुसार पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
पंचमात होणारे चंद्र भ्रमण अनेक बाबतीत शुभ आहे. मुलं मनासारखी वागतील. त्यांना थोडा वेळ द्या. आधी केलेल्या काहीतरी छान कामामुळे प्रसिद्धी होईल. दिवस अनुकूल आहे.
वृषभ
थोडी पिछेहाट झाली तरी धैर्याने काम पूर्ण करा. घरगुती काम अचानक वाढतील. नको असलेले खर्च टाळा. जरा डोळ्यांची काळजी घ्या. चैनीकडे कल होईल. दिवस चांगला आहे.
मिथुन
प्रवास अगदी लहान का असेना, होण्याची शक्यता आहे. बहिण भावाशी संवाद करणे आज गरजेचे आहे. त्यांना महत्व द्या. सप्तम सूर्य आणि शुक्र अधिकार बहाल करेल. दिवस उत्तम.
कर्क
आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, कर्जफेड असा हा दिवस आहे. काही नुकसान होणार नाही असे बघा. अष्टमात असलेला गुरू थोडी संथ प्रगती करतो. पण सतर्क आणि आनंदी रहा.
सिंह
दिवस शांततेत, नियमित असा जाईल. फार घडामोडी होणार नाहीत. कायद्याची चौकट ना मोडता सावध राहून व्यवहार करा. गुरू कुटुंबात समाधान निर्माण करेल. दिवस चांगला आहे.
कन्या
प्रकृती जरा नरम गरम, शिथील राहिल. काही पोटाचे त्रास असतील तर दुर्लक्ष नको. अधिकारी व्यक्तीशी संभाषण किंवा भेट घडू शकते. गुरूची उपासना करावी. दिवस मध्यम आहे.
तुला
आज केलेल्या कामाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दशमातील मंगळ कामाच्या ठिकाणी तुमचं महत्त्व वाढवेल. ताण पडला तरी यश मिळेल. दिवस शुभ आहे.
वृश्चिक
कामाच्या पद्धतीत थोडा बदल करून बघा. म्हणजे त्रास होणार नाही. थोडे इतरांच्या म्हणण्याला महत्त्व द्या. जोडीदाराला वेळ द्या. धन स्थानात आलेला सूर्य कुटुंबाची काळजी घ्या असे सुचवतो. दिवस चांगला आहे.
धनु
भाग्यवान रास. आज अनेक शुभ घटना घडतील. पूजेत मन रमेल. फक्त शनी मंगळ प्रतियोग असताना काळजी घेणे गरजेचे असते. दिवस छान आहे.
मकर
आज मकर राशीच्या व्यक्तींसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. मनावर असलेले नैराश्याचे मळभ आज अधिक वाढेल. पण धीर सोडू नका. लवकरच सगळे ठिक होईल. मुलांची काळजी घ्या. दिवस मध्यम .
कुंभ
आज दोघांनी विचार विनिमय करून काही निर्णय घ्यायचे असतील तर घ्या. एकमेकांना वेळ द्या. कौटुंबिक प्रश्न असतील तर ते आधी सोडवा. दिवस चांगला आहे.
मीन
प्रकृतीची काळजी घ्या असे आजचे चंद्र भ्रमण सुचवत आहे. मूल ही सध्या तुमची पहिली काळजी आहे. पण फार ताण घेऊ नका. लवकर प्रश्न सुटतील. गुरूची उपासना करणे फायद्याचे आहे. दिवस मध्यम आहे.
शुभम भवतु..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.